कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, कांदाचाळीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान Kandachal Anudan 2023.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, कांदाचाळीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान Kandachal Anudan 2023.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतक-यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. Kandachal Anudan 2023.आपल्याला माहितीच आहे कि, कांदा पीक उत्पादनात भारत अग्रेसर आहे. कांदा उत्पादनात आपला जगात दूसरा क्रमांक लागतो. तर कांदा उत्पादक राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे.
राज्यामध्ये कांदा पिकाची लागवड प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात नाशिक,अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर,विदर्भात बुलढाणा तर खानदेशात जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते. महाराष्ट्रातच कांदा पिकाचे सर्वाधिक म्हणजेच साधारण १ लाख हेक्टरवर उत्पादन घेतले जाते.
पण कांदा हा नाशवंत पिक असल्याने जास्त काळ टिकविणे शक्य नाही यासाठी कांदा चाळीची नितांत आवश्यकता असते. आणि त्याकरताच राज्य सरकारकडून कांदा चाळीसाठी विविध योजना राबवल्या जातात आणि त्यावर अनुदान हि दिले जाते.
या योजनेत 5,10,15,20,25 व 50 मे. टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी ५० टक्के किंवा ३५ हजार प्रती मे. टन इतके अनुदान रुपात अर्थसहाय्य दिले जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत?
- शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असावी.
- अर्जदाराच्या स्वतःच्या मालकीची जमीन असावी.
- अर्जदाराकडे कांदा साठवणूक केलेली असावी.
- अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळी चा लाभ घेतलेला नसावा.
- सहकारी विपणन संघ
- शेतकरी महिला गट.
- नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था.
- शेतकऱ्यांचा गट.
- स्वयंसहायता गट.
- शेतकरी उत्पादक संघ.
- शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?
आधारकार्ड
जात प्रमाणपत्र (अर्जदार अनुसूचित प्रवर्गातील असल्यास)
बँक पासबुकची प्रत (खाते आधारशी लिंक असणे आवश्यक)
यापूर्वी कुठल्याच योजनेअंतर्गत कांदाचाळी चा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👉 विशाल मल्टीसर्विसेस व नोकरी मदत केंद्र
(आपल्या हक्काच ऑनलाइन सेंटर) 🚩🌱
मो नंबर - 8788149872/9511756569/7028270092
No comments: