शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक महत्त्वाची बातमी, शासना अंतर्गत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्यानुसार शेतकऱ्यांच्या मुलांना दहावी पास असेल तरीसुद्धा खत व बियाण्यांचा व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात येणार आहे त्यामुळे, सर्वांनी घेतलेल्या निर्णयानुसार दहावी पास तरुणांना फक्त एक पंधरा दिवसाचा कोर्स पूर्ण करून प्रमाणपत्र मिळून सहजरीत्या खत बियाणे व्यवसाय सुरू करता येईल.
शेतकऱ्याच्या मुलाला दहावी पास असणे गरजेचे आहे दहावी पास असल्यास मुलाला पंधरा दिवसाचा अभ्यासक्रम पूर्ण करून एक प्रमाणपत्र मिळवावे लागेल. त्यानंतर अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्यात येईल व परीक्षेमध्ये मुलांना पास होणे गरजेचे असते पास झाल्यानंतर मुलाला प्रमाणपत्र देण्यात येईल.
दहावी पास असलेल्या मुलाला अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर खत बियाणे व्यवसायासाठीचा परवाना मागता येतो. व परवान्यासाठी अर्ज करावा लागेल. शासनानंतर वर घेण्यात आलेल्या निर्णयाचा उद्देश म्हणजे चांगल्या प्रकारचे उत्पन्न या क्षेत्रांमधून मिळू शकणार आहे. व तरुणांना सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे स्थान मिळू शकते अशा प्रकारे दहावी पास असलेल्या तरुणाला सुद्धा खत बियाणे व्यवसाय चालू करता येणे शक्य होणार आहे.
No comments: