Full Width CSS

आदिवासी मुला मुलींचे शासकीय वसतिगृह ऑनलाइन प्रवेश सुरू

⬛️ योजनेचे स्वरूप : अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणाची सोय व्हावी व त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी या उद्देशाने सदर योजना सुरू करण्यात आलेली आहे. शासकीय वसतिगृहात गुणवत्तेनुसार प्रवेश देऊन त्यांना निवास, भोजन, आंथरुण, पांघरुण, पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक साहित्य मोफत पुरविण्यात येते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे निर्वाहभत्ता अदा करण्यात येते. विभागीयस्तर - रुपये 800/- जिल्हास्तर - रुपये 600/- तालुकास्तर - रुपये 500/- या व्यतिरिक्त मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठी दरमहा - रुपये 100/- अदा करण्यात येते. ⬛️ लाभार्थी पात्रता : विद्यार्थी आदिवासी व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लक्ष पेक्षा कमी असावे. तालुकास्तरावर प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा इयत्ता 7 वी पास असणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा इयत्ता 10 वी पास असणे आवश्यक आहे. विभागीयस्तरावर प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा इयत्ता 12 वी पास असणे आवश्यक आहे. ⬛️ विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी : थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) अनुषंगाने शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या/घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी. Upload clear scan copy of original documents. विद्यार्थ्यांनी कागतपत्रांची स्वच्छ प्रत संकेत स्थळा मार्फत सादर(Upload ) करावी. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंद (entry) करावा. मोबाईल क्रमांकाची नोंद करताना सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकासोबत registered असावा. आधार संलग्न मोबाईल क्रमांकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थी पडताळणी करणे सोपे होईल. विद्यार्थ्यांनी त्यांचा बँक खाते क्रमांक नोंद (entry) करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करावी. बँक खाते कार्यरत नसल्यास योजनेंतर्गत लाभ देताना अडचणी येतात. तसेच सदर बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास संबंधित बँक शाखेत जाऊन ते आधार संलग्न करून घ्यावे. ऑनलाईन अर्ज करताना अभ्यासक्रम/शिक्षण संस्था उपलब्ध नसल्यास/दिसत नसल्यास याबाबत अशा प्रकरणी संबंधित प्रकल्प कार्यालयात भेट देऊन ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावी. प्रवेश प्रक्रीये संदर्भात अर्ज स्थिती संकेत स्थळावर वेळो वेळी भेट देऊन जाणून घेणे हि विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल, या बाबत आपणास स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही. अर्ज करताना अर्जात चुकीची माहिती सादर केल्यास, जर अर्ज रद्द झाला किंवा लाभ मिळण्यास विलंब अथवा लाभ रद्द झाल्यास त्यास सर्वस्वी अर्जदार जबाबदार राहील. ⬛️ आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड 2. जातीचा दाखला किंवा जात पडताळणी सर्टिफिकेट 3. बँक चे पासबुक 4. कॉलेज चे बोनाफाईड सर्टिफिकेट 5. शासकीय दवाखान्याचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट 6. उत्पन्नाचा दाखला 7. मागील वर्षीचे मार्कशीट 8. दहावीचे मार्कशीट 9. शाळा सोडल्याचा दाखला नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
आदिवासी मुला मुलींचे शासकीय वसतिगृह ऑनलाइन प्रवेश सुरू आदिवासी मुला मुलींचे शासकीय वसतिगृह ऑनलाइन प्रवेश सुरू Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 14, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.