Google Pay: सद्या आपण बर्याच ठिकाणी गूगल पेयने व्यवहार करत असतो तो UPI पेमेंट पध्दतीने, मग तुम्ही Google UPI द्वारे कोणत्याही सबस्क्रिप्शनसाठी पैसे भरल्यास तुम्ही ते पेमेंट आपोआप करू शकणार आहे.
म्हणजे आता तुमचं नियमित सबस्क्रिप्शन आपोआप पेमेंट केलं जानार आहे. तुम्हाला या कमासाााठी प्रत्येक वेळी तुम्हाला सबस्क्रिप्शनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. ही सुविधा फक्त गुगल प्ले स्टोअरसाठी असणार. खरं तर, 2020 मध्येच, RBI पेमेंट्सबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. या तत्त्वात, सबस्क्रिप्शन बेस्ड पेमेंट मॉडेलमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. असे मानले जाते की UPI ऑटोपे हा एक विशेष पर्याय म्हणून उदयास येऊ शकतो.
UPI पेमेंट प्रकीया: NPCI ने UPI 2.0 अंतर्गत UPI ऑटोपे लाँच केलं. या अंतर्गत युजर्स कोणत्याही UPI ऍप्लिकेशनद्वारे आवर्ती पेमेंट करू शकतात. यामुळे वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शनसाठी पैसे देणं सोपं होतं. कोणत्याही गोष्टीसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन निवडल्यानंतर युजर्सना कार्टमधील पसंतीच्या पेमेंट पद्धतीवर टॅप करावं लागेल. येथे यूजर्सना Pay with UPI वर टॅप करावं लागेल.
या फीचर अंतर्गत वापरकर्ता UPI ऍप्लिकेशनद्वारे ई-मँटेड देऊ शकतात. हे आदेश मोबाईल बिल, वीज बिल, ईएमआय, ओटीटी सबस्क्रिप्शन इत्यादी पेमेंटसाठी केले जाऊ शकतात. यासह, वापरकर्ते कोणत्याही दंड किंवा विलंब शुल्काशिवाय सदस्यता सहजपणे अदा करू शकतात. यामध्ये, वापरकर्ते मासिक, त्रैमासिक याप्रमाणे नियमित आधारावर पेमेंट पर्याय देखील निवडू शकणार आहेत.
No comments: