एस टी महामंडळाचा मोठा निर्णय, बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेत मोठा बदल Balasaheb Thakare Kanyadan Yojana 2022.
नमस्कार कर्मचारी मित्रानो एस टी महामंडळ मार्फत ST कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना (Balasaheb Thakare Kanyadan Yojana 2022.) राबविली जाते. त्यात 2016 च्या नंतर जन्मलेल्या मुलींच्या नावे 17500 रुपये ठेवले जातात.जेंव्हा मुलगी 21 वर्षाची होईल त्यावेळेस एकरकमी मुलीच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये दिले जातील अशी योजना आहे. आता या योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन आता यापुढे स्वतःच्या मुलीसोबतच दत्तक घेतलेल्या मुलींना सुद्धा बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
✅️ यांना होणार योजनेचा लाभ.
आता यापुढे स्वतःच्या मुलीबरोबरच सर्व कागदपत्रांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दत्तक घेतलेल्या मुलींना याचा लाभ मिळेल.यामध्ये,
- मुलगी असलेले पालक
- अपत्य नसलेले पालक तसेच,
- घटस्फ़ोटीत महिला,
- विधवा महिला,
- घटस्फोटीत पुरुष.
- यांनी जर एखादी मुलगी दत्तक घेतली तर त्यांना याचा लाभ मिळेल.
हे कागदपत्रे लागतात.
- कर्मचाऱ्यांचा अर्ज 2 प्रती
- मुलीचा जन्मदाखला 5 प्रती.
- आधार कार्ड ( मुलगी, आई वडील ) 5 प्रती.
- पॅनकार्ड ( आई- वडील ) 5 प्रतिमध्ये.
- पासपोर्ट फोटो – मुलगी, मुलीचे आई वडील 5 प्रती.
- एस टी सी बी बॅंकपासबुक झेरॉक्स – 5 प्रती
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
No comments: