नोकरीसाठी जशी शिक्षणाची डिग्रीची गरज आहे. तशी गरज राजकारणामध्ये का नाही?
नोकरीमध्ये तरुणांना जेवढे ज्यादा शिक्षण एज्युकेशन डिग्री यावर संबंधित तरुणाचे भवितव्य ठरले जाते. तरुणांचे एज्युकेशन जेवढे उत्तम असेल त्यावर त्याला नोकरी दिली जाते. मंग राजकारणामध्ये दीड-दमडीचे सडकछाप भनंगभुंगे कुणीही आमदार खासदार मंत्री होतो. तेव्हा त्या शिक्षणाची व्हॅल्यू शिक्षणाची किंमत पायदळी तुडवून शून्य ठरविली जाते. आज असे अनेक आमदार खासदार मंत्री होऊन गेलेले आहेत. ज्यांना कोणतेही शैक्षणिक ज्ञान नाही. मात्र तरीही त्यांना संविधानिक पदावर बसवून त्या खुर्चीचा त्या पदाचा अपमान केला जातो. राजकारणामध्ये कोणीही भनंगभुंगे येऊन लोकांना विनाअभ्यास पूर्ण ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात. ही परिस्थिती कधी बदलणार? आज प्रत्येक ठिकाणी शिक्षणाची अट आहे. शिक्षणाची गरज आहे. मात्र ज्या संविधानिक पदावर बसवून आम्ही देशाचा राज्याचा राज्य कारभार चालवितो त्यासाठी मात्र शिक्षणाची गरज नाही का? ज्या संविधानिक पदावर अनेक अशिक्षित नेते निवडून दिले जातात. त्यांच्या हाताखाली शिक्षित लोकांना काम करावे लागते. मंग यापेक्षा दुदैवी गोष्ट कोणती असेल! भारतरत्न शिक्षणाचे महामेरू देशाचे विश्वरत्न महारत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे. शिक्षणाशिवाय माणूस अधुरा आहे. शिक्षणाशिवाय उन्नती नाही. शिक्षणाशिवाय गती नाही. मंग राजकारणामध्ये अशिक्षित नेते न शिक्षण घेता कसे पुढे जातात हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ज्ञान कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही. मात्र आमच्या तरुणांना त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या भविष्यासाठी जेवढे शिक्षण संविधानाने गरजेचे करून ठेवले आहे. तेवढे ज्ञान शिक्षण राजकारणासाठी का नाही? हा प्रश्न नेहमी मनात येतो आणि यावर विचार केल्यावर मनामध्ये असंख्य प्रश्न उद्भवतात! तेव्हा संविधानिक पदावर त्या खुर्चीवर अशिक्षित नेते बसू नये याची दक्षता जनतेने घेतली तर त्या संविधानिक खुर्चीचा आदर केला जाईल असे वाटते.
No comments: