नमस्कार मित्रांनो जसे की तुम्हाला माहित आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेप्रमाणेच वर्षाला सहा हजार रुपये देण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे . मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्थात फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आठ प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत आणि शासनाने शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सहा अटी सुद्धा ठेवली आहेत. फॉर्म भरतेवेळी कोणकोणते आठ कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत . कोणते अटी लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आली आहे . तुम्हाला या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख संपूर्ण पहा.
मित्रांनो तुम्हाला माहीत असेल पीएम किसान योजना काय आहे दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत तीन टप्प्यात दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये दिले जातात. आता त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. आणि पीएम किसान योजनेप्रमाणेच या योजनेत सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती तीन टप्प्यात 6000 रुपये जमा केली जाणार आहेत. या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरच फॉर्म भरणे सुरू होणार आहे . त्यामुळे तुमच्याजवळ आताच आठ कागदपत्रे तयार ठेवा तेव्हा आता आपण सर्वप्रथम कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत. हे जाणून घेऊया आणि त्यानंतर पुढे काय प्रोसिजर करावी लागणार आहे. ती सविस्तरपणे पाहूया तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पुरेशी डॉक्युमेंट देणे गरजेचे असते . आणि आपण तसं केलं नाही तर आपला फॉर्म पडताळणी मध्येच बाद केला जाऊ शकतो म्हणजेच रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून इथे सुद्धा असेच आहे या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळजवळ आठ प्रकारचे कागदपत्र सादर करावी लागणार आहेत.
या योजनेसाठी फॉर्म भरतेवेळी हे आठ कागदपत्रे लागणार आहेत
या योजनेसाठी फॉर्म भरतेवेळी हे आठ कागदपत्रे लागणार आहेत
- पासपोर्ट साईज दोन फोटो
- आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- सातबारा उतारा
- रेशन कार्ड
- बँक पासबुक तसेच स्वतःचा मोबाईल नंबर
No comments: