आजच्या या लेखात जेनेरिक औषध मराठी माहिती, जेनेरिक औषधांची गरज व आवश्यकता व Need of generic medicine in marathi ह्या विषयांवरील माहिती देण्यात आली आहे.
जेनेरिक औषधांची गरज व आवश्यकता - generic medicine in marathi
आपल्या देशात वाढती महागाई आणि कमी उत्पन्नामुळे अनेक लोक स्वतःचा वैद्यकीय उपचार करण्यास सक्षम नसतात. एका सामान्य व्यक्तीला त्याच्या व कुटुंबातील सदस्यांसाठी महागडी औषधे आणि शस्त्रक्रियाचा खर्च पेलणे कठीण होते. काही लोक औषधांचा खर्च पाहून भितीत येतात आणि वेळेवर आपला उपचार करीत नाहीत. देशातील गरीब जनतेच्या या समस्या लक्षात घेऊन शासनाने एक नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत कोणताही व्यक्ती कमी खर्चात महागडी औषधे खरेदी न करता स्वतःचा उपचार करू शकतो.
प्रधानमंत्री जन औषधी योजनेअंतर्गत जेनेरिक औषधांची सुरुवात गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लोकांना कमी खर्चात औषधी उपलब्ध करून दिल्या जातात. या औषधी मिळवण्याकरिता प्रत्येक शहरात आणि गावात एक 'जन औषधी केंद्र' तयार करण्यात आले आहे. जेनेरिक औषधी ह्या ऍलोपॅथीच्या ब्रँडेड औषधी पेक्षा अतिशय कमी किमतीत मिळतात आणि ह्या औषधी तेवढ्याच प्रभावी देखील असतात. जेनेरिक औषधी पेटंट शिवाय बनवल्या जातात म्हणून त्यांची किंमत देखील निम्म्यापेक्षा कमी असते.
जेनेरिक औषधे यासाठी स्वस्त असतात कारण त्यांचे निर्माते कंपनीच्या विकास आणि प्रचार प्रसारावर अधिक खर्च करीत नाहीत. परंतु याउलट अधिक नफा मिळवण्यासाठी ज्या ब्रॅंडेड कंपन्या असतात त्या आपल्या प्रचार-प्रसारावर खर्च करतात. ज्यामुळे त्यांच्या औषधांची किंमत अधिक असते. याशिवाय जे जेनेरिक औषध असतात त्यांची किंमत किती ठेवावी यावर शासनाचा अधिकार असतो. ज्यामुळे कोणीही त्यांची किंमत वाढू शकत नाही.
आज आपल्या देशातील मध्यमवर्गीय आणि गरीब जनता महागडी औषधे खरेदी करण्यास असमर्थ आहेत. अशा परिस्थितीत जेनेरिक औषधि त्यांच्यासाठी वरदान सिद्ध झालेले आहेत. विश्व स्वास्थ संघटन (WHO) च्या डॉक्टरांनी जगभरातील सर्व डॉक्टरांना सल्ला दिला आहे की त्यांनी आपल्या रुग्णांना लिहून दिलेल्या औषधांच्या चिठ्ठीत 70% औषधे जेनेरिक लिहावीत.
आपणही जेनेरिक औषधींचा वापर आणि त्यांच्या प्रचार प्रसारावर भर द्यायला हवा. कारण जेनेरिक औषधी ही ब्रँडेड औषधांपेक्षा पाचपट कमी किमतीत व तेवढ्याच प्रभावी स्वरूपात मिळतात. देशात असलेली जेनेरिक औषधांची जास्तीत जास्त उपलब्धता नागरिकांना निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देईल.
ब्राझील आणि फ्रान्स सारख्या देशांमध्ये 20 टक्के पेक्षा जास्त जेनेरिक औषधी विकली जातात. जर आपणही आपल्या देशात जेनेरिक औषधांची विक्री वाढवली तर उरणारा मोठा पैसा देशाची प्रगती आणि विकासात लावता येऊ शकतो. म्हणूनच आजच्या काळात कमी पैशात उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी जेनेरिक औषधांची गरज व आवश्यकता भरपूर आहे.
No comments: