How to add Child name in Ration Card Online
काही लोकांना राशन कार्ड वर कोणाकोणाचे नाव आहेत हे त्यांना माहित नसते. त्यामुळे राशन कार्ड वरील कोणाचे नाव काढून टाकले आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. आधी आपण या मध्ये आपल्या राशन कार्ड वर कोणाकोणाचे नावे आहेत, या विषयी माहिती पाहू.
Ration Card Check
- तुम्हाला तुमच्या राशन कार्ड वर कोणाकोणाचे नावे आहेत हे पाहण्यासाठी सर्वात आधी http://nfsa.gov.in/Default.aspx दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड असा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला Ration card Details On State Portals असा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, ब्लॉक चे नाव आणि पंचायत चे नाव निवडावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या राशन दुकान आणि डीलर चे नाव निवडावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या राशन कार्ड चा प्रकार निवडा.
- त्यानंतर तुमच्या पुढे सर्व राशन कार्ड धारकांची यादी येईल, त्या यादी मध्ये तुम्हाला तुमच्या राशन कार्ड वर कोणाकोणाचे नावे आहेत हे पाहू शकता.
- तुमचे नाव राशन कार्ड वर आहे का काढून टाकले हे तुम्हाला कळेल.
Ration Card Online Check
जर तुमचे नाव तुमच्या राशन कार्ड वरून काढून टाकले असेल तर तुम्ही आता तुमचे नाव अगदी सोप्या पद्धतीने जोडू शकता. तुम्हाला तुमचे नाव राशन कार्ड मध्ये जोडण्यासाठी तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागात जावे लागेल. तुम्हाला तेथे गेल्यानंतर फॉर्म भरून आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
हे सर्व झाल्यानंतर तुमच्या राशन कार्डची पडताळणी होईल, आणि कमीतकमी दोन आठवड्यात कट ऑफ राशन कार्ड मध्ये जोडले जाईल.
No comments: