|| जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची
|| सवय असते. जेवताना पाणी पिणे हे काहींना अगदी
|| गरजेचे वाटते. पण जेवताना पाणी पिणे ही नकळत
|| जडलेली सवय असली तरीही यामुळे तुमचे आरोग्य
|| धोक्यात येऊ शकते.
१ } खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन करून शरीराला
|| उर्जा पुरवण्याचे प्रमुख पोटातील एंजाईम्स करत असतात.
|| पण जेव्हा हा रस पाण्यात विरघळून जातो तेव्हा
|| पचनक्रियेसोबतच आतड्यांमध्ये क्रॅम्स येणे, दुखणे अशा
|| समस्या अधिक उद्भवतात.
२ } यामुळे सारी पचनक्रिया संथ होते आणि बराच वेळ
|| अन्न पोटात साचून राहिल्याने छोट्या आतड्याचे
|| कार्यदेखील रेंगाळते. परिणामी शरीराला अन्नातून
|| आवश्यक पोषणद्रव्यं मिळत नाहीत.
३ } जर तुम्ही जेवताना पाणी सतत प्यायल्यास लाळ
|| पाण्यामध्ये विरघळते. यामुळे तोंडात अन्नाचे विघटनही
|| होण्याची प्रक्रिया कमी होते. तसेच पचनक्रियादेखील
|| मंदावते
४ } जर तुम्हांला सतत पित्ताचा त्रास होत असेल तर
|| जेवताना पाणी पिण्याची सवय हेदेखील यामागील एक
|| कारण असू शकते. यामुळे डायजेस्टिव्ह एंन्जाईम्सदेखील
|| कमी प्रमाणात शोषली जातात. त्यामुळे पित्त वाढणे,
|| छातीत जळजळ वाढणे अशा समस्या वाढतात.
५ } जेवताना पाणी प्यायल्याने ब्लड शुगरचे प्रमाण वाढू
|| शकते. कारण जेव्हा खाल्लेल्या अन्नपदार्थांचे नीट पचन
|| होत नाही तेव्हा त्याचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होऊन
|| शरीरात काही घटक मेदाच्या स्वरूपातच शरीरात साठून
|| राहतात.
No comments: