आजीबाईचा बटवा
* आम्ल पित्त-उपाय* 1) केळी- केळी खाल्याने त्यातील पोटॅशियममुळे पोटात आम्ल तयार होण्याची प्रक्रिया मंदावते व त्यातील 'फायबर' शरीराची पचनक्रिया सुलभ होऊन पित्त कमी होते. म्हणून किमान एखादे पिकलेले केळे खाल्ल्याने पित्ताचा त्रासा पासून आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक दघटक म्हणून कार्य करतो व त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो.
2) तुळस पित्त झाल्यास तुळशीचे 5-6 पाने दर एक तासांनी चावून चघळा. तुळशी मधील ऍन्टीअल्सर घटक पोटातील वा जठरातील आम्लातून तयार होणाऱया विषारी घटकांपासून बचाव करते.
3) दूध
दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबून अतिरिक्त आम्ल दूध खेचून घेते आणि त्याचे अस्तित्व संपवते. म्हणून पित्त असलेल्यांनी थंड दूध प्यायल्यास पित्तामुळे पोटात व छातीत होणारी जळजळ कमी होते. मात्र हे थंड दूध साखर वा इतर काहीच न मिसळता प्यावे. चमचाभर साजूक तूप घातले तरी चालेल.
4) बडीशेप
बडीशेपमधील ऍन्टीअल्सर हा घटक पचन सुधारतो व बद्धकोष्ठता दूर करतो. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. म्हणून दर दोन तासाने 1 लहान चमचा बडीसौफ दाणे खाल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. ज्यांना नेहमी पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
5) जिरे ज्यांना पित्ताचा त्रास होत असल्यास त्यांनी सकाळ संध्याकाळ एक वाटी पाण्यास 1 मोठा चमचा जिरे टाकून ते उकळावे व 1/2 वाटी झाल्यावर तो काढा कोमट असतांनाच प्यावा. किंवा सकाळ -दुपार-संध्याकाळ 1 लहान चमचा जिरे चावून त्याची लाळ गिळावी
त्या मुळे पचन क्रिया सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात.
5) लवंग
लवंग चावून लाळ गिळावी. त्यामुळे पचन क्रिया सुधारून पित्त दूर दूर होते तसेच पोटफुगी व गॅसचे विकारही दूर होतात. पित्ताचा जास्त त्रास होत असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा. त्यातून येणारा रस काही काळ तोंडातच राहू द्या. या रसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.
6) आवळा
आवळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील 'व्हिटामिन सी' अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. म्हणून रोज चमचाभर आवळ्याची पावडर घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही. तसेच कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीराला सर्व रस मिळतात.
7) वेलची
दररोज 2 तरी वेलची खाल्याने शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्यास मदत होऊन पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. 2 वेलची ठेचून (सालीसकट / सालीशिवाय) ते एक वाटी पाण्यात टाकून 1/2 वाटी काढा करा व थंड प्या.
7) पुदिना
पुदिन्यातील थंडाव्यामुळे पचनक्रिया सुधारून पोटदुखी व जळजळ थांबते. पित्त असलेल्यांनी पुदिन्याची पाने कापून पाण्यासोबत उकळून घ्यायची. थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरही पुदिना गुणकारक आहे. पुदिन्यातील 'मेन्थॉल'मुळे पचायला जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी आणि सर्दी पासून सुटका होते.
8 अद्रक (आले)*
अद्रक रस पिल्याने पचन क्रिया सुधारते. पोटातील अल्सर चा त्रास कमी होण्यास मदत होते. अद्रक मधील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा. आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या. आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गुळ टाकून चघळत राहा.
No comments: