Full Width CSS

Vat Savitri Vrat 2022 : जाणून घेऊया वटपौर्णिमा मुहूर्त आणि पूजनविधी

 


Vat Purnima Vrat 2022 : ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊया केव्हा आणि कधी आहे व्रत...

सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊया केव्हा आणि कधी आहे व्रत.
वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. आधुनिक काळात वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे. मात्र, तसे करू नये, असा सल्ला दिला जातो. वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाला पूजण्याचा संपूर्ण स्त्री जातीच्या सन्मानाचा सण. वटपौर्णिमा सणाला वडाच्या झाडाला महत्व आहे. वड हा आपल्या सावलीत आंपल्या सानिध्यात अनेक जिवन उपयोगी घटकांना वाढवत राहतो. म्हणून वडाची पूजा करण्यामागे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी ची जाणीव पेरणे हा ही एक उद्देश आहेच.
Vat Savitri Vrat 2022 : जाणून घेऊया वटपौर्णिमा मुहूर्त आणि पूजनविधी  Vat Savitri Vrat 2022 : जाणून घेऊया वटपौर्णिमा मुहूर्त आणि पूजनविधी Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 01, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.