Full Width CSS

लहान मुलांना रोज काय भरवावं ?



 लहान मुलांना रोज काय भरवावं ? 

                 या विचारात नेहमी पालक असतात. बाळ 6 महिने चे होई पर्यंत स्तनपान चालू च असते. बाळ 6-7 महिन्यांचे झाले कि हळू हळू आपण त्याला दूधाव्यतिरिक्तचे अन्न पदार्थ द्यायला सुरुवात करतो . सुमारे मुल 1 ते 3 वर्षाचे झाल्यावर साधरणतः सगळ्या प्रकारचे अन्न जे पचायला हलकं आणि गिळायला सोप्प असे सगळे पदार्थ खाऊ शकतात. फक्त मुलाला कोणत्या पदार्थाची ऍलर्जी नाही ना हे जाणून घ्या.पातळ आणि पेजेसारखे पदार्थ कमी करून हळू-हळू सामान्य जेवणाची सवय बाळांना लावायची वेळ आली आहे. पण जर मुलांना अजून चावायला आणि गिळायला त्रास होत असेल किंवा जमत नसेल तर मात्र त्याला जबरदस्ती करू नका. आहार हा बाळाच्या वाढीसाठी, वाढत्या हालचाली साठी तसेच खेळण्या साठी फार महत्त्वपूर्ण मानला जातो.


 नवजात मुलांसाठी हे 4 प्रकारचे आहार महत्वाचे आहे. 

फलभाज्या व फळे

कडधान्ये

दूध व दुग्धोजन्या पदार्थ

मांस व इतर पदार्थ


बाळ दिड ते दोन वर्षाचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवावे . तसेच बाळ जसे मोठे होत राहील तसेच आईच्या दुधासोबतच भाताची पेज, डाळीचे पाणी, मटणाचे सुप, नाचणीची किंवा डाळ, तांदळाची पेज, फळांचा रस दयावा . हा आहार बाळाच्या वाढीसाठी मदत करतो . तसेच काही दिवसांनी म्हणजे जेव्हा बाळ दीड ते दोन वर्षाचे होईल तेव्हा वरण, भात, उकडलेला बटाटा दुधात कुस्करून, पोळी दुधात बारीक करून, फळे दयावे . आणि जेव्हा बाळ अडीच वर्षे पूर्ण करेल त्यानंतर त्याला घरात जेवणासाठी जे तयार केलेले पदार्थ असतील . तेच थोडे कमी तिखट करून या वयातल्या मुलांना देता येते.   


 मुलासाठी द्रवपदार्थ पेय असणे आवश्यक आहे 

बाळ दोन वर्षांचे होइपर्यंतच त्याला आईचे दूध द्यावे. बाळाला जेवढे पानी पाजत येईल तेवड़े छान असते . जेवताना अधूनमधून बाळाला पाणी पाजले पाहिजे. जर बाळ अता आईच्या दूधावर अवलंबून नसेल तर त्याला रोज 200मिलिलीटर म्हणजे सुमारे 2 कप गाईचे दूध द्यावे. बाळाला फळाचे रस देण्याची घाई करु नैये. फळाचा रस देत अस्लयास तो कमी प्रमाणात म्हणजे सुमारे 125मिलिलीटर (अर्धा कप ) च द्यावा . चहा कॉफी सारखी पेय लहान बाळाला हानिकारक असू शकतात. असे कोणतेच पेय बाळाला पाजू नये.


 जेवण कधी भरवावे 

दिवसातून कमीत कमी तीन वेळा तरी लहान प्रमाणात आहार बाळाला द्यावा  . जेवणाच्या रोज च्या वेळा पाळाव्यात . त्यात बदल घडवून आणू नये . फरक पडल्यास तो जास्ती जास्त 15 मिनिटे असावा . या मुले बाळाला नियमित पणे वेळे वर जेवयाची छान सवाई लागते . बाळाला जेवायला वेळ लागल तर लागू द्या जेवण पट्कन उरकू नका.


 बाळाचे जेवण व्यवस्थित कसे भरवावे ? 

बाळाला सतत नवनवीन चवी चे जेवण देत रहावे त्यामूळे त्याची खाण्याची रुची निर्माण होते  . बाळ जेवत असताना त्याच्या सोबत बसुन जेवावे . त्यातुन त्याला बरच कही शिकायला मिळते. एकच प्रकारचे जेवण वेगळ्या पद्धतीने भरवण्याचा प्रयन्त करावा . बाळाच्या आवडीचे खाद्य अनेकदा त्याला भरवावे . बाळाला खेळणी खेळत जेवण भरवावे . हसत खेळत जेवण व्यवस्थित पार पडते.


 एलर्जी  सावध रहा

बाळाला अनेकदा एलर्जी असल्याचे समोर आले आहे . सर्वसाधारण पणे दूध, आंडी, सोयाबीन, गहू, मासे इत्यादि ची एलर्जी असायची शक्यता असते . काही बाळाला यचा फारसा फरक पडत नाही. पण जर बाळाला एलर्जी असल्याचे दिसून आल्यास लगेच संबंधित डॉक्टर चा सल्ला घ्यावा.


बाळाला चा आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यावर च बाळाची शरीरिक,मानसिक, बौधिक विकास अवलंबून असतो. त्यामूळे आहार कडे लक्ष दिले पाहिजे.

लहान मुलांना रोज काय भरवावं ?  लहान मुलांना रोज काय भरवावं ? Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on November 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.