Full Width CSS

"वाट पाहणारं दार"🚪


प्रत्येक घराला एक

वाट पाहणार दार असतं, 

खरच सांगतो त्या

दाराच नाव आई बाबा असतं.

उबदार विसाव्याचं ते

एकमेव स्थान असतं, 

प्रत्येक घराला एक

वाट पाहणार दार असतं🚪


वाट पाहणाऱ्या या दाराला

आस्थेच महिरपी तोरण असतं, 

घराच्या आदरातिथ्याच

ते एक परिमाण असतं.

नीतिमत्तेच्या उंबरठ्याआड

मर्यादेचं त्याला भान असतं, 

प्रत्येक घराला एक

वाट पाहणार दार असतं🚪


दारिद्र्याच्या दशावतारात

हे दार कधीच मोडत नसतं, 

कोत्या विचारांच्या वाळवीनं

ते कधी सडत नसतं.

ऐश्वर्याच्या उन्मादात

ते कधी फुगत नसतं, 

प्रत्येक घराला एक

वाट पाहणार दार असतं🚪


सुना नातवंडांच्या आगमनाला ते

तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं, 

लेकीची पाठवणी करताना

अश्रूंना वाट करून देतं

व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना

ते जरबेनं ताळ्यावर आणतं, 

प्रत्येक घराला एक

वाट पाहणार दार असतं🚪


मित्रांनो,

उभ्या आयुष्यात फक्त

एकच गोष्ट जपा.

उपहासा ची करवत

या दारावर कधी चालवू नका.

मानापमाना चे छिन्नी, हातोडे

या दारावर कधी मारू नका.

स्वार्थी अपेक्षां चे खिळे

या दारावर कधी ठोकू नका.

घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला, 

कधीच मोडकळी ला आणू नका.

कारण, 

प्रत्येक घराला एक

वाट पाहणार दार असतं🚪


खरच सांगतो त्या

दाराचं नाव आई बाबा असतं 

उबदार विसाव्याचं ते

एकमेव स्थान असतं

प्रत्येक घराला एक

वाट पाहणार दार असतं🚪 


आज सहज वाचनात आलेली कुटुंब व्यवस्थेला स्पर्श करणारी कविता.आपणालाही आवडेल.🙏🙏 

"वाट पाहणारं दार"🚪 "वाट पाहणारं दार"🚪 Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on February 09, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.