प्रेम म्हणजे काय | what is love in marathi
प्रेम काय आहे? खऱ्या प्रेमाचे वर्णन करणे खूप कठीण आहे. खरे प्रेम त्या सागरासारखे आहे ज्याची खोली न मोजता येण्यासारखी आहे. आजच्या या लेखात आपण खरे प्रेम म्हणजे काय? आणि खरे प्रेम कसे ओळखावे याबद्दल माहिती मिळवणार आहोत.
प्रेम म्हणजे काय | love means what in marathi
खरे प्रेम ती भावना आहे जी एखादी वस्तू, व्यक्ती, स्थान, जीव अथवा ईश्वराविषयी तयार होते. प्रेमाचा सरळ संबंध भावनेशी (emotions) आहे. प्रेमाचा हा सिद्धांत प्राणी आणि धार्मिक विश्वासांवरही लागू होतो. उदाहरण म्हणून एखादा व्यक्ती त्याच्या कुत्र्याशी खूप प्रेम करतो, स्वातंत्र्यसैनिकाला स्वातंत्र्याशी प्रेम आहे किंवा एखाद्या व्यक्तीला परमेश्वराशी प्रेम आहे. अशा पद्धतीने प्रेमाचे विविध रूप असतात. प्रेमाला विशिष्ट मर्यादेत बांधता येत नाही. प्रेम स्वछंद उडणाऱ्या पक्ष्याप्रमाणे स्वतंत्र असते.
आजच्या काळात जास्तकरून प्रेम शब्दाला स्त्री पुरुष यांच्या प्रेम प्रसंगाशी जोडून पाहिले जाते. परंतु प्रेम हे जगातील कोणत्याही वस्तुशी अथवा व्यक्तीशी होऊ शकते. प्रेमाच्या प्रभावानेच सृष्टीतील लोक एक दुसऱ्याची मदत करतात, एक दुसर्याच्या जीवनात सहयोग करता. याशिवाय ही प्रेमाचे अनेक रूप आहेत जसे पती पत्नी चे प्रेम, भाऊ बहिणीचे प्रेम, मित्रांचे आपापसातील प्रेम, प्रियकर आणि प्रेयसीचे प्रेम, गुरु आणि शिष्यचे प्रेम इत्यादी. प्रेमाशिवाय मनुष्य जीवन संभव नाही. म्हणूनच प्रेम हेच जीवन आहे असे म्हटले गेले आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरे प्रेम हे नेहमी निस्वार्थ असते, स्वार्थी तर लोक असतात जे त्याला विकृत स्वरूप देतात.
खोटे प्रेम कसे असते असते | fake love in marathi
आता आपण प्रेमाचे दुसरे रूप म्हणजेच 'विकृत प्रेमाबद्दल' समजूया. विकृत प्रेमाचा हे मनुष्याचा स्वार्थ आणि अज्ञानामुळे निर्माण होते. या प्रेमाचे दुसरे नाव वासना असते. वासना हीच प्रेमाचे विकृत स्वरूप आहे. खोट्या प्रेमात इच्छा, क्रोध, दुःख आणि निराशा उत्पन्न होते आणि याच भावनांचे दुष्प्रभाव म्हणून अपराध आणि अधर्म चा जन्म होतो. हे प्रेम मनुष्याला आपल्या पतनाकडे घेऊन जाते. आज समाजात जे मानवी भावनांमध्ये असंतुलन तयार होता आहे, त्यामागील मुख्य कारण निस्वार्थ प्रेमाची कमतरता आहे. सामाजिक नात्यांची गोष्ट तर दूरच राहिली, परंतु आजकाल पिता-पुत्र, भाऊ बहीण, पती-पत्नी यांच्या निस्वार्थ प्रेमातही कमतरता निर्माण झाली आहे.
इत्यादी कारणांमुळे आजकाल प्रत्येक ठिकाणी प्रेमाविषयी तक्रार ऐकायला येतात. काही लोकांना तर प्रेम या नावाशी नफरत झाली आहे. कारण त्यांना प्रेमाचा खरा अर्थ कधी समजलाच नाही.
प्रेमाचा खरा अर्थ काय आहे?
प्रेमाचा खरा अर्थ निस्वार्थ भावनेने समोरच्याला सर्वस्व अर्पण करणे हाच आहे. आपल्या प्रेमीच्या हित आणि आनंदासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करणे खरे प्रेम आहे. प्रेम जीवन देते जीवन घेत नाही. प्रेम परमेश्वराने दिलेली समतुल्य, पवित्र आणि महान वस्तू आहे. मनुष्य या पवित्र प्रेमाला त्याच्या स्तरावरून खाली आणीत आहे. मनुष्याने प्रेमाला इच्छा आणि वासना पर्यंत मर्यादित केले आहे. म्हणून आज हे स्वार्थी प्रेम हत्या आणि आत्महत्याचे सर्वात मोठे कारण बनले आहे.
खरे प्रेम कसे ओळखावे
जर तुम्ही कोणाशी खरे प्रेम करीत असाल परंतु या गोष्टीपासून चिंतीत असाल की तुमचा प्रेमी देखील तुम्हाला असेच निस्वार्थ प्रेम करतो की नाही. तर चला आता आपण जाणून घेऊया की खरा प्रेमी अथवा प्रेमिका चे गुण कोणते आहेत.
सन्मान करणे
मान सन्मान कोणत्याही व्यक्तीचे आभूषण असते. जर तुमचा प्रेमी तुमचा खूप सन्मान करीत असेल व तुमच्या सोबतच इतरांशी देखील सन्मानाने वागत असेल तर तो व्यक्ती निश्चल मनाचा आहे. आजकाल अनेक प्रेमी प्रेमिका आहेत जे वरवर तर एकदुसऱ्याला प्रेम करता परंतु लहान मोठ्या गोष्टीवर शिव्या देणे आणि चारित्र्यावर संशय घेणे असा त्यांचा व्यवहार असतो. जर एखादा व्यक्ती असे करीत असेल तर तो कपटी मनाचा स्वार्थी व्यक्ती आहे.
स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास ठेवणे
खरे प्रेमी स्वतःपेक्षा जास्त एकमेकांवर विश्वास ठेवतात. विश्वास ठेवल्याने एकमेकांमधील नाते आणखी मजबूत होते. जर तुमचा प्रेमी/प्रेमिका तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल आणि तुमच्या लहान-मोठ्या गोष्टीवर संशय करीत असेल तर अश्या व्यक्तीपासून दूर राहिलेले च चांगले.
काळजी घेणे
खरे प्रेमी/प्रेमिका एकमेकांची नेहमी काळजी घेतात. त्यांना स्वतःपेक्षा जास्त आपल्या प्रेमिची चिंता असते. जर प्रेमी/प्रेमिका वाईट परिस्थितीतून जात असेल तर अशावेळी एक खरा प्रेमी नेहमी विश्वास आणि काळजी घेतो. एका आईप्रमाणे निस्वार्थ भावनेने आपल्या प्रेमी ची काळजी करतो.
नेहमी खरे बोलणे
खरा प्रेमी तुमच्याशी नेहमी खरे बोलेल. त्याचा काही भूतकाळ असेल तर त्याबद्दलची माहिती तो तुम्हाला आधीच देईल. जर तुम्ही देखील कोणावर प्रेम करीत असाल परंतु त्याला आपला भूतकाळ सांगितला नसेल तर न घाबरता सर्वकाही सांगावे. कारण खरे प्रेम हे शरीरावर होत नसून हृदयावर केले जाते. खरे प्रेम तुमच्या सर्व चुकांना माफ करायला तयार असते..
प्रेमात नमुन जाणे
चूक कोणाचीही असो परंतु एक खरा प्रेमी/प्रेमिका नाते वाचवण्यासाठी नेहमी माघार घेतो आणि सॉरी बोलतो. एका खऱ्या पार्टनर चे कर्तव्य आहे की आपापसातील नाते खराब होऊ नये म्हणून कठीण परिस्थितीत माघार घेऊन नमुन जाणे.
स्वातंत्र्य देणे
खऱ्या प्रेमात तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य असते. खरे प्रेम एका स्वातंत्र्य पक्ष्याप्रमाणे असते जो कुठेही उडू शकतो. कधीही निर्बंध लावून खरे प्रेम मिळवले जाऊ शकत नाही. खऱ्या प्रेमात प्रत्येकाला आपले विचार आणि धर्म प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य असते.
No comments: