Full Width CSS

कलम 144 काय आहे ? | article/kalam 144 in marathi

 kalam 144 in marathi : आपण कलम 144 बद्दल कधी न कधी ऐकलेच असेल. जम्मू-काश्मीर सारख्या अशांत प्रदेशात, दंगे होत असलेल्या ठिकाणी आणि आजकाल लॉकडाऊन मध्येही अनेक ठिकाणी कलम 144 लागू करण्यात येतो. परंतु आपल्या मनातही कधी न कधी हा प्रश्न आला असेल की कलम किंवा धारा 144 काय आहे आणि ही का लागू केली जाते.

आजच्या लेखात कलम 144 बद्दलची माहिती देण्यात आली आहे. तर चला कलम 144 काय आहे हा लेख सुरु करूया...


144 kalam in marathi

कलम 144 काय आहे व का लावले जाते ?

जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षेत्रात नागरिकांच्या व मालमत्तेच्या सुरक्षेसंबंधी धोका किंवा दंगा स्थिती निर्माण होते तेव्हा त्या प्रदेशात शांतता कायम करण्यासाठी कलम 144 लागू करण्‍यात येतो.

1973 च्या फौजदारी प्रक्रिये नुसार कलम 144 एका कार्यकारी दंडाधिकार्याला अशांत स्थितीत तत्काळ आदेश जारी करण्याचे अधिकार देते. कलम 144 जास्त करून शांतता व्यवस्था कायम करण्यासाठी लागू केला जातो. 


कलम 144 लावल्यानंतर काय होते ?

जेव्हाही कोठे सेक्शन 144 लागू करण्यात येते तेव्हा त्या विशिष्ट ठिकाणी कोणत्याही जागी चार किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या एकत्रित जमण्यावर बंदी लावण्यात येते. या शिवाय ज्या जागी हा कलम लावण्यात आला आहे तेथे हत्यारांची देवाण घेवाण ही थांबविण्यात येते. कठीण परिस्थितीत कधी कधी इंटरनेट व टेलिफोन सेवादेखील बंद कराव्या लागतात. 

कलम 144 मध्ये शासनाचे मुख्य ध्येय लोकांच्या एका ठिकाणी एकत्र येण्यावर रोक लावणे असते. कोरोना काळात महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अनेकदा कलम 144 लावण्यात आले आहे. याचा मुख्य उद्देश लोकांना घरातून बाहेर पडून एकत्रित येण्यावर बंदी घालने हाच आहे, जेणेकरून कोरोनाचे संक्रमण कमी करण्यास मदत होईल. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये ही अनेकदा कलम 144 लावण्यात येते.




कलम 144 चे उल्लंघन केल्यावर काय होते

जर कोणी व्यक्ती कलम 144 चे उल्लंघन करताना आढळला असेल तर भारतीय राज्यघटनेनुसार त्याला शिक्षा होऊ शकते. हा कलम सीआरपीसी 1973 नुसार असतो. कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. 


कलम 144 काय आहे ? | article/kalam 144 in marathi कलम 144 काय आहे ? | article/kalam 144 in marathi Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on April 01, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.