मुख आरोग्य: आपल्याला माहिती असाव्यात अशा दातांशी संबंधित 3 गोष्टी, दातांचा शारीरिक आरोग्याशी थेट संबंध.....
मुख आरोग्य: आपल्याला माहिती असाव्यात अशा दातांशी संबंधित 3 गोष्टी, दातांचा शारीरिक आरोग्याशी थेट संबंध.....
दात आणि हिरड्यांमध्ये वेदना होतात तेव्हा आपण दंतवैद्याकडे जातो, परंतु पीरिओडोंटल आजाराच्या स्थितीत वेदना जाणवत नाहीत. वास्तविक, पीरिओडोंटल हा हिरड्या आणि दातांना आधार देणाऱ्या हाडांच्या संसर्गाशी संबंधित आजार आहे. दातांचे आरोग्य कसे राखायचे ते जाणून घ्या.
१) मुख आरोग्य... बिघडल्यास हृदयविकाराचा धोका मधुमेह, काही प्रकारचे कर्करोग आणि हृदयविकार हेदेखील तोंडाच्या स्वच्छतेशी संबंधित आहेत. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांच्या हिरड्यांवर उपचार केले जातात तेव्हा त्यांच्या साखरेचे प्रमाण कालांतराने कमी होते.
२) दात संवेदनशील करते चारकोल पेस्ट...
दात चमकवण्याचा दावा करणारी चारकोल टूथपेस्ट वापरत असाल तर पुन्हा एकदा विचार करा. अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या जर्नलमधील संशोधनानुसार, चारकोल टूथपेस्ट दात पांढरे करत नाही, उलट ते दात अतिसंवेदनशील बनवते. कोळशाचे कण हिरड्यांना चिकटून राहून त्यांना नुकसान होऊ शकते.
३) इलेक्ट्रिक टूथब्रशमुळे हिरड्यांचे नुकसान... इलेक्ट्रिक टूथब्रश आपल्या दातांवर दबाव आणतो. हार्वर्ड स्कूल ऑफ डेंटल मेडिसिनचे प्रशिक्षक टी. एन. जियांग यांच्या मते, आपल्या हिरड्या घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे दाब देऊन घासणे. दातांच्या स्वच्छतेसाठी दिवसातून दोनदा ब्रश करणे आवश्यक आहे. यासाठी ब्रशचा कोन दात आणि हिरड्यांमध्ये ४५ अंशांवर ठेवा.
No comments: