Full Width CSS

लेक लाडकी योजना 2024 अर्ज सुरू, आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती



राज्यामध्ये लेक लाडकी योजना 2024 चालू करण्याबाबत अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आलेली होती, त्यानुसार लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश मुलीचे सक्षमीकरण वाढवणे हा आहे, तसेच मुलीच्या जन्म दरात वाढ होणे हा सुद्धा मुख्य उद्देश योजनेचा मानला गेलेला आहे. योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना लाभ घेता येईल, योजनेतून मिळणाऱ्या रकमेमुळे मुलीच्या शिक्षण व विवाहाचा खर्च सुद्धा भागवल्या जाणार आहे, मुलींचा जन्म झाल्यानंतर ती मुलगी लखपती होणार आहे. आतापर्यंत तरी शासन निर्णय आलेला असला तरी सुद्धा अर्ज प्रक्रिया निश्चित करण्यात आलेली नव्हती परंतु आता लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

 

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना एकूण 1 लाख 1 हजार रुपये एवढी एकूण रक्कम देण्यात येईल, मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपयाची रक्कम डीबीटी द्वारे खात्यात हस्तांतरित केली जाईल. जेव्हा मुलगी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश करेल तेव्हा 6 हजार रुपये. 6 वी त 7 हजार रुपये.11 वि त 8 हजार रुपये,11 वर्ष नंतर 75 हजार रुपये.

लेक लाडकी योजना 2024 मुख्य उद्देश:

  • राज्यातील मुलींचे सक्षमीकरण व्हावे हा मुख्य उद्देश असून इतर सुद्धा उद्देश योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेली आहे.
  • मुलीचा जन्मदर वाढवणे हा एक मुख्य हेतू योजनेचा आहे.
  • कुपोषण कमी करण्यावर सुद्धा योजनेअंतर्गत भर दिला गेलेला आहे.
  • मुलींच्या शिक्षणाला चालना देणे हा मुख्य उद्देश एक लडकी योजनेचा असून मुलींना साक्षर करणे हा आहे.

 

लेक लडकी योजनेच्या अटी व शर्ती

 

  1. योजनेअंतर्गत फक्त महाराष्ट्रातील मुलींना लाभ घेता येईल महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातील मुलींना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  2. पिवळ्या व केशरी शिधापत्रिक कुटुंबातील मुलींना लाभ घेता येईल.
  3. एक एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना योजना लागू राहणार आहे म्हणजे योजनेचा लाभ घेता येईल.
  4. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असू नये जास्त असल्यास योजने अंतर्गत पात्र ठरता येणार नाही.

 

लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. पिवळे अथवा केशरी शिधापत्रिका
  2. मुलीच्या जन्माचा दाखला
  3. वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असल्याचा तहसीलदार यांचा दाखला
  4. लाभार्थ्याचे आधार कार्ड (प्रथम लाभावे, अटी शिथील राहील)
  5. बँकेची पासबुक
  6. लाभार्थीच्या पालकाचे आधार कार्ड
  7. लाभार्थ्याची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदान कार्ड
  8. शेवटच्या टप्प्याच्या वेळी शिकत असल्याचा दाखला
  9. अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अंतिम टप्प्याच्या वेळेस विवाह न झाल्याबाबतची स्वयंघोषणापत्र

 

 

 

लेक लाडकी योजना 2024 अर्ज प्रक्रिया

Lek ladaki yojana 2024 योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करत असताना मुलीचा जन्म झाल्यानंतर जन्माची नोंदणी करून घ्यावी व त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे संबंधित आवश्यक असणाऱ्या संपूर्ण कागदपत्रासह विहित नमुन्यातील अर्ज भरून सादर करावा. विविध नमुनेतील अर्ज प्राप्त करण्यासाठी खाली दिलेल्या जीआर वाचून त्या खाली विहित नमुन्यातील अर्ज सुद्धा देण्यात आलेला आहे त्यावरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल.

लेक लाडकी योजना 2024 अर्ज सुरू, आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती लेक लाडकी योजना 2024 अर्ज सुरू, आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on January 28, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.