प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून काही नियम बदलले जातात त्याचा थेट परिणाम सर्व सामान्यांच्या खिशावर होतो. अशातच मार्च महिन्यातही काही बदल करण्यात आले आहेत. यावेळी 2000 रुपयांची नोट, एलपीजीची किंमत आणि ट्रेनच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल होणार आहेत.
💁♂️ 1 मार्चपासून ग्राहकांना इंडियन बँकेच्या एटीएममधून 2000 रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. जर ग्राहकांना दोन हजार रुपयांच्या नोटा हव्या असतील तर बँकेच्या शाखेत जाऊन काढाव्या लागतील .
💁♂️ एलपीजी कंपनी दर महिन्याच्या सुरुवातीला तेल वितरण कंपन्यांमध्ये सुधारणा करत असते. मात्र गेल्या महिन्यापासून यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्या 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईमध्ये 1052.50 रुपये आहे.
💁♂️ मार्चमध्ये होळीचा सण लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 1 मार्चपासून अनेक विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. या गाड्या दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबईसह अनेक मार्गादरम्यान धावतील.
No comments: