Full Width CSS

अबब! आधार अपडेट करण्यासाठी चक्क दीडशे रुपये? आधार बाबत सर्वकाही जाणून घ्या.

 



आधार कार्ड सर्व शासकीय योजनेसाठी अनिवार्य केले असल्याने नागरिकांना पत्ता बदलणे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी बदलणे तसेच बायोमेट्रिक अपडेट गरजेनुसार करावे लागते. सोलापूर जिल्ह्यात अनेक आधार नोंदणी केंद्रांवर फक्त मोबाईल नंबर अपडेट केला तरी १५० रुपये आकारले जात आहेत.

 

एकाच वेळी एकापेक्षा जास्त दुरुस्ती असल्यास काही केंद्र चालक तर अक्षरशः दोन्ही दुरुस्तीचे वेगवेगळे दर आकारून जनतेची लूट करीत असल्याची माहिती मिळत आहे. काही ठिकाणी सरसकट १०० रुपये दर आकारले जात आहेत तर काही ठिकाणी १५० रुपये. जिल्ह्यातील अनेक आधार केंद्र त्यांना नेमून दिलेल्या शासकीय कार्यालयात काम न करता स्वत:च्या दुकानात आधार नोंदणी करीत असल्याने ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिलेली आहे त्यांचा कंट्रोल या केंद्र चालकांवर राहिलेला नाही.आधार नोंदणी आणि दुरुस्तीचे दर:

  • नवीन आधार नोंदणी पूर्णपणे मोफत आहे.

  • १५ वर्षाखालील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट पूर्णपणे मोफत आहे.

  • मोबाईल नंबर, ई मेल आयडी, पत्ता, नावात बदल करण्यासाठी ५० रुपये.

  • १५ वर्षांवरील नागरिकांचे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी १०० रुपये दर केंद्र शासनाने ठरवून दिलेला आहे.

 

अनेक वेळा नवीन लग्न झालेल्या स्त्रीकडे पतीकडील नावाचा पुरावा नसतो. अशा प्रकरणात अनेक केंद्र चालक बनावट मतदार कार्ड तयार करून नाव बदलून देण्यास हजारो रुपये आकारत असल्याची माहिती मिळत आहे. बनावट मतदार कार्ड तयार करून पाकिस्तानी, बांगलादेशी आणि म्यानमार येथील नागरिक आधार कार्ड सहज मिळवू शकतात. एकदा आधार कार्ड तयार झाले की नंतर पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार यादीत नाव नोंदवणे सहज शक्य होत असल्याने सहज भारतीय नागरिकत्व प्राप्त करू शकतात ही देशाच्या सुरक्षेसाठी घातक बाब आहे.

 

मतदार ओळखपत्र वरून ज्या नागरिकांचे आधार कार्ड तयार करण्यात आले आहे अशा सर्व आधार धारकांचे विद्यमान मतदार ओळखपत्र क्रमांक आणि आधार नोंदणीवेळी वापरलेले मतदार कार्ड ओळखपत्र क्रमांक तपासून पाहिल्यास बनावट आधार कार्ड धारक आणि बनवून देणारे आधार नोंदणी केंद्र समोर येतील असे प्रशासनातील जाणकारांचे मत आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील महा आयटी समन्वयकाचे सर्व केंद्र चालकांशी आर्थिक संबंध असल्याने निरपेक्षपणे चौकशी होणार नसल्याचा एक मतप्रवाह जिल्ह्यात दिसून येतो.

 

जिल्ह्यातील आधार केंद्रांवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांचे सर्व आधार नोंदणी केंद्रांवर नियंत्रण असते मात्र अनेक अधिकाऱ्यांना आधार यंत्रणा कशी चालते याबाबत माहितीच नसल्याने आणि जिल्हा समन्वयक पूर्ण माहिती देत नसल्याने जिल्हा आणि तालुक्यातील अधिकाऱ्यांना आधार बाबत पूर्ण माहिती मिळत नाही. याचा गैरफायदा काही आधार नोंदणी केंद्र चालक घेत आहेत.
असे प्रकार कुर्डूवाडी शहर, सोलापूर शहर आणि इतरत्रही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

 

सदरील प्रकरण गंभीर असून जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि मुंबई येथील uidai च्या अधिकाऱ्यांनी इलेक्शन कमिशन यांच्या समन्वयाने या प्रकरणात लक्ष देऊन मतदार कार्डचा वापर करून नोंदणी झालेले सर्व कागदपत्र तपासले तरच सर्व बाबी समोर येतील.

sbi mudra loan

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
अबब! आधार अपडेट करण्यासाठी चक्क दीडशे रुपये? आधार बाबत सर्वकाही जाणून घ्या. अबब! आधार अपडेट करण्यासाठी चक्क दीडशे रुपये? आधार बाबत सर्वकाही जाणून घ्या. Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 27, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.