Full Width CSS

Maha Jyoti 2023

 



महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती- विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE / NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE / NEET परिक्षा पुर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते

 योजनेच्या लाभासाठी पात्रता :- 

1.    उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.

2.    उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.

3.    उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी

4.    जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.

5.    विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे. “Mahajyoti Free Tablet Yojana Registration”

 

 

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र

 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-

  • 9 वी ची गुणपत्रिका
  • 10 वी परिक्षेचे ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला 5. जातीचे प्रमाणपत्र
  • वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र ‘Mahajyoti Free Tablet Yojana Registration’

अर्ज कसा करावा

1.    महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for _CET/JEE/NEET 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2.    अर्जासोबत मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे. [Mahajyoti Free Tablet Yojana Registration]

अटी व शर्ती :-

1.    अर्ज करण्याचा अंतिम दि.31/03/2023 आहे.

2.    पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3.    जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार है। व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4.    अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा :- संर्पक क्र- 0712-2870120/21

5.     10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET / JEE / NEET या परिक्षेची तयारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील. {Mahajyoti Free Tablet Yojana Registration}

Mahajyoti Free Tablet Yojana Registration

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडुन MHT-CET/JEE/NEET 2025 परीक्षेच्या MHT-CET/JEE/NEET – 2025 – या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन पुर्व तयारीसाठी OBC / VJNT / SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी टॅब वितरणाकरीता संबंधितांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर सुचना फलक / Notice Board मध्ये उपलब्ध “Application for MHT-CET/JEE/NEET 2025 Training ” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अंतिम दिनांक – 31/03/2023 पर्यंत अर्ज करावा. सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार | माहिती उपलब्ध आहे. (Mahajyoti Free Tablet Yojana Registration)

टिप :- टपालद्वारे / प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.


अधिक माहितीसाठी संपर्क साधा

 👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र

(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱

मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092

Maha Jyoti 2023 Maha Jyoti 2023 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 13, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.