Full Width CSS

भटके – विमुक्त समाजातील नागरिकांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहीम



 भटके – विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मुलभूत दस्ताऐवज आहे. 

त्यामुळे राज्यातील भटके – विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा या उद्देशाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे 15 जानेवारी ते 14 मार्च 2024 या कालावधीत  शिधापत्रिका वितरणाची विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार राज्यात अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत लाभार्थी निवड करताना अनुक्रमे 44 हजार रुपये आणि 59 हजार रुपये इतकी वार्षिक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

या अनुषंगाने विशेष मोहीम राबवताना नियमानुसार पडताळणी करुन भटके व विमुक्त समाजाच्या नागरिकांना इष्टांकाच्या मर्यादेत शिधापत्रिका वितरीत करून शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय लाभ देण्यात येणार आहेत. तरी भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

भटके – विमुक्त समाजातील नागरिकांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहीम भटके – विमुक्त समाजातील नागरिकांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहीम Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on January 18, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.