कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे !!
लसूण, कांदा, कोथिंबीर हे बहुतेक कुटुंबाच्या खाण्यात नेहमीच असते. सुदृढ आरोग्यासाठी त्या तिन्ही पदार्थांचे मोठे फायदे आहेत. पण, अतिसेवन केल्यास त्याचे तोटे देखील होऊ शकतात.
हृदयविकार, न्यूमोनिया, मुतखडा, अशक्तपणा, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार, मधुमेह, क्षयरोग अशा विविध आजारांवर तिन्ही पदार्थ निश्चितच लाभदायक आहेत.
कोथिंबीर :
१. पचनशक्ती वाढते -
कोथिंबीर पोटाच्या समस्या दूर करून पचनशक्ती वाढवते. ताज्या कोथिंबीरच्या पानांना ताकासोबत प्यायल्याने अपचन, मळमळीच्या समस्यांपासून आराम मिळतो. कोथिंबीर, हिरवी मिरची, नारळ आणि अदरकची चटणी बनवून खाल्ल्याने, अपचनामुळे पोटात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. तसेच अर्ध्या ग्लास पाण्यात दोन चमचे कोथिंबीर टाकून प्यायल्याने देखील पोटदुखीपासून आराम मिळतो.
२. अशक्तपणा होईल दूर -
जर तुम्हाला खूप थकल्यासारखे, अशक्त वाटत असेल किंवा चक्कर येत असतील. तर दोन चमचे कोथिंबीरीच्या रसामध्ये दहा ग्राम मिश्री (खडीसाखर) आणि अर्धी वाटी पाणी मिसळून सकाळ- संध्याकाळ प्यायल्याने थकवा, अशक्तपणा कमी होतो.
३. श्वासाचे रोग होतील दूर -
कोथिंबीर श्वासासंबंधी रोगांना दूर करण्यासाठी खूप फायदेशीर असते. खोकला, दमा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास कोथिंबीर आणि मिश्री (खडीसाखर) समान प्रमाणात मिळवून बारीक करा. हे मिश्रण एक चमचा भाताच्या पाण्यात मिळवून रोग्याला पाजा. काही दिवस नियमीत असे केल्याने आराम मिळेल.
४. मुतखडा, दृष्टी सुधारते -
कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते. कोथिंबिरीचे सेवन मूत्रपिंडासाठी देखील खूप फायदेशीर आहे. मूत्रपिंडातील दगड अर्थात मुतखड्याच्या समस्या असलेल्यांनी कोथिंबीर पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. हळूहळू मूत्रमार्गाने मुतखडा बाहेर निघून जातो. हिरवी कोथिंबीर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. दृष्टी कमकुवत असलेल्यांनी निश्चितपणे कोथिंबिरीचे सेवन करावे. हिरव्या कोथिंबीरमध्येही गाजराप्रमाणे व्हिटामिन 'ए' भरपूर असल्याने त्याचा डोळ्यांसाठी खूप फायदा होतो.
कांदा :
१. रोग प्रतिकारकशक्ती वाढते -
कांदा शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-सी असे अनेक गुण असतात, जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्युनिटी वाढविण्यास मदत करतात. पचनाच्या समस्यांवर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलादच्या स्वरूपात खाऊ शकता.
२. कॅन्सरपासून होईल बचाव -
कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात. ते शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखत नाहीत तर त्यांचा नाशही करतात. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जे कांदा खातात त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका कमी असतो.
३. हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात -
जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याने कच्चा कांदा खाल्ला पाहिजे. हृदयाशी संबंधित आजारांमध्येही कांद्याचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
४. लोहाची कमतरता भरून निघेल -
कांद्याला लोह, फोलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते. कांद्यामध्ये अँटी एलर्जिक, अँटी ऑक्सिडेंट सारखे गुण असतात, जे शरीराचे अनेक प्रकारच्या इंफेक्शपासून संरक्षण करण्यास मदत करते.
लसूण :
१. डांग्या खोकला, रक्त दोष, घटसर्प, बहिरेपणा, कुष्ठरोग, संधिवात, मुळव्याध, यकृताचे आणि पित्ताशयाचे विकार यावर लसूण गुणकारी आहे. कामोत्तेजना कमी झालेल्यांनाही लसणाचा उपयोग होतो. श्वास मोकळा होण्यासाठी एक लसूण पाकळी गरम करून किंचित मीठ लाऊन खावी. दमा कमी होण्यासाठी एक पेला गरम पाण्यात दोन चमचे मध आणि १० थेंब लसूण रस घ्यावा. झोपण्यापूर्वी ३ लसूण पाकळ्या दुधात उकळून घेतल्याने दमा रात्री त्रास देत नाही.
२. न्यूमोनिया नाहीसा होण्यासाठी एक लिटर पाण्यात एक ग्रॅम लसूण आणि २५० मि.ली. दूध घालून उकळवावे. पाव हिस्सा करावे. हे दूध दिवसातून तीन वेळा घ्यावे. क्षयरोगासाठी लसूण दुधात उकळून घ्यावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. लसूण पौष्टिक, वीर्यवर्धक, उष्ण, पाचक, मलनिस्सारक आहे. मुरुमे आणि मोड्या (पिंपल्स) कमी होण्यासाठी लसूण नियमित चेहऱ्यावर चोळावा. नायटा, इसब झालेल्या त्वचेवर लसूण चोळल्याने रोग बरा होतो.
३. रक्तवाहिन्यांवरील दाब, ताण कमी होतो. नाडीचे आणि हृदयाचे ठोके कमी पडतात. लसणाचे सहा थेंब चार चमचे पाण्यातून दोन वेळा घेतल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. वाढलेला रक्त दाब कमी होण्यासाठी लसूण, पुदिना, जिरे, धने, काळी मिरी आणि सैंधव मिठाच्या चटणीचे सेवन करावे.
४. लसणाच्या नियमित वापराने रक्तवाहिन्यांतील साचलेले कोलॅस्टेरोल निघून जाते. रक्तवाहिन्या कडक व कठीण होत नसल्याने हृदयाचा झटका येण्याची संभावना कमी होते. हृदयाचा झटका आल्याबरोबर पाच सहा कच्च्या लसूण पाकळ्या चावून खाल्ल्याने 'हार्ट फेल'चा धोका टळतो.
५. आहारात लसणाचा सातत्याने वापर केल्यास कर्करोगाची शक्यता कमी होते. कारण लसूण कर्करोगाच्या पेशींना वाढू देत नाही. कर्करोगामध्ये नियमित लसणाचे सेवन करत राहिल्याने पांढऱ्या पेशींची वाढ होऊन कर्करोगाच्या पेशींची वाढ ३९ टक्क्यांनी कमी होते.
No comments: