महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती योजनांची सुरुवात करत असते. जेणेकरून राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या सहाय्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने MahaDBT Portal सुरु केले आहे या पोर्टल मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागांद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीचा समाविष्ट करण्यात आला आहे.त्यामुळे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT Portal वर जाऊन सर्व विभागातील शिष्यवृत्तीची माहिती मिळवू शकतील तसेच अर्ज करून लाभ मिळवू शकतील.
MahaDBT Scholarship Marathi
राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत त्यांच्या जवळ कायम स्वरूपाचा रोजगार नसल्याकारणामुळे त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते.दिवसेंदिवस शिक्षणाच्या खर्चात होणारी वाढ महाविद्यालयाची फी,ट्युशन फी व इतर शालेपयोगी वास्तूचे वाढणारे भाव त्यामुळे ते आपल्या मुलांना शिक्षण देण्यास असमर्थ असतात त्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहतात.काही कुटुंबे मुलांच्या शिक्षणासाठी जास्त व्याज दराने कर्ज घेतात व कर्ज फेडू न शकल्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे त्याचा सामाजिक विकास होत नाही व भविष्यात त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध न झाल्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्यातील अनेक विभागांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे शिष्यवृत्ती सुरु केल्या.परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी सुरु करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीची माहिती मिळत नव्हती त्यामुळे ते शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू न शकल्यामुळे आपले शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहत होते.महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या या समस्यांचा विचार करून MahaDBT Portal सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला
MahaDBT हे महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेले एक पोर्टल आहे जिथे इयत्ता १०वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी (पोस्ट मॅट्रिक) त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी त्यांच्या विभागाद्वारे अर्ज करू शकतात.
MahaDBT पोर्टलद्वारे विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या विविध विभाग आणि संस्थानी सुरु केलेल्या अनेक शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
MahaDBT अंतर्गत वेगवेगळे विभाग आहेत जे विविध विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या श्रेणीवर आधारित भिन्न शिष्यवृत्ती देतात
महाडीबीटी पोर्टल चा उद्देश
Mahabdbt Portal Purpose
- राज्यातील शिष्यवृत्तीची प्रभावी अंमलबजावणी आणि वितरण सुनिश्चित करणे हे MahaDBT Portal चे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
- विद्यार्थ्यांना एकाच पोर्टल वर राज्यातील सर्व विभागांद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता यावा या उद्देशाने MahaDBT Portal ची सुरुवात करण्यात आली आहे.
- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची कार्यश्रम अंमल बजावणी आणि वितरण सक्षम करणे हे MahaDBT चे उद्दिष्ट्य आहे.
महाडीबीटी पोर्टल चे वैशिष्ट्ये
Mahadbt Portal Features
- MahaDBT महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेले पोर्टल आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT द्वारे अर्थसहाय्य देण्याचा प्रकल्प आहे.
- महाराष्ट्र सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली हि योजना DBT (थेट लाभ हस्तांतरण) शिष्यवृत्ती म्हणून देखील ओळखली जाते.
- महाराष्ट्रातील विविध विभागांद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिष्यवृतींना एकाच MahaDBT Portal वर उपलब्ध केले गेल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्याचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
- पात्र विद्यार्थ्यांना लाभाची राशी त्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
- MahaDBT Portal वर शिष्यवृत्तीसाठी अर्ज केल्यापासून ते लाभ मिळेपर्यंत अर्जाची सर्व माहिती वेळोवेळी मिळवता येते.
MahaDBT Portal वर सामाविष्ट्य विविध शिष्यवृत्तीची माहिती
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना
विभागाचे नाव
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
आढावा
- शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
- शिक्षण गळती कमी करण्यासाठी.
- उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
- पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
- फक्त अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो.
- अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न रु. 2,50,000 किंवा त्यापेक्षा कमी असावे.
फायदे
या योजनेअंतर्गत नवबौध्द / अनुसूचित जातीतील पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे लाभ मिळतील
१. प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत गट १, गट २, गट ३, गट ४, प्रति महिना (अधिकतम १० महिने) याप्रमाणे देखभाल भत्ता प्रदान केला जातो.
डे स्कॉलर : (दरमहा रुपयांमध्ये)
गट १ : ५५०
गट २ : ५३०
गट ३ : ३००
गट ४ : २३०
होस्टेलर : (दरमहा रुपयांमध्ये)
गट १ : १२००
गट २ : ८२०
गट ३ : ५७०
गट ४ : ३८०
दिव्यांग (अपंगत्व प्रकार) असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ते पुढीलप्रमाणे
अपंगत्वाचे प्रकार : (दरमहा रुपयांमध्ये)
अंधत्व / कमी दृष्टी गट १ आणि २ : १५०
गट ३ : १२५
गट ४ : १०० शासन निर्णय (अ) नुसार अतिरिक्त भत्ते
कुष्ठरोग निवारण झालेले सर्व गटांसाठी
वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
एस्कॉर्ट भत्ता १०० / –
वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता १००/- अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी) प्रमाणे
कर्णबधीर सर्व गटांसाठी
वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
शासन निर्णय (बी) नुसार अतिरिक्त भत्ते
लोकोमोटर अपंगत्व सर्व गटांसाठी
वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
शासन निर्णय (बी) नुसार अतिरिक्त भत्ते
मानसिक दुर्बलता / मानसिक आजार सर्व गटांसाठी
वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
एस्कॉर्ट भत्ता १०० / –
वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता १००/-
अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता १५० / – अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी, इ) प्रमाणे
ऑर्थोपेडिक अपंगत्व सर्व गटांसाठी
वाहतूक भत्ता १०० / – पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
एस्कॉर्ट भत्ता १०० / –
वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता. १०० / – अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी) प्रमाणे
विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिल्या जाणाऱ्या देखभाल भत्ता व्यतिरिक्त सर्व अनिवार्य शुल्क / अनिवार्य देय शुल्क अर्थात वित्तपुरवठा (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क) इ. या योजनेखाली समाविष्ट केले आहे.
पात्रता
- आई-वडिलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा
- विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.
- अयशस्वी : विद्यार्थी प्रथम वर्षी नापास झाला तरी त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता अनुज्ञेय राहील, एकाच वर्गात दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला / तिला कोणताही भत्ता मिळणार नाही. आणि दोन प्रयत्नानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेल्यास लाभ अनुज्ञेय राहतील.
- महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भारतसरकारच्या नियमानुसार समान नियम अनुज्ञेय राहतील.
- फक्त २ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी.
आवश्यक कागदपत्रे
- उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार द्वारे प्रदान)
- जात प्रमाणपत्र.
- गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका
- वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- शिक्षणातील खंड बाबतचे आणि स्व:घोषणापत्र (आवश्यक असल्यास)
- वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- पतिचे उत्पन्न प्रमाणपत्र (अर्जदार जर स्त्री आहे आणि विवाहीत असल्यास)
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
विभागाचे नाव
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
आढावा
- विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
- उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे
- शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी गळती प्रमाण कमी करणे
- उच्च शिक्षणाद्वारे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे.
- पारदर्शकता, ऐक्य आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
- अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क जसे की, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर अनुज्ञेय शुल्क यांची परतफेड प्रदान करण्यात येईल.
फायदे
विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिले जाणारे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क, जे अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहे, ते या योजनेत समाविष्ट आहे.
पात्रता
- आई-वडिलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २,५०,००० पेक्षा जास्त असावे.
- विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा
- विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.
- शासकीय मान्यताप्राप्त असलेली आणि महाराष्ट्रात स्थित असलेली संस्था असावी.
- विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ CAP माध्यमातून प्रवेश घेतलेला असावा.
- संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत केवळ एकदा अनुत्तीर्ण ग्राह्य धरले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
- उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी प्रदान केलेले)
- जात प्रमाणपत्र.
- जात पडताळणी प्रमाणपत्र
- गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका
- वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- CAP फेरी वाटप पत्र
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
विभागाचे नाव
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
आढावा
व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहामध्ये राहणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता प्रदान केला जातो
फायदे
देखभाल भत्त्याद्वारे अर्जदारास व्यावसायिक अभ्यासक्रम पुस्तके, स्टेशनरी, निवास आणि अन्न यासाठीचा निधी खालीलप्रमाणे मिळवता येईल.
(वसतिगृहात प्रवेश घेतल्यापासून ते परीक्षेपर्यंत किंवा अधिकतम १० महिन्यांसाठी)
सरकारी वसतिगृहांमध्ये राहणा-या विद्यार्थ्यांसाठी
- अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे: दरमहा ७०० / – रुपये (७००० रुपये).
- अभ्यासक्रम कालावधी २ ते ३ वर्षांच्या दरम्यान: दरमहा ५०० / – (५००० रुपये)
- अभ्यासक्रम कालावधी २ वर्षे : दरमहा ५०० / – (५००० रुपये)
शासकीय वसतिगृहासाठी पात्र ठरलेल्या परंतु शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी
- अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे: दरमहा १००० / – रुपये (१०००० रुपये).
- अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे: दरमहा ७०० / – रुपये (७००० रुपये).
- अभ्यासक्रम कालावधी २ वर्षे : दरमहा ५०० / – (५००० रुपये)
पात्रता
- व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी.
- विद्यार्थी भारत सरकारचे शिष्यवृत्ती धारक असावेत
- उत्पन्नाची मर्यादा भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेनुसार लागू असेल, म्हणजे वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेले आणि वसतिगृहात राहत असलेले विद्यार्थी पात्र असतील (शासकीय किंवा संस्थेच्या वसतिगृहात किंवा बाहेर राहणारे)
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
- महाविद्यालय प्रवेश पावती
- वॉर्डन पत्र (जर विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश मिळत नसेल)
- भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेतील त्याचा / तिचा नोंदणी / अर्ज आयडी
राजर्षि छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप
विभागाचे नाव
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
आढावा
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
- शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य्य उपलब्ध करणे.
- अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे
- केवळ अनुसूचित जातीतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.
फायदे
या योजनेअंतर्गत शालांत परीक्षेत ७५ टक्के किंवा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. ३००/- प्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
(१० महिने प्रत्येकी ११ वी आणि १२ वी इयत्तेसाठी) ही शिष्यवृत्ती भारत सरकारच्या शिष्यवृत्ती आणि Freeship व्यतिरिक्त दिली जाईल
पात्रता
- विद्यार्थी अनुसूचित जाती श्रेणी अंतर्गत असावा.
- शिष्यवृत्तीसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही.
- विद्यार्थी 11 वी किंवा 12 वी वर्गात शिकणारा असावा.
- विद्यार्थी शालांत परीक्षा ७५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण असावा.
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- १० वी ची गुणपत्रिका
- टीसी / एलसी
- ११ वी प्रवेश पावती
अपंग व्यक्तींसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
आढावा
- शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे
- विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करणे.
- उच्च शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे
- पारदर्शकता, ऐक्य आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
- शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचे फायदे केवळ दिव्यांग व्यक्तींना मिळतील.
फायदे
या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे लाभ मिळतील
प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत गट अ, गट ब, गट क, गट ड, गट इ प्रति महिना (अधिकतम १० महिने) याप्रमाणे देखभाल भत्ता प्रदान केला जातो.
डे स्कॉलर : (दरमहा रुपयांमध्ये)
गट अ : ५५०
गट ब : ५३०
गट क : ५३०
गट ड : ३००
गट इ : २३०
होस्टेलर : (दरमहा रुपयांमध्ये)
गट अ : १२००
गट ब : ८२०
गट क : ८२०
गट ड : ५७०
गट इ : ३८०
अंध : वाचक भत्ता (अतिरिक्त):
गट अ, ब, क : १००
गट ड : ७५
गट इ : ५०
- देखभाल भत्त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिले जाणारे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क, जे अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहे, ते या योजनेत समाविष्ट आहे
- व्यावसायिक किंवा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरा करण्यासाठी अतिरिक्त रु. ५००/- किंवा दरवर्षी लागू शुल्क प्रदान करण्यात येते. (अभ्यास दौरा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग असणे आवश्यक आहे.)
- जर प्रकल्प अभ्यासक्रमासाठी अनिवार्य असेल तर छपाई आणि टायपिंगसाठी उमेदवारास अतिरिक्त रु. ६००/- किंवा दरवर्षी लागू शुल्क प्रदान करण्यात येते, परंतु त्यासाठी प्राचार्य प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
- एम. फील आणि पीएचडी अभ्यासक्रमांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण गट अ, गट ब, गट क नुसार देखभाल भत्ता प्रदान करण्यात येईल.
- महिन्याच्या २० तारखेपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या महिन्याचा देखभाल भत्ता अनुज्ञेय राहील.
पात्रता
- विद्यार्थी विकलांग व्यक्ती असावा. (४०% किंवा जास्त)
- विद्यार्थी महाराष्ट्र राजयाचा आदीवासी असावा.
- विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून शिक्षण घेणारा असावा.
- विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास संबंधित शिष्यवृत्ती नाकारण्यात येईल. (अपूर्ण अभ्यासक्रम)
- उच्च माध्यमिक / माध्यमिक / पदवी या क्रमाने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दोनदा किंवा दुसऱ्या वेळेला लागू होणार नाही. (अर्ज चढत्या क्रमाने असावा) (एका वेळेला एकच अभ्यासक्रम लागू होईल)
- महाराष्ट्राबाहेरील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेत शिक्षण घेणारे, परंतु महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणारे विद्यार्थी
- वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेणारे आणि संस्थेच्या बाहेर सर्व करण्याची परवानगी नसलेले विद्यार्थि पात्र असतील. (जसे की, छात्रवृत्ती लागू असलेली इंटर्नशिप किंवा हाऊसमनशिप)
- कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम खंडित करून इतर व्यावसायिक अभ्यासक्रम, तांत्रिक शिक्षण प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला असेल तर असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
- गट अ वगळता उमेदवारास शिष्यवृत्ती लागू होणार नाही
- गट ब, क, ड, ई – विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास या योजनेसाठी तो / ती अपात्र ठरेल.
- गट अ : पहिल्या प्रयत्नात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला, तरीही या योजनेसाठी तो पात्र असेल. परंतु संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत दुसऱ्या वेळेला तो अनुत्तीर्ण झाला, तर या योजनेसाठी तो अपात्र ठरेल.
- दूरस्थ शिक्षण पद्धतीने मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमार्फत ना परतावा शुल्क भरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके आणि साहित्य खरेदीसाठी वार्षिक रु. ५००/- देण्यात येतात.
- या योजनेसह उमेदवार फक्त राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
- अर्जदार पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नोकरी करत असेल तर तो / ती या योजनेसाठी पात्र नाही.
- शासकीय वसतिगृहात राहणारा आणि पुस्तके आणि स्टेशनरी न मिळणारा विद्यार्थी
आवश्यक कागदपत्रे
- गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- अधिवास प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- पालक प्रमाणपत्र
- (फक्त गट अ साठी) जर शिक्षणामध्ये खंड असेल तर त्या संबंधित आवश्यक प्रमाणपत्र
अनुसुचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना
विभागाचे नाव
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
आढावा
शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प् कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विदयार्थ्यांकरिता व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना .सदर योजनेचे निकष पुर्ण करीत असलेल्या विदयार्थ्यांनाच या प्रशिक्षण शुल्क् प्रतिपुर्तीचा लाभ घेता येईल.
फायदे
- एस.एस.सी.उत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असेल तर या योजनेकरिता पात्र नाही. भारत सरकार शिष्यवृत्ती करीता अर्ज करावा.
- एस.एस.सी.उत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 2,50,000/- आणि 8 लाख किंवा 8 लाखापेक्षा कमी असेल तर प्रशिक्षण शुल्क् च्या 100% प्रतिपुर्ती.
- एस.एस.सी.अनउत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापर्यंत असेल तर प्रशिक्षण शुल्क् च्या 100% प्रतिपुर्ती.
पात्रता
- शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प् कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेला असावा.
- मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी शिष्यवृत्ती नाही.
- विदयार्थी अनुसुचित जाती प्रवर्गातील असावा.त्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- विदयार्थ्यांच्या कुटुंबाचे मागिल वर्षातील एकत्रित वार्षिक उत्पन्न् रु.8.00 लाखाच्या मर्यादेत असावे.
- अनाथ विदयार्थ्यांना शिफारस पत्र आवश्यक आहे.
- उमेदवाराने यापुर्वी शासकीय किंवा खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थेकडुन कोणताही लाभ घेतलेला नसावा.
- राज्य /केंद्र शासनाच्या विभागाने अथवा त्यांच्या अधिपत्याखालील स्थानिक प्राधिकरण,कंपन्या अथवा महामंडळे यांनी पुरस्कृत केलेल्या कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमाचा यापुर्वी लाभ घेतलेला नसावा.
- विदयार्थी महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
- शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेअंतर्गंत महासंचालक,प्रशिक्षण नवी दिल्ली,(DGT) अथवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद (MSCVT) यांनी मान्यता दिलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकडयांचा प्रवेशित जागांवर प्रवेश घेणे बंधनकारक राहील.
- उपस्थितीचे निकष अनिवार्य आहेत.
- अर्जदार विदयार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षा अथवा वर्षाची परिक्षा देणे आवश्यक राहील.केवळ विशिष्ट परिस्थितीत विशेषत: आजारपणाच्या कारणास्तव परिक्षा देणे शक्य झाले नसल्यास तसे विदयार्थी व संबधित संस्थेने शिफारस केल्यानंतर सहसंचालक,प्रादेशिक विभाग यांनी प्रमाणीत करणे आवश्यक आहे.
- संबधित विदयार्थी स्वत:च्या चुकीच्या वर्तनामुळे समाधानकारक शैक्षणिक प्रगती करत नसल्याबाबत किंवा संबंधित प्राधिका-याच्या पुर्वपरवानगीशिवाय अनियमित असणे अथवा गैरहजर रहाणे इत्यादी स्वरुपाचे गैरवर्तन करत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने निदर्शनास आणले तर अशा विदयार्थ्याकरिता संस्थेला शुल्क् प्रतिपुर्ती अनुज्ञेय राहणार नाही.
नूतनीकरण धोरण
- विदयार्थ्यी पुढील वर्षी हजेरीपटावर असावा.
- डीजीटी, नवी दिल्ली यांच्या निकषानुसार हजेरी आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
- शासन निर्णया नुसार आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मार्कशीट दहावी/बारावी
- नुतनीकरणासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिका-याने निर्गमित केलेलो उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
आदिवासी विकास विभाग
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
आदिवासी विकास विभाग
आढावा
भारतात अभ्यास करण्यासाठी अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना मॅट्रीक शिष्यवृत्ती पोस्टची योजना
फायदे
[होस्टेलर्स / डे स्कॉलर्स] दरमहा-
ग्रुप १ : १२००/५५० आरएस, ग्रुप २ : ८२०/५३० आर, ग्रुप ३ : ५७०/३०० रु, ग्रुप ४ : ३८०/२३० रु
या वाचक भत्त्यासाठी अतिरिक्त: गट १-२ : २४० रुपये, ग्रुप ३ : २०० रुपये, ग्रुप ४ : १६० आर
- एस्कॉर्ट भत्ता: १६० रुपये / महिना
- विशेष वेतन: १६० रु / महिना मानसिकदृष्ट्या सेवानिवृत्त, अतिरिक्त प्रशिक्षण: रु. २४० / महिना
- अभ्यास टूर: १६०० रु / अनम
- थीसिस टाइपिंग / प्रिंटिंग: १६०० / अनिम
- बुक ग्रांट १२०० रुपये / वार्षिक
पात्रता
फक्त एसटीसाठी लागू
- जर कौटुंबिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
- किमान १० वी पास
- परत २ वर्षांच्या ड्रॉपसाठी परत फॉर्म भरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
नूतनीकरण धोरण
- विद्यार्थ्यांना मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण करावे लागेल.
- जर विद्यार्थी कोणत्याही वर्षात अपयशी ठरला तर त्याला त्या विशिष्ट वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जात नाही.
- शिष्यवृत्तीचे नूतनीकरण करण्यासाठी विद्यार्थ्याला अर्ज करावा लागतो.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- मागील वर्षाचे गुणपत्रिका
- व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जाति वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे
अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा प्रदाने
विभागाचे नाव
आदिवासी विकास विभाग
आढावा
ही राज्य प्रायोजित योजना आहे. अर्जदाराची पालकांची उत्पन्नाची मर्यादा २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. फक्त अर्जदार ट्युनशन फी आणि परीक्षा शुल्क परतफेड केले जाते
फायदे
ट्यूशन फी आणि परीक्षा शुल्क मंजूर कॉलेज फी रचनेनुसार
पात्रता
- फक्त एसटीसाठी लागू
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रू. २,५०,००० नूतनीकरण धोरण: विद्यार्थ्यांना मागील वर्ष परीक्षा उत्तीर्ण करावे लागेल.
- जर विद्यार्थी कोणत्याही वर्षात अपयशी ठरला तर त्याला त्या विशिष्ट वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
नूतनीकरण धोरण
- विद्यार्थ्यांना मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण करावे लागेल.
- जर विद्यार्थी कोणत्याही वर्षात अपयशी ठरला तर त्याला त्या विशिष्ट वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- मागील वर्षाचे गुणपत्रिका
- जाति वैधता प्रमाणपत्र
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा द्या
विभागाचे नाव
आदिवासी विकास विभाग
आढावा
या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम जसे अभियांत्रिकी, फार्मेसी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, वास्तुशास्त्र, एमबीए, एमसीए या नावाने नावनोंदणी केली जाते त्यांना लाभ मिळू शकतो.
अर्जदार ज्याची मूळ उत्पन्नाची मर्यादा २.५ लाखपेक्षा जास्त आहे, त्या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
फायदे
ट्यूशन फी आणि परीक्षा शुल्क मंजूर कॉलेज फी रचनेनुसार
पात्रता
- फक्त एसटीसाठी लागू
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रू. २.५०,०००
नूतनीकरण धोरण
- विद्यार्थ्यांना मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण करावे लागेल.
- जर विद्यार्थी कोणत्याही वर्षात अपयशी ठरला तर त्याला त्या विशिष्ट वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
- सक्षम प्राधिका-याने जारी केलेले जातीचे प्रमाणपत्र.
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
- कॉलेज प्रवेश रसीद
- जात वैधता प्रमाणपत्र
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी देखभाल भत्ता
विभागाचे नाव
आदिवासी विकास विभाग
आढावा
या शिष्यवृत्तीसाठी व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांसाठी अर्जदार असलेल्या अर्जदाराने अर्ज करू शकतात.
पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा २.५ लाखांपेक्षा कमी असली पाहिजे.
फायदे
देखभाल भत्ता अभ्यासक्रम कालावधी श्रेणीनुसार श्रेणीबद्ध केला जातो
- ४-५ वर्षे अभ्यासक्रम रू. ७,००० / १०,००० / वर्ष.
- २-३ वर्षे कोर्स रु ५०००/७००० / वर्ष.
- २ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी ५००० /५००० / वर्ष
पात्रता
- एसटी जातींसाठी केवळ लागू.
- जर कौटुंबिक उत्पन्न <= २,५०,००० तर त्याला शिष्यवृत्ती मिळेल. मिळकत असल्यास > २,५०,००० नंतर त्याला एक फ्रीशिप
नूतनीकरण धोरण
- नवीनीकरण पॉलिसी मिळेल: विद्यार्थ्यांना मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते
- जर विद्यार्थी कोणत्याही वर्षात अपयशी ठरला तर त्याला त्या विशिष्ट वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मागील वर्षाची मार्कशीट
- जाति वैधता प्रमाणपत्र
- महाविद्यालयातील रेक्टर / अधीक्षकांची घोषणापत्र
अनुसुचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना
विभागाचे नाव
आदिवासी विकास विभाग
आढावा
शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प् कारगिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विदयार्थ्यांकरिता व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना .सदर योजनेचा निकष पुर्ण करीत असलेल्या विदयार्थ्यांनाच या शिष्यवृत्ती चा लाभ घेता येईल.
फायदे
- एस.एस.सी.उत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 2,50,000/- किंवा त्यापेक्षा कमी असेल तर या योजनेकरिता पात्र नाही. भारत सरकार शिष्यवृत्ती करीता अर्ज करावा.
- एस.एस.सी.उत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 2,50,000/- आणि 8 लाख किंवा 8 लाखापेक्षा कमी असेल तर प्रशिक्षण शुल्क् च्या 100% प्रतिपुर्ती.
- एस.एस.सी.अनउत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापर्यंत असेल तर प्रशिक्षण शुल्क् च्या 100% प्रतिपुर्ती.
पात्रता
- विदयार्थी अनुसूचित जमातीचा असावा.सदर विदयार्थ्यांने जात बैधता प्रमापत्र सादर करणे आवश्यक आहे.
- औदयोगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश करतांना विदयार्थ्यांने मुळ TC वर प्रवेश घेतला असावा.डुप्लीकेट TC वर प्रवेश दिलेला नसावा.
- सदर योजनेकरिता विदयार्थी हा 10 वी उत्तीर्ण अथवा 10 वी अनुउत्तीर्ण असावा.
- शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प् कारगिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेला असावा.
- व्यवस्थापन कोटयातील विदयार्थ्यांना सदर योजना लागु राहणार नाही.
- इयत्ता 10 वी अनुत्तीर्ण विदयार्थ्यांसाठी असणा-या व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी रु.8.00 लाखापर्यंत उत्पन्न असणा-या व इयत्ता 10 वी उत्तीर्ण विदयार्थ्यांसाठभ् असलेल्या अभ्यासक्रमासाठी रु.2.51 लाख ते 8.00 लाख या उत्पन्नाच्या मर्यादेत उत्पन्नं असणा-या अनुसूचित जमातीच्या विदयार्थ्यांना हि योजना लागु राहील .
- उमेदवाराने यापुर्वी शासकीय किंवा खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थेकडुन कोणताही लाभ घेतलेला नसावा.
- राज्य /केंद्र शासनाच्या विभागाने अथवा त्यांच्या अधिपत्याखालील स्थानिक प्राधिकरण,कंपन्या अथवा महामंडळे यांनी पुरस्कृत केलेल्या कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमाचा यापुर्वी लाभ घेतलेला नसावा.
- महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
- DGT नवी दिल्ली अथवा MSCVT यांनी मान्यता दिलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकडयांच्या प्रवेशित जागांवर प्रवेश घेणे बंधनकारक राहील.
- सदर योजनेचा लाभ हा कुटूंबातील केवळ दोन अपत्यांपर्यत मर्यादित राहील.
- उपस्थितीचे निकष अनिवार्य आहेत.
- अर्जदार विदयार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षा अथवा वर्षाची परिक्षा देणे आवश्यक राहील.केवळ विशिष्ट परिस्थितीत विशेषत: आजारपणाच्या कारणास्त्व परिक्षा देणे शक्य झाले नसल्यास तसे विदयार्थी व संबधित संस्थेने शिफारस केल्यानंतर प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी प्रमाणीत करणे आवश्यक राहील.
- संबधित विदयार्थी स्व्त:च्या चुकीच्या वर्तनामुळे समाधानकारक शैक्षणिक प्रगती करत नसल्याबाबत किंवा संबंधित प्राधिका-याच्या पुर्वपरवानगी शिवाय अनियमित असणे अथवा गैरहजर रहाणे इत्यादी स्वरुपाचे गैरवर्तन करत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने निदर्शनास आणले तर अशा विदयार्थ्याकरिता संस्थेला शुल्क् प्रतिपुर्ती अनुज्ञेय राहणार नाही.
नूतनीकरण धोरण
- विदयार्थ्यी पुढील वर्षी हजेरीपटावर असावा.
- डीजीटी, नवी दिल्ली यांच्या निकषानुसार हजेरी आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मार्कशीट दहावी/बारावी
- नुतनीकरणासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिका-याने निर्गमित केलेलो उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
उच्च शिक्षण संचालनालय
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
सदर योजनेंतर्गत उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय / अशासकीय अनुदानित / अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान – विना अनुदान) / कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये व अकृषी विद्यापीठे व त्या विद्यापीठा अंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यीत खाजगी विद्यापीठे वगळून) व्यावसायीक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8.00 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्तीचा लाभ देय आहे.
पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तथापि महाराष्ट्र – कर्नाटक राज्य सीमा भागातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- शासन निर्णयानुसार प्रथम दोन मुले या योजनेसाठी पात्र आहेत.
- सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे अशा उमेदवार पात्र आहेत.
- शासन निर्णय दिनांक 07/10/17 (डीएचई अभ्यासक्रम) मधील अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- अर्जदाराने इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेचा लाभ दूरस्थ पध्दतीने (Open /Distance /Virtual Learning) अथवा अर्धवेळ (Part-Time) स्वरुपात चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
- तसेच योजेनच्या लाभाकरीता अनुज्ञेय असलेला अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाची व संबंधित सक्षम संस्थाची (AICTE/PCI/COA/MCI/NCTE, विद्यापीठ / शिक्षण मंडळ, इ.) पूर्व मान्यता व संलग्नता असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थ्यास प्रत्येक सत्र अथवा वर्षाची परीक्षा देणे आवश्यक राहिल.
नूतनीकरण धोरण
- मागील वर्षी सदर शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती च्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात.
- नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
आवश्यक कागदपत्रे
- सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहसिलदार अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमापणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- CAP संबंधित कागदपत्रे. (केवळ विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम )
- गॅप संबंधित दस्तऐवज (गॅप असल्यास)
- दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र
गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या मुंबई, पुणे, लातूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापुर, अमरावती, नागपुर व कोकण या परीक्षा विभागातील परीक्षेत वरचा क्रमांक मिळविणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते.
फायदे
सदर शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे 11 प्रकारच्या शुल्काचा लाभ देण्यात येतो.
- प्रवेश शुल्क – 100 टक्के
- सत्र शुल्क – 100 टक्के
- भोजन शुल्क – 150 रु. प्रतिमाह प्रमाणे दहा महिन्याकरिता = 1500 रु.
- वैद्यकीय खर्च – विद्यार्थ्यांचा झालेला खर्च किंवा रु. 120 यापैकी जी रक्कम कमी असेल अशी रक्कम.
- परीक्षा शुल्क – 100 टक्के
- शिक्षण शुल्क – 100 टक्के
- ग्रंथालय शुल्क – 100 टक्के
पुस्तके व इतर स्टेशनरी साहित्य
- 11 वी, 12 वी – 300 रु. वार्षिक
- पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम (science, veterinary and Agriculture अभ्यासक्रम वगळून) – 500 रु. वार्षिक
- पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम (science, veterinary and Agriculture अभ्यासक्रमासाठी) – 700 रु. वार्षिक
- वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम – 1000 रु. वार्षिक
- पदवीका अभ्यासक्रम – 500 रु. वार्षिक
- वसतीगृह शुल्क – 600 रु. वार्षिक
- प्रयोगशाळा शुल्क – 100 टक्के
- जिमखाना शुल्क – 100 टक्के
पात्रता
- माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत वरचा क्रमांक मिळविणारे गुणवान विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती साठी पात्र आहेत.
- सदर योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीच्या आधारे निवड पत्र पाठविण्यात येते. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतांना सदर पत्राची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच त्या सोबत संबंधित विद्यार्थ्यांनी या योजनेचे नियम मान्य असल्याचे संमती पत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
- पात्र विद्यार्थांची यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित यादीमध्ये नावे असलेले विद्यार्थीच सदर शिष्यवृत्तीसाठी (Fresh) अर्ज करु शकतात.
- सदर यादीतील महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शिकत असलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- शिष्यवृत्ती पुढे चालू राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे वर्तन, प्रगती समाधानकारक असणे आवश्यक आहे.
- विविध शुल्काची (फी ची) प्रतीपुर्ती शासनाने किंवा संबंधीत विद्यापीठाने मान्य केलेल्या दरानुसार केली जाईल.
- या योजनेचा लाभ घेत असतांना विद्यार्थ्यांला केंद्र अथवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्तीच्या अथवा सवलतीचा लाभ घेता येणार नाही, मात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही अट लागू नाही, त्यांना केंद्र / राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती / सवलती नुसार शिक्षण फी किंवा परीक्षा फी ची भरपाई होत असेल तर अशी शिक्षण फी किंवा परीक्षा फी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देय नाही. तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थास सदर योजनेचा लाभ घेता येईल. मात्र राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती नुसार मिळणाऱ्या पुस्तक अनुदानाची रक्कम वजा करून सदर शिष्यवृत्तीसाठी पुस्तक अनुदानाची रक्कम देय आहे.
- गुणवान विद्यार्थास एखाद्या वर्षी गुणाची टक्केवारी कमी असल्यास त्याचे त्यावर्षी आर्थक सहाय्य स्थगीत ठेवण्यात येईल. पुढील वर्षी सदर विद्यार्थाने गुणाची अट पूर्ण केल्यास त्याचे आर्थिक सहाय्य सुरु करण्यात येईल.
नूतनीकरण धोरण
- मागील वर्षी सदर शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती च्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात.
- नूतनीकरनासाठी संचालनालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या Application ID चा उपयोग करावा.
- मागील वर्षात विद्यार्थांना किमान ५५ टक्के गुण आवश्यक.
- नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
आवश्यक कागदपत्रे
- मागील वर्षाची गुणपत्रिका.
- चालू वर्षाची शुल्क भरल्याची पावती.
- वसतिगृहाचे शुल्क भरल्याची पावती.
- DHE शिष्यवृत्ती मंजूर पत्र
माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
सदर योजनेंतर्गत राज्यातील मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थेत पदवी व पदव्युत्तर स्तरावर शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलतीचा लाभ देण्यात येते.
फायदे
प्रवेश शुल्क 100%
सेमिस्टर फी 100%
ग्रंथालय शुल्क 100%
प्रयोगशाळा शुल्क 100%
पात्रता
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या किंवा महाराष्ट्रात भरती झालेल्या मेजर, नौदल वा वायु दलातील तत्सम दर्जाच्या हुद्यापर्यंत (वा त्यापेक्षा कमी दर्जाच्या हुद्यावरुन) सेवेतुन निवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या मुलांना/मुलींना, पत्नींना/विधवांना या योजनेखाली शैक्षणिक सवलती देय आहेत.
- वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास अथवा वरच्या वर्गात पदोन्नत न झाल्यास या सवलती स्थगीत ठेवण्यात येतील. मात्र जर नंतर विद्यार्थी वरच्या वर्गात पदोन्नत झाला की त्यास ही सवलत पुढे चालू ठेवण्यात येईल
- या सवलतीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस अन्य दुसऱ्या योजनेखाली फी माफी, पुस्तक अनुदान, गणवेश अनुदान इत्यादी सवलतींचा लाभ या सवलती बरोबर घेता येणार नाही. तसेच एकाच वेळी एका विद्यार्थ्याला एका पेक्षा जास्त अभ्यासक्रमांना या सवलतीचा लाभ दिला जाणार नाही.
- केवळ शासकीय, अनुदानित महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थीच अर्ज करण्यास पात्र आहेत.
- महाराष्ट्र बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
- नूतनीकरण धोरण
- या सवलती समाधानकारक प्रगती, चांगली वर्तणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहित अभ्यासक्रम संपेपर्यत चालू राहतील.
- नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
आवश्यक कागदपत्रे
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा माजी सैनिकाचे महाराष्ट्रात भरती / सेवानिवृत्त झालेबाबतचे प्रमाणपत्र.
- डी.एस.एस.ए.बोर्ड/सी.एस.एस.ए.बोर्ड यांचे महाराष्ट्र राज्याचे अधिकार पत्र धारण करीत असल्याचे किंवा महाराष्ट्रात भरती झाल्याचे व मेजर व नौदल आणि वायुदलातील तत्सम दर्जाच्या हुद्दापर्यंत वा (या हुद्दापेक्षा कमी हुद्दावरुन) निवृत्त माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र.
- मागील वर्षाची गुणपत्रीका.
एकलव्य आर्थिक सहाय्य
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
राज्य शासनाकडून होतकरु व गरिब विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी एकलव्य आर्थक सहाय्य योजना सुरु करण्यात आलेली आहे.
फायदे
सदर शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थांना प्रतिवर्ष रु 5000/- प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
पात्रता
- कला , वाणिज्य , विधी व शिक्षणशास्त्र शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान 60 टक्के व विज्ञान शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये किमान 70 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 75,000/- किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- संबंधित लाभार्थी विद्यार्थी कुठेही पुर्णवेळ नोकरी करणारा नसावा.
- शिष्यवृत्ती घेणारा विद्यार्थी शुल्क माफीच्या सवलतीस पात्र राहील.
- अर्धवेळ अभ्यासक्रमाचा विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाही.
- बी .एड. प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच एम.फील व पी.एच.डी व तत्सम अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू नाही.
- सदर शिष्यवृत्ती मंजुर झाल्यास इतर केंद्र / राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत
नूतनीकरण धोरण
- नियमित उपस्थिती 75 टक्के असणे आवश्यक आहे.
- पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षी किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
- नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
आवश्यक कागदपत्रे
- सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहसिलदार अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमापणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- मागील वर्षाची गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे .
- नूतनीकरणासाठी उपस्थिती प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
राज्यातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्याना उच्च शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे म्हणून सदर शिष्यवृत्ती दिली जाते. सदर योजनेसाठी एकुण 1208 संच शाखानिहाय खालीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेले आहेत.
फायदे
सदर योजनेसाठी प्रतिमाह 100 रु. याप्रमाणे दहा महिन्याकरिता रक्कम रु. 1000/- शिष्यवृत्ती देण्यात येते.
पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- इयत्ता बारावी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
- कला, वाणिज्य, विज्ञान आणि विधी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज (Fresh) करण्यास पात्र आहेत.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
नूतनीकरण धोरण
- या सवलती समाधानकारक प्रगती, चांगली वर्तणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहित अभ्यासक्रम संपेपर्यत चालू राहतील.
- नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
आवश्यक कागदपत्रे
- अधिवास प्रमाणपत्र
- मागील वर्षाची गुणपत्रिका
- बोनाफाईड सर्टिफिकेट
गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
- राज्यातील गणित व भौतिकशास्त्र विषयात इ. 12 वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविणा-या विद्यार्थ्याना उच्च शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे म्हणून सदर शिष्यवृत्ती दिली जाते.
- सदर योजनेसाठी गणित विषयासाठी 50 व भौतिकशास्त्र विषयासाठी 50 असे एकुण 100 संच मंजुर आहेत.
फायदे
सदर योजनेसाठी पात्र विद्यार्थांना प्रतिमाह 100 रु. याप्रमाणे दहा महिन्याकरिता रक्कम रु. 1000/- शिष्यवृत्ती देण्यात येते.
पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- इ. 12 वी विज्ञान या परीक्षेत किमान 60 टक्के व गणित किंवा भौतिकशास्त्र या विषयात 60 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
- पदवी अभ्यासक्रमांसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेताना गणित किंवा भौतिकशास्त्र हा प्रमुख विषय घेणारे विद्यार्थीच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- महाराष्ट्र बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत
नूतनीकरण धोरण
- या सवलती समाधानकारक प्रगती, चांगली वर्तणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहित अभ्यासक्रम संपेपर्यत चालू राहतील.
- नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
आवश्यक कागदपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- मागील वर्षाची गुणपत्रिका
- बोनाफाईड सर्टिफिकेट
महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांसाठी येथे क्लिक करा
शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
- राज्यातील शासकीय विद्यानिकेतन यामधुन शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10वी) उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी विद्यानिकेतन शिष्यवृत्ती दिली जाते.
- सदर योजनेसाठी शासकीय विद्यानिकेतन पुसेगांव, अमरावती, औरंगाबाद, व धुळे यांचेकरिता प्रत्येकी 20 प्रमाणे एकुण 80 संच मंजुर आहे.
फायदे
इ . 10 वी 12 वी प्रतिमाह 100 प्रमाणे रक्कम रू. 1000/- पदवी व
पदव्युत्तर विद्यार्थ्यासाठी प्रतिमाह 150 प्रमाणे रक्कम रु. 1500/- उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर आहे.
पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- शासकीय विद्यानिकेतन पुसेगांव, अमरावती, औरंगाबाद, व धुळे मधून इयत्ता 10 च्या वर्गात 60% गुण मिळवणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
नूतनीकरण धोरण
- या सवलती समाधानकारक प्रगती, चांगली वर्तणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहित अभ्यासक्रम संपेपर्यत चालू राहतील.
- नूतनीकरणा साठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
आवश्यक कागदपत्रे
- अधिवास प्रमाणपत्र
- बोनाफाईड सर्टिफिकेट.
- मागील वर्षाची गुणपत्रिका.
- नवीन मंजुरी साठी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतलेबाबतचे बोनाफाईड प्रमापत्र.
- नवीन मंजुरी साठी शासकीय निद्यानिकेतनाद्वारे प्राप्त इन्टायटलमेंट कार्ड.
राज्य शासनाची दक्षिणा अधिधात्रवृत्ती
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
राज्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर शिक्षण घेण्यास उत्तेजन मिळावे म्हणून सदर शिष्यवृत्ती दिली जाते.
खालील प्रमाणे शासकीय महाविद्यालय / संस्था यामधून 54 व विद्यापीठामधील 22 असे एकूण 76 संच मंजूर आहेत.
फायदे
सदर शिष्यवृत्ती मंजूर विद्यार्थांना 250 रु प्रमाणे दहा महिन्याकरिता रक्कम रु. 2500 शिष्यवृत्ती देण्यात येते.
पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
नूतनीकरण धोरण
विद्यार्थ्यांचे अभ्यासातील समाधानकारक प्रगती अहवालानूसार दुसऱ्या वर्षाचे नुतनीकरण मंजूर केले जाते.
नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
आवश्यक कागदपत्रे
- अधिवास प्रमाणपत्र
- मागील वर्षाची गुणपत्रिका.
- बोनाफाईड सर्टिफिकेट
शासकीय संशोधन अधिधात्रवृत्ती
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्याना त्यांच्या विषयामध्ये पी.एच.डी. करता यावी. या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
सदर योजनेसाठी खालीलप्रमाणे 14 संच मंजूर आहेत.
वरीलप्रमाणे अ. क्र. 1 ते 05 मधील संच महाविद्यालयीन स्तरावर प्राचार्यानी गठित केलेल्या समितीमार्फत निवडण्यात येतात.
तसेच अ .क्र. 06 मधील 03 संच शिक्षण संचालकांच्या स्तरावर गठित केलेल्या समितीमार्फत निवडण्यात येतात.
फायदे
सदर योजनेसाठी पात्र विद्यार्थास पीएच.डी. प्रतिवर्ष 9000/- व रु 1000 वार्षिक सादीलवार खर्च हे लाभ देण्यात येतात.
पात्रता
- विद्यार्थी हा महाराष्ट्रचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- संबंधित छात्र कोठेही सेवेत नसावा. तसेच इतर कोणतीही शिष्यवृत्ती अथवा विद्यावेतन स्विकारता येणार नाही.
- संबंधित विद्यार्थ्याने पीएच.डी. साठी विद्यापीठामध्ये रीतसर नोंदणी करून संबंधित मार्गदर्शकाने शिफारस करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याने जो विषय निवडला असेल त्याविषयासाठी विद्यापीठाने मान्यता दिलेल्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण वेळ संशोधन कार्य करावे लागेल.
- अधिछात्रवृत्तीचा कालावधी 3 वर्षाचा राहिल.
- सदर शिष्यवृत्ती चे राज्य स्तरावर 3 व महाविद्यालयीन स्तरावर 11 संच आहेत.
- शिक्षण संचालकांच्या स्तरावर गठित केलेल्या समितीमार्फत विद्यापीठे व संलग्नीत महाविद्यालयातील प्राप्त अर्जांची छाननी करुन गुणवत्तेनुसार विहित 3 संचांची निवड केली जाते.
- महाविद्यालयीन स्तरावर प्राचार्यानी गठित केलेल्या समितीमार्फत पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर संशोधनपर रेकॉर्ड पाहून त्यांना विहित केलेल्या संचास अधिन राहून प्राचार्याकडून निवड केली जाते.
- या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नाही.
- ज्या विद्यार्थांनी पदवी (बी.ए. / बीएससी / बीएड) आणि पदव्युत्तर (एम.ए. / एमएससी / एम.एड.) यापैकी कोणत्याही एका पदवी परीक्षेत किमान 60 टक्के (प्रथम श्रेणी ) गुण प्राप्त केले आहेत व अन्य पदवी परीक्षेत 55 टक्के (द्वितीय श्रेणी ) प्राप्त केली आहे असे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि एखाद्या वर्षी वरील अट पूर्ण करणारे विद्यार्थी उपलब्ध नसतील तर त्या वर्षी ज्या विद्यार्थाने पदवी व पदव्युत्तर स्तरावर द्वितीय श्रेणी (55 टक्के) प्राप्त केली आहे असे विद्यार्थी पात्र समजले जातील.
- सदर शिष्यवृत्ती साठी केवळ (बी.ए. / बीएससी / बीएड) आणि पदव्युत्तर (एम.ए. / एमएससी / एम.एड.) हे अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच शिष्यवृत्ती साठी अर्ज करू शकतात.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
- नूतनीकरण धोरण
- या सवलती समाधानकारक प्रगती, चांगली वर्तणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहित अभ्यासक्रम संपेपर्यत चालू राहतील.
- नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- मार्गदर्शकासाठी विद्यापीठाचे स्वीकृति पत्र.
- पीएच.डी. मार्गदर्शक यांनी विद्यार्थी त्यांचेकडे पीएच.डी. करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम गुणपत्रिका.
- नूतनीकरणासाठी मागील वर्षाचा मार्गदर्शकाने दिलेला प्रगती अहवाल
स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
सदर योजनेंतर्गत राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्थेत पदवी व पदव्युत्तर स्तरावर शिक्षण घेणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलतीचा लाभ देण्यात येतो.
फायदे
सदर सवलती अंतर्गत खालील प्रमाणे लाभ देण्यात येतो.
- प्रवेश शुल्क – 100 टक्के
- सत्र शुल्क – 100 टक्के
- ग्रंथालय शुल्क -100 टक्के
- प्रयोगशाळा शुल्क – 100 टक्के
- शिक्षण शुल्क – लाभार्थी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयांकडून आकारली जात नाही. तसेच संबंधित महाविद्यालयास सदरची रक्कम देण्यात येत नाही. (सदर शिष्यवृत्तीसाठी केवळ शासकीय, अनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थीच पात्र आहेत.)
शिष्यवृत्ती रक्कम –
- पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम (अभियांत्रिकी अभ्यासक्रम वगळून) – 50 रु. वार्षिक
- पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम (अभियांत्रिकी अभ्यासक्रम) – 60 रु. वार्षिक
पुस्तके व इतर खर्च
- पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम (अभियांत्रिकी अभ्यासक्रम वगळून) – 200 रु. वार्षिक
- पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम (अभियांत्रिकी अभ्यासक्रम) – 400 रु. वार्षिक
पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार स्वातंत्र्य सैनिकांचा पाल्य असणे आवश्यक आहे.
- स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना म्हणजेच स्वातंत्र्य सैनिकांचे पत्नी, मुले (दत्तक आणि सावत्र) आणि नातवंड (मृत्यु पावलेल्या मुलांची मुले) या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- सदर योजनेचा लाभ राज्यातील शासकीय / अशासकीय अनुदानित महाविद्यालयामधील अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांनाच देय आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेर शिकत असलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
नूतनीकरण धोरण
- या सवलती समाधानकारक प्रगती, चांगली वर्तणूक व नियमित उपस्थिती असल्यास विहित अभ्यासक्रम संपेपर्यत चालू राहतील.
- नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
आवश्यक कागदपत्रे
- अधिवास प्रमाणपत्र
- स्वांतत्र्य सैनिकाला ज्याठिकाणी कारावासाची शिक्षा झालेली आहे त्या जिल्हयातील दंडाधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- मागील वर्षाची गुणपत्रीका.
- बोनाफाईड सर्टिफिकेट
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली यांचे कडून विहित नियमानुसार त्या विद्यापीठात शिकत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यामधून एका विद्यार्थ्याची सदर शिष्यवृत्ती साठी निवड केली जाते. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने निवड केल्यानुसार विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाची मंजुरी घेतल्यानंतर सदर शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
फायदे
सदर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थास दरमहा रु. 8000/- व रु. 10000 वार्षिक सादीलवार खर्च अशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
पात्रता
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली यांचे कडून विहित नियमानुसार त्यांचे विद्यापीठात शिकत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यामधून एका निवड केलेल्या विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाची मंजुरी घेऊन सदर शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.
- पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथे प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
नूतनीकरण धोरण
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली यांचेकडील वार्षिक प्रगती अहवाल.
आवश्यक कागदपत्रे
- अधिवास प्रमाणपत्र
- मागील वर्षाची गुणपत्रिका
- नूतनीकरना साठी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली यांचेकडील वार्षिक प्रगती अहवाल.
गुणवान विद्यार्थांना आर्थिक सहाय्य – वरिष्ठ पातळी
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या मुंबई, पुणे, लातूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापुर, अमरावती, नागपुर व कोकण या परीक्षा विभागातील परीक्षेत वरचा क्रमांक मिळविणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते.
फायदे
सदर शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे 11 प्रकारच्या शुल्काचा लाभ देण्यात येतो.
- प्रवेश शुल्क – 100 टक्के
- सत्र शुल्क – 100 टक्के
- भोजन शुल्क – 150 रु. प्रतिमाह प्रमाणे दहा महिन्याकरिता = 1500 रु.
- वैद्यकीय खर्च – विद्यार्थ्यांचा झालेला खर्च किंवा रु. 120 यापैकी जी रक्कम कमी असेल अशी रक्कम.
- परीक्षा शुल्क – 100 टक्के
- शिक्षण शुल्क – 100 टक्के
- ग्रंथालय शुल्क – 100 टक्के
पुस्तके व इतर स्टेशनरी साहित्य
- पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम (science, veterinary and Agriculture अभ्यासक्रम वगळून) – 500 रु. वार्षिक
- पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम (science, veterinary and Agriculture अभ्यासक्रमासाठी) – 700 रु. वार्षिक
- वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम – 1000 रु. वार्षिक
- पदवीका अभ्यासक्रम – 500 रु. वार्षिक
- वसतीगृह शुल्क – 600 रु. वार्षिक
- प्रयोगशाळा शुल्क – 100 टक्के
- जिमखाना शुल्क – 100 टक्के
पात्रता
- माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेत वरचा क्रमांक मिळविणारे गुणवान विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती साठी पात्र आहेत.
- सदर योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीच्या आधारे निवड पत्र पाठविण्यात येते. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करतांना सदर पत्राची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच त्या सोबत संबंधित विद्यार्थ्यांनी या योजनेचे नियम मान्य असल्याचे संमती पत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
- पात्र विद्यार्थांची यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित यादीमध्ये नावे असलेले विद्यार्थीच सदर शिष्यवृत्तीसाठी (Fresh) अर्ज करु शकतात.
- सदर यादीतील महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शिकत असलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- शिष्यवृत्ती पुढे चालू राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे वर्तन, प्रगती समाधानकारक असणे आवश्यक आहे.
- विविध शुल्काची (फी ची) प्रतीपुर्ती शासनाने किंवा संबंधीत विद्यापीठाने मान्य केलेल्या दरानुसार केली जाईल.
- या योजनेचा लाभ घेत असतांना विद्यार्थ्यांला केंद्र अथवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्तीच्या अथवा सवलतीचा लाभ घेता येणार नाही, मात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही अट लागू नाही, त्यांना केंद्र / राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती / सवलती नुसार शिक्षण फी किंवा परीक्षा फी ची भरपाई होत असेल तर अशी शिक्षण फी किंवा परीक्षा फी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देय नाही. तसेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थास सदर योजनेचा लाभ घेता येईल. मात्र राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती नुसार मिळणाऱ्या पुस्तक अनुदानाची रक्कम वजा करून सदर शिष्यवृत्तीसाठी पुस्तक अनुदानाची रक्कम देय आहे.
- गुणवान विद्यार्थास एखाद्या वर्षी गुणाची टक्केवारी कमी असल्यास त्याचे त्यावर्षी आर्थक सहाय्य स्थगीत ठेवण्यात येईल. पुढील वर्षी सदर विद्यार्थाने गुणाची अट पूर्ण केल्यास त्याचे आर्थिक सहाय्य सुरु करण्यात येईल.
नूतनीकरण धोरण
मागील वर्षी सदर शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती च्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात.
नूतनीकरनासाठी संचालनालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या Application ID चा उपयोग करावा.
मागील वर्षात विद्यार्थांना किमान ६५ टक्के गुण आवश्यक.
नूतनीकरनासाठी विद्यार्थाने उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील Application ID चा उपयोग करावा.
आवश्यक कागदपत्रे
- मागील वर्षाची गुणपत्रिका.
- चालू वर्षाची शुल्क भरल्याची पावती.
- वसतिगृहाचे शुल्क भरल्याची पावती.
- DHE शिष्यवृत्ती मंजूर पत्र
डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
विभागाचे नाव
उच्च शिक्षण संचालनालय
आढावा
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय / अशासकीय अनुदानित / अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान- विना अनुदान) / कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये व अकृषी विद्यापीठे व त्या विद्यापीठा अंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यीत खाजगी विद्यापीठे वगळून) व्यावसायीक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देय आहे.
फायदे
पात्रता
- विद्यार्थ्याने शासकीय / निमशासकीय / खाजगी वसतिगृहामध्ये प्रवेश घेतला असल्यास त्या विद्यार्थ्याने त्याबाबतचा पुरावा अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
- तसेच खाजगी मालकीच्या घरामध्ये विद्यार्थ्याने स्वत:ची राहण्याची सोय केली असल्यास अशा विद्यार्थ्यास नोंदणीकृत अथवा नोटराईज्ड भाडे कराराची प्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
- एखाद्या विद्यार्थ्याने सामान्य रहिवासी असलेल्या त्याच्या गावातील शहरातील संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास त्यास निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- सदर योजनेचा लाभ हा कुटुंबातील केवळ दोन अपत्यांपर्यत मर्यादित आहे.
- एखाद्या विद्यार्थ्यास अन्य कोणत्याही योजनेखाली निर्वाह भत्ता मिळत असल्यास असा विद्यार्थी या योजनेखाली लाभ मिळण्यास अपात्र आहे.
- विद्यार्थ्यानी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या कालावधीकरीताच निर्वाहभत्ता देण्यात येतो. तथापि एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अथवा काही कारणांमुळे त्याला वरच्या वर्गात प्रवेश न मिळाल्यास त्यास त्या वर्षापुरता निर्वाह भत्ता लाभ अनुज्ञेय नाही.
- या योजनेअंतर्गत रुपये 1.00 लाखपर्यत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्याकरीता निर्वाहभत्त्याचा लाभ देण्याकरीता संख्येची कोणतीही मर्यादा असणार नाही. मात्र रुपये 1.00 लाख ते रुपये 8.00 लाख उत्पन्न मर्यादा असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता प्रत्येक जिल्हयासाठी लाभार्थी विद्यार्थ्याची कमाल संख्या 500 इतकी निश्चित करण्यात येत आहे. त्यापैकी 33 टक्के इतक्या जागा विद्यार्थिनीकरीता राखीव ठेवण्यात येतात. तथापि पुरेशा विद्यार्थिनी उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणाऱ्या जागा त्याच जिल्हयातील विद्यार्थ्याकरीता उपयोगात आणता येतात.
- प्रत्येक जिल्हयातील कोटा हा प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार प्रमाणशीररित्या (Proportionate) निश्चित करण्यात येतो.
- सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे अशा उमेदवार पात्र आहेत.
नूतनीकरण धोरण
मागील वर्षी सदर शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती च्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
- सक्षम प्राधिकरणाने दिलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- पालकांचे अल्पभूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर असलेबाबतचे प्रमाणपत्र किंवा
- शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबंधित तहसिलदार अथवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमापणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- CAP संबंधित कागदपत्रे. (केवळ विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र अभ्यासक्रम )
- गॅप संबंधित दस्तऐवज (गॅप असल्यास)
- दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र
तंत्रशिक्षण संचालनालय
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
विभागाचे नाव
तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
आढावा
या योजनेचा उद्दिष्ठ केंद्रीयभूत प्रवेश घेतलेलं द्वारे (CAP) डिप्लोमा / पदवी / स्नातकोत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थीना आर्थिक सहाय प्रदान करणे
फायदे
शिक्षण शुल्क ५०% व परीक्षा शुल्क ५०%
पात्रता
- अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
- शासन निर्णयामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदार हा व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमासाठी (डिप्लोमा / ग्रॅज्युएशन / पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री) प्रवेश घेतलेला संस्थेचा (प्रमाणित) बोनफाइड विद्यार्थी असावा
- अमान्यताप्राप्त विद्यापीठ आणि खाजगी विद्यापीठ प्रवेशपात्र नाहीत.
- उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया माध्यमातून दाखल होणे गरजेचे आहे.
- अर्जदाराने कोणत्याही इतर शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ नये.
- चालू शैक्षणिक वर्षासाठी, एका कुटुंबातील फक्त 2 मुलांना योजनेसाठी लाभासाठी परवानगी आहे.
- कौटुंबिक / पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- मागील सत्रामध्ये किमान 50% उपस्थिती (कॉलेजमध्ये नव्याने भरती झाल्यास अपवाद)
- अभ्यासक्रम कालावधी दरम्यान, उमेदवाराचे दोन वर्षांपेक्षा जास्त अंतर नसावा.
- सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे अशा उमेदवार पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- 10 वी (एस.एस.सी.) आणि त्यानंतरच्या शैक्षणिक गुणपत्रिका
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र.
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- चालू वर्षात , एका कुटुंबांतील 2 पेक्षा जास्त लाभार्थी नसल्याचे हमीपत्र
- CAP संबंधित दस्तऐवज.
- बायोमेट्रिक उपस्थितीचा पुरावा ( यूआयडीएआय च्या माध्यमातून )
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
विभागाचे नाव
तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
आढावा
सरकारद्वारे निर्धारित व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश करणार्या सरकारी, सरकारी अनुदानीत आणि असंलग्न महाविद्यालय / पॉलिटेक्निक चे विद्यार्थी ज्यांचे पालक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असून जे सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केले आहेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हि एक योजना आहे.
फायदे
अ) नोंदणीकृत कामगार / अल्पभूधारक (मूळ जमीन धारक) यांच्या मुलासाठी
- 10 महिन्यांसाठी एमएमआरडीए / पीएमआरडीए / औरंगाबाद शहर / नागपूर शहरातील संस्थांसाठी 30,000/ –
- 10 महिन्यांसाठी इतर क्षेत्रातील संस्थांसाठी 20,000/ –
ब) आठ लाखांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नासाठी
- 10 महिन्यासाठी एमएमआरडीए / पीएमआरडीए / औरंगाबाद शहर / नागपूर शहरातील संस्थांसाठी 10,000/ –
- 10 महिन्यांसाठी इतर क्षेत्रातील संस्थांसाठी 8000/ –
पात्रता
- अर्जदाराने भारताचे राष्ट्रीयत्व असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने महाराष्ट्र राज्याचा अधिवास असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा “संस्थानचा बोनफाइड विद्यार्थी” असावा आणि व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रम (डिप्लोमा / ग्रॅज्युएशन / पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री) म्हणून प्रवेश दिला जाईल.
- विद्यापीठ आणि खाजगी विद्यापीठ लागू नाही
- उमेदवारांना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (सीएपी) द्वारे प्रवेश दिला पाहिजे.
- अर्जदाराने कोणत्याही इतर शिष्यवृत्तीचा / वारसा लाभ घेऊ नये.
- चालू शैक्षणिक वर्षासाठी, कुटुंबाच्या फक्त 2 मुलांच्या योजनेसाठी लाभासाठी परवानगी आहे.
- कौटुंबिक / पालकांच्या एकूण वार्षिक उत्पन्नाशी 8 लाखांपेक्षा जास्त नसावी.
- मागील सत्रामध्ये किमान 50% उपस्थिती (कॉलेजमध्ये नव्याने भरती झाल्यास अपवाद)
- अभ्यासक्रमाच्या कालावधीत उमेदवाराने 2 वर्षांपेक्षा अधिक अंतर असला पाहिजे.
- सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे अशा उमेदवार पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- 10 वी (एस.एस.सी.) आणि त्यानंतरच्या शैक्षणिक गुणपत्रिका
- उत्पन्न आणि अल्पसंख्याक घोषणापत्र – गैर-न्यायिक स्टॅम्प पेपर किंवा उत्पन्न प्रमाणपत्र वर प्रतिज्ञापत्र. शाळा सोडल्याचा दाखला अल्पसंख्याकांच्या पुरावा म्हणून मानला जाऊ शकतो किंवा स्वयं घोषणापत्र.
- कायम निवासाचा पुरावा: – अधिवास प्रमाणपत्र / निवडणुक पत्र इ. ची प्रत
- शिष्यवृत्तीचे नूतनीकरण करण्यासाठी: – उत्पन्न प्रमाणपत्र व मागील परीक्षेची गुणपत्रिका
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
कनिष्ठ विद्यालयातील शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
आढावा
दहावीच्या परीक्षेत 60 टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र शासन- शालेय शिक्षण विभागातर्फे,
महाराष्ट्र शासनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात ओपन मेरिट शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले जातात.
या शिष्यवृत्तीचा उद्देश त्या विद्यार्थ्यांना अधिक उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा असून ही योजना इयत्ता 11 वी आणि 12 च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देते.
फायदे
11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी: दरमहा 50 रुपये दरमहा (500 रुपये दर वर्षी)
पात्रता
- अर्जदार हा इयत्ता ११वी किंवा १२वी चा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
- पहिल्या प्रयत्नात एस.एस.सी. परीक्षेत अर्जदाराने कमीत कमी 60 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक वर्षात समाधानकारक प्रगती आणि ज्युनियर कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी 50% गुण मिळवणे शिष्यवृत्ती चालू ठेवण्यासाठी अवलंबून आहे.
- लाभकारी – सर्व श्रेणी
आवश्यक कागदपत्रे
- इयता १०वी ची गुणपत्रिका.
- नूतनीकरणासाठी इयत्ता ११ ची गुणपत्रिका
आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
आढावा
महाराष्ट्र शासन- शालेय शिक्षण विभागातर्फे, ईबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ओपन मेरिट शिष्यवृत्तीसाठी 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून (फक्त मुले ) अर्ज मागविले जातात. शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण चालू ठेवण्यास सक्षम करणे हा होय.
फायदे
दरवर्षी प्रत्येक महिन्याला देण्यात येणारी फायदेशीर रक्कम (10 महिन्यांसाठी)दरवर्षी प्रत्येक महिन्याला देण्यात येणारी फायदेशीर रक्कम (10 महिन्यांसाठी)
- वसतिगृहातील मुलांना दरमहा 140 रु.प्रमाणे 10 महिन्यांपर्यंत 1400 रुपये प्राप्त होतील.
- वसतिगृहात न राहणाऱ्या मुलांना दरमहा 80 रुपये प्रमाणे 10 महिन्यांपर्यंत ८०० रुपये पर्यंत प्राप्त होतील.
- वसतिगृहातील मुलींना दरमहा १६० रु. प्रमाणे 10 महिन्यांपर्यंत 1६00 रुपये प्राप्त होतील.
- वसतिगृहात न राहणाऱ्या मुलींना दरमहा १०० रुपये प्रमाणे 10 महिन्यांपर्यंत १००० रुपये पर्यंत प्राप्त होतील.
पात्रता
- अर्जदाराने दहावीच्या परीक्षेत किमान 50% मार्क मिळविणे आवश्यक आहे
- पहिल्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी
आवश्यक कागदपत्रे
- उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी मंजूर केलेले)
- इयता १०वी ची गुणपत्रिका.
- मागील वर्षाची गुणपत्रिका (नूतनीकरणासाठी)
OBC, SEBC, VJNT & SBC Welfare Department
विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
आढावा
- शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
- उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे
- पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
- फक्त विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो.
फायदे
पात्र विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे देखभाल भत्ते प्रदान केलेलं जातात :
- अर्जदाराने गट अ निवडल्यास – होस्टेलर रु. ४२५/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट ब निवडल्यास – होस्टेलर रु. २९०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट क निवडल्यास – होस्टेलर रु. २९०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट ड निवडल्यास – होस्टेलर रु. २३०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १२०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट ई निवडल्यास – होस्टेलर रु. १५०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. ९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- शासकीय / अनुदानित / विना- अनुदानित संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रम आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा १००% लाभ मिळतो.
- वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एकूण शुल्क रक्कमेच्या फक्त एक तृतीयांश रक्कमेचा लाभ प्राप्त होईल.
- बी.एड आणि डी.एड अभ्यासक्रमांसाठी : या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना १००% लाभ प्रदान करण्यात येईल. (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता). अनुदानित, विना अनुदानित संस्थेतून डी.एड आणि बी.एड अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमासाठी शासकीय नियमानुसार असलेले शुल्क संरचनेप्रमाणे शुल्क परतावा प्रदान करण्यात येईल.
- टीप: अर्जदाराने कोणत्याही महिन्याच्या २० तारखेपर्यंत प्रवेश घेतला असेल, तरच त्याला त्या महिन्याचा देखभाल भत्ता प्रदान केला जाईल. अन्यथा देखभाल भत्ता पुढील महिन्यापासून अनुज्ञेय राहील.
पात्रता
- पालकांचे वार्षिक उत्पन्न रू. १.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती श्रेणीतील असावा.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदारांनी शालान्त पूर्व श्रेणीमध्ये शासनाकडून मंजूर केलेल्या शैक्षणिक कोर्सचा पाठपुरावा केला पाहिजे.
- अर्जदाराने पुढील उच्च श्रेणीमध्ये पदोन्नती केली तर अर्जदारांना देखभाल भत्ता व परीक्षा शुल्क दिले जाते.
- जर अर्जदार विशिष्ट वर्षामध्ये अयशस्वी झाला तर त्याला त्या शैक्षणिक वर्षाचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता मिळेल, परंतु पुढील उच्च श्रेणीत त्याला बढती मिळत नाही तोपर्यंत त्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
- केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्जदार CAP राऊंड च्या माध्यमातून येणे आवश्यक आहे.
- केवळ दोन अपत्य (i) मुलींसाठी हि अट बंधनकारक नाही ii) एकाच पालकची जास्तीत जास्त २ मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
- दुसरी कुठलीही शिष्यवृत्ती / वेतनरोख स्विकारल्यास या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अंतर्गत अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
- चालू वर्षासाठी ७५% उपस्थिती अनिवार्य आहे.
- अर्जदाराने (त्याने / तिने) व्यावसायिक ते बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र नसेल परंतु बिगर व्यावसायिक ते व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल.
- एक कोर्स पूर्ण होईपर्यंत अर्जदाराची शिष्यवृत्ती / फ्रीशिप चालू राहील. उदाहरणार्थ – १० वी, १२ वी कला – बी.ए., एम.ए., एम.फिल., पी.एच.डी., इत्यादी. अर्जदाराने बी.ए. आणि बी.एड. पूर्ण केले आणि नंतर एम.ए. साठी प्रवेश घेतल्यानंतर, एम.ए. अभ्यासक्रमासाठी त्याला / तिला शिष्यवृत्तीसाठी परवानगी दिली जाणार नाही. पण बी.एड.नंतर एम.बी.ए. मध्ये प्रवेश केल्यानंतर ते शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील कारण तो व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.
- विशेष व्यावसायिक / बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी, त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती / फ्रीशिप चा लाभ घेतला असल्यास आणि दरम्यान सध्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छित अर्जदारास पुढील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
नूतनीकरण धोरण
- अर्जदाराने मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, अर्जदार एखाद्या वर्षी अनुत्तीर्ण झाल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी कोणत्याही प्रकारचा लाभ प्राप्त होणार नाही.
- गट अ साठी – फक्त गट अ मधील अभ्यासक्रमात शिकणाऱ्या अर्जदारासाठी फक्त पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाल्यास शुल्क परतावा नूतनीकरण उपलब्ध असेल. दुसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयत्नात कोणत्याही वर्गात अनुत्तीर्ण झाल्यास पुढील उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत अर्जदारास तिचा / त्याचा खर्च स्वतः करावा लागेल.
- गट ब, क, ड, ई साठी – त्याला / तिला पुढील उच्च श्रेणीत बढती मिळणे आवश्यक आहे. (दुसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयत्नात कोणत्याही वर्गात अनुत्तीर्ण झाल्यास पुढील उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत अर्जदारास तिचा / त्याचा खर्च स्वतः करावा लागेल)
- इतर कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे अथवा कोणत्याही अपवादात्मक घटनेमुळे अर्जदार वार्षिक परीक्षेत बसू न शकल्यास, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रमाणित असणे आवश्यक आहे कि, संबंधित विद्यार्थ्याने वार्षिक परीक्षा दिली असती तर तो / ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला असता. अर्जदाराने महाविद्यालयाकडे सादर केलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक पुरावे याबाबत संस्थेचे प्रमुख आश्वस्त झाले तरच त्याबाबत मान्यता मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे. (महाराष्ट्र शासनाद्वारे जारी केलेले) वास्तव्याचा पुरावा म्हणून हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
- उत्पन्न प्रमाणपत्र / मिळकत घोषणापत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- जात पडताळणी प्रमाणपत्र – व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम, व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य. बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य नाही.
- १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका किंवा गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- अंतर प्रमाणपत्र – शिक्षणामध्ये खंड असल्यास हे प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
- वडिलांचे / पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- शिधापत्रिका – कुटुंबातील मुलांची एकूण संख्या ओळखण्यासाठी
- शाळा / महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र
- एकूण लाभार्थी मुलांच्या संख्येबाबत आई-वडिलांचे / पालकांचे घोषणापत्र
विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदाने
विभागाचे नाव
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
आढावा
- शिक्षणामध्ये रुची निर्माण करणे.
- शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
- उच्च शिक्षणाद्वारे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे.
- पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
- संबंधित विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क जसे की शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर अनुज्ञेय शुल्कांचा लाभ दिला जातो.
फायदे
- दि. १२/०३/२००७ च्या शासन निर्णयानुसार संबंधित अर्जदारास सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क, जसे की शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर लागू शुल्क यांचा लाभ प्रदान करण्यात येईल. सन २००६-०७ पासून शासकीय, शासन मान्यताप्राप्त खाजगी, विना-अनुदानित आणि कायमस्वरूपी विना-अनुदानित महाविद्यालयातून CAP फेरीच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अर्जदारांनी शिक्षण शुल्क समितीद्वारे मंजूर केलेल्या शिक्षण आणि परीक्षा शुल्काचा १००% लाभ प्रदान करण्यात येईल.
- ज्या अर्जदारांनी Deemed विद्यापीठातून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल, त्यांना हि शिष्यवृत्ती / freeship लागू होणार नाही.
- अर्जदाराने महाविद्यालयात / संस्थेत प्रवेश घेतलेल्या तारखेनुसार अर्जाची प्रारंभ तारीख निश्चित केली जाईल आणि परीक्षेची शेवटची तारीख हि अर्जाची अंतिम तारीख म्हणून निश्चित केली जाईल. (१० महिन्यांसाठी – प्रवेशाच्या ताराखेमध्ये शैक्षणिक वर्षागणिक बदल होईल)
पात्रता
- अर्जदाराने मॅट्रिकोत्तर शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
- अर्जदार विजाभज प्रवर्गातील असावा.
- पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
- शासनाद्वारे मंजूर केलेल्या मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
- अर्जदाराने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ शासकीय अनुदानित / खाजगी विना अनुदानित / कायमस्वरूपी खाजगी विनाअनुदानित संस्थेत / महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.
- आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम (वैद्यकीय, दंतवैद्यकीय, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, व्यावसायिकोपचार, नर्सिंग):
- खाजगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये प्रवेश परीक्षा व्यवस्थापन असोसिएशन आणि सरकारी प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश घेतलेले विद्यार्थी फ्रीशिप साठी पात्र असतील.
- उच्च व तंत्र शिक्षण विभाग :
- विना अनुदानित महाविद्यालये / तांत्रिक शिक्षण / तंत्रनिकेतन साठीची शासकीय अनुदानित महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या शासकीय विना अनुदानित महाविद्यालयांसाठी फ्रीशिप लागू होईल.
- पदविका – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी
- पदवी – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी
- पदव्युत्तर – एमबीए / एमएमएस, एमसीए
- शेती, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय विभाग:
- शिष्यवृत्ती शुल्क हे खाजगी अनिवासी / कायम स्वरूपी अनुदानित संस्थेमध्ये शासकीय कोटातून प्रवेश मिळालेल्या अर्जदारांना लागू असेल.
- कृषी महाविद्यालये (पदविका)
- दुग्धव्यवसाय विभाग (पदविका)
- कृषी आणि संबंधित विषयांसाठी महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर)
- कृषी आणि जैव-तंत्रज्ञान महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर)
- कृषी आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर)
- बी.एड. आणि डी.एड अभ्यासक्रमासाठी: डी.एड., बी.एड अभ्यासक्रमांसाठी १००% लाभ (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क) लागू आहे. डी.एड., बी.एड. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या अनुदानित, विना अनुदानित महाविद्यालयातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुल्क संरचना हि शासकीय दराप्रमाणे लागू राहील.
- केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्जदार CAP राऊंड च्या माध्यमातून येणे आवश्यक आहे.
- जर अर्जदार विशिष्ट वर्षामध्ये अयशस्वी झाला तर त्याला त्या शैक्षणिक वर्षातील शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा लाभ मिळेल , परंतु पुढील उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत त्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदाराने (त्याने / तिने) व्यावसायिक ते बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार नाही परंतु बिगर व्यावसायिक ते व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल.
- जर एखाद्या अर्जदाराला २०१५-१६ च्या पासून पुढे खाजगी विना अनुदानित / कायम विना अनुदानित संस्थामध्ये प्रवेश दिलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विशिष्ट शैक्षणिक अभ्यासक्रमात दोन किंवा अधिक वेळा परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास तो / ती फ्रीशिप साठी पात्र ठरणार नाही.
- कोणताही एक अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत अर्जदारास शिष्यवृत्ती / फ्रीशिप चा लाभ मिळेल. उदा. – ११ वी, १२ वी, कला – बी.ए., एम.ए., एम.फिल., पी.एच.डी. इत्यादी. जर अर्जदाराने बी.ए. आणि बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एम.ए. साठी प्रवेश घेतला, तर एम.ए. अभ्यासक्रमासाठी त्याला / तिला शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. परंतु बी.एड.नंतर एम.बी.ए. मध्ये प्रवेश घेतल्यानंतर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल कारण तो व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.
- विशेष व्यावसायिक / बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी, त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती / फ्रीशिप चा लाभ घेतला असल्यास आणि दरम्यान सध्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छित अर्जदारास पुढील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
नूतनीकरण धोरण
- अर्जदाराने मागील वर्षाची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदार एका वेळेस एकच शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या फ्रीशिप साठी अर्ज करू शकतो आणि सदर फ्रीशिप तिला / त्याला विशिष्ट वेळेत शैक्षणिक कोर्स पूर्ण केल्यानंतरच लागू होईल.
- अर्जदार 2 पेक्षा जास्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती घेऊ शकत नाही
- इतर कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे अथवा कोणत्याही अपवादात्मक घटनेमुळे अर्जदार वार्षिक परीक्षेत बसू न शकल्यास, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रमाणित असणे आवश्यक आहे कि, संबंधित विद्यार्थ्याने वार्षिक परीक्षा दिली असती तर तो / ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला असता. अर्जदाराने महाविद्यालयाकडे सादर केलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक पुरावे याबाबत संस्थेचे प्रमुख आश्वस्त झाले तरच त्याबाबत मान्यता मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- उत्पन्न प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका किंवा गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- अंतर प्रमाणपत्र – शिक्षणामध्ये खंड असल्यास हे प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
- एकूण लाभार्थी मुलांच्या संख्येबाबत आई-वडिलांचे / पालकांचे घोषणापत्र
- वडिलांचे / पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- CAP वाटप पत्र (फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी)
- जात पडताळणी प्रमाणपत्र (दि. ३१ जुलै २००८ च्या शासन निर्णयानुसार फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी) निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सूट लागू होईल.
- शाळा / महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र
- शिधापत्रिका – कुटुंबातील मुलांची एकूण संख्या ओळखण्यासाठी
व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना
विभागाचे नाव
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
आढावा
व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहामध्ये राहणा-या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता प्रदान केला जातो
फायदे
- महाविद्यालयाशी संलग्नित वसतिगृहात राहणाऱ्या अर्जदारांसाठी देखभाल भत्ता (१० महिन्यांसाठी) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे (वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय, वास्तुकला, इत्यादी.) दरमहा रु. ७००/- म्हणजेच रु. ७०००/- (१० महिन्यांसाठी)
- महाविद्यालयाशी संलग्नित वसतिगृहात राहणाऱ्या अर्जदारांसाठी देखभाल भत्ता (१० महिन्यांसाठी) अभ्यासक्रम कालावधी २ ते ३ वर्षे (अभियांत्रिकी पदविका, M.B.A, M.S.W, इत्यादी.) दरमहा रु. ५००/- म्हणजेच रु. ५०००/- (१० महिन्यांसाठी)
- महाविद्यालयाशी संलग्नित वसतिगृहात राहणाऱ्या अर्जदारांसाठी देखभाल भत्ता (१० महिन्यांसाठी) 2 वर्ष आणि कमी कालावधीचे (बी.एड., डी.एड., इत्यादी) अभ्यासक्रम दरमहा रु. ५००/- म्हणजेच रु. ५०००/- (१० महिन्यांसाठी)
- शासकीय वसतिगृहात न राहणाऱ्या अर्जदारांसाठी देखभाल भत्ता (१० महिन्यांसाठी) अभ्यासक्रम कालावधी ४ ते ५ वर्षे (वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय, वास्तुकला, इत्यादी.) दरमहा रु. १०००/- म्हणजेच रु. १०,०००/- (१० महिन्यांसाठी)
- शासकीय वसतिगृहात न राहणाऱ्या अर्जदारांसाठी देखभाल भत्ता (१० महिन्यांसाठी) अभ्यासक्रम कालावधी २ ते ३ वर्षे (अभियांत्रिकी पदविका, M.B.A, M.S.W, इत्यादी.) दरमहा रु. ७००/- म्हणजेच रु. ७०००/- (१० महिन्यांसाठी)
- शासकीय वसतिगृहात न राहणाऱ्या अर्जदारांसाठी देखभाल भत्ता (१० महिन्यांसाठी) 2 वर्ष आणि कमी कालावधीचे (बी.एड., डी.एड., इत्यादी) अभ्यासक्रम दरमहा रु. ५००/- म्हणजेच रु. ५०००/- (१० महिन्यांसाठी)
पात्रता
- अर्जदार अभियांत्रिकी, वैद्यकीय, पशुवैद्यकीय, आर्किटेक्चर आणि शेती यापैकी अभ्यासक्रमात शिक्षण घेणारा असावा.
- अर्जदार हा विजाभज आणि विमाप्र प्रवर्गातील असावा.
- अर्जदाराने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी पात्र असावा.
- अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रू. 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- अर्जदाराने शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी केलेला अर्ज सादर करावा.
- अर्जदाराने जर शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश घेतला तर त्याला देखभाल भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- अर्जदाराने व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्नित वसतिगृहांमध्ये प्रवेश घेतला पाहिजे किंवा संबंधित वसतिगृहात खोली उपलब्धता नसल्याचे प्रमाणपत्र सादर करावे.
- वसतिगृहाबाहेर राहणा-या अर्जदारास, त्यांनी शासकीय वसतिगृहासाठी आणि महाविद्यालय वसतिगृहसाठी अर्ज केला होता, परंतु प्रवेशासाठी पात्र असून सुद्धा त्याला प्रवेश मिळू शकला नाही याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.
- जर अर्जदार विशिष्ट वर्षामध्ये अनुत्तीर्ण झाला तर त्याला विशिष्ट शैक्षणिक वर्षाचा देखभाल भत्ता मिळेल, परंतु त्यानंतर उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत पुढील लाभ मिळणार नाही.
- अर्जदाराने (त्याने / तिने) व्यावसायिक ते बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही परंतु बिगर व्यावसायिक ते व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल.
- कोणताही एक अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत अर्जदारास शिष्यवृत्ती / फ्रीशिप चा लाभ मिळेल. उदा. – ११ वी, १२ वी, कला – बी.ए., एम.ए., एम.फिल., पी.एच.डी. इत्यादी. जर अर्जदाराने बी.ए. आणि बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एम.ए. साठी प्रवेश घेतला, तर एम.ए. अभ्यासक्रमासाठी त्याला / तिला शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. परंतु बी.एड.नंतर एम.बी.ए. मध्ये प्रवेश घेतल्यानंतर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल कारण तो व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.
नूतनीकरण धोरण
- अर्जदाराने मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने निर्दिष्ट केलेल्या विशिष्ट शैक्षणिक वर्षातील प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे [एका विशिष्ट वर्षातील तो / ती अनुत्तीर्ण झाल्यास त्या वर्षी लाभ दिला जाणार नाही].
- अर्जदार 2 पेक्षा जास्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती घेऊ शकत नाही.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- उत्पन्न प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- महाविद्यालय प्रवेश पावती
- वॉर्डन प्रमाणपत्र (शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे महाविद्यालयाशी संलग्नित वसतिगृहात राहणाऱ्या अर्जदारांसाठी)
- खाजगी वसतिगृह / ठिकाणचे भाडे करार पत्र (वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी)
- विद्यार्थी शपथपत्र (वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी)
- प्राचार्य प्रमाणपत्र (महाविद्यालयाशी संलग्नित वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी)
- मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा त्याचा / तिचा नोंदणी / अर्ज क्रमांक
- जात पडताळणी प्रमाणपत्र (फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी)
- शाळा / महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र
इयत्ता १० वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
आढावा
- विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जातीतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे
- शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य्य उपलब्ध करणे.
- विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे
- केवळ विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या जातीतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.
फायदे
- इयत्ता ११ वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा रु. ३००/- (१० महिन्यांसाठी) म्हणजेच प्रति वर्ष रु. ३०००/- याप्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.
- अर्जदार या योजनेसोबत शिष्यवृत्ती किंवा फ्रीशिप चा लाभ घेऊ शकतो.
पात्रता
- अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील असावा.
- अर्जदार कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी व १२ वी शिकत असावा.
- सदर शिष्यवृत्तीसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही.
- अर्जदाराने शालांत परीक्षेत ७५% आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे.
- मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती सोबत या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो.
- या शिष्यवृत्तीसाठी शिक्षणात कोणताही खंड नसावा.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
नूतनीकरण धोरण
अर्जदार 11 वी ची परीक्षा उत्तीर्ण असावा.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे. (महाराष्ट्र शासनाद्वारे जारी केलेले)
- १० वी किंवा गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- शाळा / महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र
इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
आढावा
- शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
- उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे
- पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
- फक्त इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो.
फायदे
पात्र इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे देखभाल भत्ते प्रदान केलेलं जातात
- अर्जदाराने गट अ निवडल्यास – होस्टेलर रु. ४२५/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट ब निवडल्यास – होस्टेलर रु. २९०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट क निवडल्यास – होस्टेलर रु. २९०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट ड निवडल्यास – होस्टेलर रु. २३०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १२०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट ई निवडल्यास – होस्टेलर रु. १५०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. ९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- शासकीय / अनुदानित / विना- अनुदानित संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रम आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा ५०% लाभ मिळतो.
- शासकीय / अनुदानित संस्थेतुन व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अर्जदारांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा १००% लाभ प्रदान करण्यात येईल.
- खाजगी / विना-अनुदानित संस्थेतून व्यावसायिक आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यांचा ५०% परतावा आणि देखभाल भत्त्याचा १००% लाभ प्रदान करण्यात येईल.
- शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एकूण शुल्क रक्कमेच्या फक्त एक तृतीयांश रक्कमेचा परतावा प्राप्त होईल.
- खाजगी विना-अनुदानित संस्थेत शिकणाऱ्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय अनुदानित संस्थेतील शुल्क संरचनेवर आधारित शुल्क परतावा प्रदान करण्यात येईल.
- अर्जदार विशिष्ट व्यावसायिक / बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असेल, आणि त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी त्याला / तिला शिष्यवृत्ती / freeship मिळाल्यानंतर त्याच शैक्षणिक वर्षात काही कारणास्तव त्याने / तिने वर्तमान व्यावसायिक / बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रम बदलून घेतल्यास त्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती / freeship प्रदान केली जाणार नाही.
- बी.एड आणि डी.एड अभ्यासक्रमांसाठी : या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना १००% लाभ प्रदान करण्यात येईल. (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता). अनुदानित, विना अनुदानित संस्थेतून डी.एड आणि बी.एड अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमासाठी शासकीय नियमानुसार असलेले शुल्क संरचनेप्रमाणे शुल्क परतावा प्रदान करण्यात येईल.
- टीप: अर्जदाराने कोणत्याही महिन्याच्या २० तारखेपर्यंत प्रवेश घेतला असेल, तरच त्याला त्या महिन्याचा देखभाल भत्ता प्रदान केला जाईल. अन्यथा देखभाल भत्ता पुढील महिन्यापासून अनुज्ञेय राहील.
पात्रता
- पालकांचे वार्षिक उत्पन्न रू. १.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- अर्जदार हा इतर मागासवर्गीय श्रेणीतील असावा.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदारांनी शालान्त पूर्व श्रेणीमध्ये शासनाकडून मंजूर केलेल्या शैक्षणिक कोर्सचा पाठपुरावा केला पाहिजे.
- जर अर्जदार विशिष्ट वर्षामध्ये अयशस्वी झाला तर त्याला त्या शैक्षणिक वर्षाचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता मिळेल, परंतु पुढील उच्च श्रेणीत त्याला बढती मिळत नाही तोपर्यंत त्याला शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
- केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्जदार CAP राऊंड च्या माध्यमातून येणे आवश्यक आहे.
- केवळ दोन अपत्य (i) मुलींसाठी हि अट बंधनकारक नाही ii) एकाच पालकची जास्तीत जास्त 2 मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
- दुसरी कुठलीही शिष्यवृत्ती / वेतनरोख स्विकारल्यास या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अंतर्गत अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
- चालू वर्षासाठी ७५% उपस्थिती अनिवार्य आहे.
- अर्जदाराने (त्याने / तिने) व्यावसायिक ते बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र नसेल परंतु बिगर व्यावसायिक ते व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल.
- एक कोर्स पूर्ण होईपर्यंत अर्जदाराची शिष्यवृत्ती / फ्रीशिप चालू राहील. उदाहरणार्थ – ११ वी, १२ वी कला – बी.ए., एम.ए., एम.फिल., पी.एच.डी.,इत्यादी. अर्जदाराने बी.ए. आणि बी.एड. पूर्ण केले तर आणि नंतर एम.ए. साठी प्रवेश घेतल्यानंतर, एम.ए. अभ्यासक्रमासाठी त्याला / तिला शिष्यवृत्तीसाठी परवानगी दिली जाणार नाही. पण बी.एड.नंतर एम.बी.ए. मध्ये प्रवेश केल्यानंतर ते शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील कारण तो व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.
- विशेष व्यावसायिक / बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी, त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती / फ्रीशिप चा लाभ घेतला असल्यास आणि दरम्यान सध्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छित अर्जदारास पुढील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
नूतनीकरण धोरण
- अर्जदाराने मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, अर्जदार एखाद्या वर्षी अनुत्तीर्ण झाल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी कोणत्याही प्रकारचा लाभ प्राप्त होणार नाही.
- गट अ साठी – फक्त गट अ मधील अभ्यासक्रमात शिकणाऱ्या अर्जदारासाठी फक्त पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाल्यास शुल्क परतावा नूतनीकरण उपलब्ध असेल. दुसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयत्नात कोणत्याही वर्गात अनुत्तीर्ण झाल्यास पुढील उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत अर्जदारास तिचा / त्याचा खर्च स्वतः करावा लागेल.
- गट ब, क, ड, ई साठी – त्याला / तिला पुढील उच्च श्रेणीत बढती मिळणे आवश्यक आहे. (दुसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयत्नात कोणत्याही वर्गात अनुत्तीर्ण झाल्यास पुढील उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत अर्जदारास तिचा / त्याचा खर्च स्वतः करावा लागेल)
- इतर कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे अथवा कोणत्याही अपवादात्मक घटनेमुळे अर्जदार वार्षिक परीक्षेत बसू न शकल्यास, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रमाणित असणे आवश्यक आहे कि, संबंधित विद्यार्थ्याने वार्षिक परीक्षा दिली असती तर तो / ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला असता. अर्जदाराने महाविद्यालयाकडे सादर केलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक पुरावे याबाबत संस्थेचे प्रमुख आश्वस्त झाले तरच त्याबाबत मान्यता मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे. (महाराष्ट्र शासनाद्वारे जारी केलेले) वास्तव्याचा पुरावा म्हणून हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
- उत्पन्न प्रमाणपत्र / मिळकत घोषणापत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- जात पडताळणी प्रमाणपत्र – व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम, व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य. बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य नाही.
- १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका किंवा गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- अंतर प्रमाणपत्र – शिक्षणामध्ये खंड असल्यास हे प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
- वडिलांचे / पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- शिधापत्रिका – कुटुंबातील मुलांची एकूण संख्या ओळखण्यासाठी
- शाळा / महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र
- एकूण लाभार्थी मुलांच्या संख्येबाबत आई-वडिलांचे / पालकांचे घोषणापत्र
विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
आढावा
- शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
- उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे
- पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
- फक्त विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो.
फायदे
पात्र विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे देखभाल भत्ते प्रदान केलेलं जातात
- अर्जदाराने गट अ निवडल्यास – होस्टेलर रु. ४२५/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट ब निवडल्यास – होस्टेलर रु. २९०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट क निवडल्यास – होस्टेलर रु. २९०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट ड निवडल्यास – होस्टेलर रु. २३०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १२०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट ई निवडल्यास – होस्टेलर रु. १५०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. ९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- शासकीय / अनुदानित / विना- अनुदानित संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रम आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा १००% लाभ मिळतो.
- वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एकूण शुल्क रक्कमेच्या फक्त एक तृतीयांश रक्कमेचा लाभ प्राप्त होईल.
- बी.एड आणि डी.एड अभ्यासक्रमांसाठी : या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना १००% लाभ प्रदान करण्यात येईल. (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता). अनुदानित, विना अनुदानित संस्थेतून डी.एड आणि बी.एड अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमासाठी शासकीय नियमानुसार असलेले शुल्क संरचनेप्रमाणे शुल्क परतावा प्रदान करण्यात येईल.
- टीप: अर्जदाराने कोणत्याही महिन्याच्या २० तारखेपर्यंत प्रवेश घेतला असेल, तरच त्याला त्या महिन्याचा देखभाल भत्ता प्रदान केला जाईल. अन्यथा देखभाल भत्ता पुढील महिन्यापासून अनुज्ञेय राहील.
पात्रता
- पालकांचे वार्षिक उत्पन्न रू. १.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- अर्जदार हा विमाप्र श्रेणीतील असावा.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदारांनी शालान्त पूर्व श्रेणीमध्ये शासनाकडून मंजूर केलेल्या शैक्षणिक कोर्सचा पाठपुरावा केला पाहिजे.
- जर अर्जदार विशिष्ट वर्षामध्ये अयशस्वी झाला तर त्याला त्या शैक्षणिक वर्षाचे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता मिळेल, परंतु पुढील उच्च श्रेणीत त्याला बढती मिळत नाही तोपर्यंत त्याला शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
- केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्जदार CAP राऊंड च्या माध्यमातून येणे आवश्यक आहे.
- केवळ दोन अपत्य (i) मुलींसाठी हि अट बंधनकारक नाही ii) एकाच पालकची जास्तीत जास्त 2 मुले शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
- दुसरी कुठलीही शिष्यवृत्ती / वेतनरोख स्विकारल्यास या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अंतर्गत अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
- चालू वर्षासाठी ७५% उपस्थिती अनिवार्य आहे.
- अर्जदाराने (त्याने / तिने) व्यावसायिक ते बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र नसेल परंतु बिगर व्यावसायिक ते व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल.
- एक कोर्स पूर्ण होईपर्यंत अर्जदाराची शिष्यवृत्ती / फ्रीशिप चालू राहील. उदाहरणार्थ – ११ वी, १२ वी कला – बी.ए., एम.ए., एम.फिल., पी.एच.डी. इत्यादी. अर्जदाराने बी.ए. आणि बी.एड. पूर्ण केले तर आणि नंतर एम.ए. साठी प्रवेश घेतल्यानंतर, एम.ए. अभ्यासक्रमासाठी त्याला / तिला शिष्यवृत्तीसाठी परवानगी दिली जाणार नाही. पण बी.एड.नंतर एम.बी.ए. मध्ये प्रवेश केल्यानंतर ते शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील कारण तो व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.
- विशेष व्यावसायिक / बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी, त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती / फ्रीशिप चा लाभ घेतला असल्यास आणि दरम्यान सध्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छित अर्जदारास पुढील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
नूतनीकरण धोरण
- अर्जदाराने मागील वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, अर्जदार एखाद्या वर्षी अनुत्तीर्ण झाल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी कोणत्याही प्रकारचा लाभ प्राप्त होणार नाही.
- गट अ साठी – फक्त गट अ मधील अभ्यासक्रमात शिकणाऱ्या अर्जदारासाठी फक्त पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाल्यास शुल्क परतावा नूतनीकरण उपलब्ध असेल. दुसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयत्नात कोणत्याही वर्गात अनुत्तीर्ण झाल्यास पुढील उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत अर्जदारास तिचा / त्याचा खर्च स्वतः करावा लागेल.
- गट ब, क, ड, ई साठी – त्याला / तिला पुढील उच्च श्रेणीत बढती मिळणे आवश्यक आहे. (दुसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयत्नात कोणत्याही वर्गात अनुत्तीर्ण झाल्यास पुढील उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत अर्जदारास तिचा / त्याचा खर्च स्वतः करावा लागेल)
- इतर कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे अथवा कोणत्याही अपवादात्मक घटनेमुळे अर्जदार वार्षिक परीक्षेत बसू न शकल्यास, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रमाणित असणे आवश्यक आहे कि, संबंधित विद्यार्थ्याने वार्षिक परीक्षा दिली असती तर तो / ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला असता. अर्जदाराने महाविद्यालयाकडे सादर केलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक पुरावे याबाबत संस्थेचे प्रमुख आश्वस्त झाले तरच त्याबाबत मान्यता मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे. (महाराष्ट्र शासनाद्वारे जारी केलेले) वास्तव्याचा पुरावा म्हणून हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
- उत्पन्न प्रमाणपत्र / मिळकत घोषणापत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- जात पडताळणी प्रमाणपत्र – व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम, व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य. बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य नाही.
- १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका किंवा गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- अंतर प्रमाणपत्र – शिक्षणामध्ये खंड असल्यास हे प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
- वडिलांचे / पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- शिधापत्रिका – कुटुंबातील मुलांची एकूण संख्या ओळखण्यासाठी
- शाळा / महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र
- एकूण लाभार्थी मुलांच्या संख्येबाबत आई-वडिलांचे / पालकांचे घोषणापत्र
इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान
विभागाचे नाव
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
आढावा
- शिक्षणामध्ये रुची निर्माण करणे.
- शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
- उच्च शिक्षणाद्वारे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे.
- पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
- संबंधित इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क जसे की शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर अनुज्ञेय शुल्कांचा लाभ दिला जातो.
फायदे
- दि. १२/०३/२००७ च्या शासन निर्णयानुसार संबंधित अर्जदारास सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क, जसे की शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर लागू शुल्क यांचा लाभ प्रदान करण्यात येईल. सन २००६-०७ पासून शासकीय, शासन मान्यताप्राप्त खाजगी, विना-अनुदानित आणि कायमस्वरूपी विना-अनुदानित महाविद्यालयातून CAP फेरीच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अर्जदारांनी शिक्षण शुल्क समितीद्वारे मंजूर केलेल्या शिक्षण आणि परीक्षा शुल्काचा ५०% लाभ प्रदान करण्यात येईल.
- शासकीय / अनुदानित संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असलेल्या अर्जदारांस शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा १००% लाभ प्रदान करण्यात येईल.
- खाजगी / विना-अनुदानित संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असलेल्या अर्जदारांस शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा ५०% लाभ प्रदान करण्यात येईल.
- ज्या अर्जदारांनी Deemed विद्यापीठातून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल, त्यांना हि शिष्यवृत्ती / freeship लागू होणार नाही.
- अर्जदाराने महाविद्यालयात / संस्थेत प्रवेश घेतलेल्या तारखेनुसार अर्जाची प्रारंभ तारीख निश्चित केली जाईल आणि परीक्षेची शेवटची तारीख हि अर्जाची अंतिम तारीख म्हणून निश्चित केली जाईल. (१० महिन्यांसाठी – प्रवेशाच्या ताराखेमध्ये शैक्षणिक वर्षागणिक बदल होईल)
- खाजगी / विना-अनुदानित संस्थेतून शिकणाऱ्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केवळ बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय अनुदानित संस्थेच्या शुल्क संरचनेप्रमाणे असलेले शुल्क लागू असेल.
पात्रता
- अर्जदाराने मॅट्रिकोत्तर शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
- पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- अर्जदार इमाव प्रवर्गातील असावा.
- शासनाद्वारे मंजूर केलेल्या मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
- अर्जदाराने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ शासकीय अनुदानित / खाजगी विना अनुदानित / कायमस्वरूपी खाजगी विनाअनुदानित संस्थेत / महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.
- आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम (वैद्यकीय, दंतवैद्यकीय, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, व्यावसायिकोपचार, नर्सिंग):
- खाजगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये प्रवेश परीक्षा व्यवस्थापन असोसिएशन आणि सरकारी प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश घेतलेले विद्यार्थी फ्रीशिप साठी पात्र असतील.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
विना अनुदानित महाविद्यालये / तांत्रिक शिक्षण / तंत्रनिकेतन साठीची शासकीय अनुदानित महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या शासकीय विना अनुदानित महाविद्यालयांसाठी फ्रीशिप लागू होईल.
- पदविका – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी
- पदवी – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी
- पदव्युत्तर – एमबीए / एमएमएस, एमसीए
९. शेती, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शिष्यवृत्ती शुल्क हे खाजगी अनिवासी / कायम स्वरूपी अनुदानित संस्थेमध्ये शासकीय कोटातून प्रवेश मिळालेल्या अर्जदारांना लागू असेल.
- कृषी महाविद्यालये (पदविका)
- दुग्धव्यवसाय विभाग (पदविका)
- कृषी आणि संबंधित विषयांसाठी महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर)
- कृषी आणि जैव-तंत्रज्ञान महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर)
- कृषी आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर)
- बी.एड. आणि डी.एड अभ्यासक्रमासाठी: डी.एड., बी.एड अभ्यासक्रमांसाठी १००% लाभ (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क) लागू आहे. डी.एड., बी.एड. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या अनुदानित, विना अनुदानित महाविद्यालयातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुल्क संरचना हि शासकीय दराप्रमाणे लागू राहील.
- केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्जदार CAP राऊंड च्या माध्यमातून येणे आवश्यक आहे.
- जर अर्जदार विशिष्ट वर्षामध्ये अयशस्वी झाला तर त्याला त्या शैक्षणिक वर्षातील शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा लाभ मिळेल, परंतु पुढील उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत त्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदाराने (त्याने / तिने) व्यावसायिक ते बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही परंतु बिगर व्यावसायिक ते व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल.
- जर एखाद्या अर्जदाराला २०१५-१६ च्या पासून पुढे खाजगी विना अनुदानित / कायम विना अनुदानित संस्थामध्ये प्रवेश दिलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विशिष्ट शैक्षणिक अभ्यासक्रमात दोन किंवा अधिक वेळा परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास तो / ती फ्रीशिप साठी पात्र ठरणार नाही.
- कोणताही एक अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत अर्जदारास शिष्यवृत्ती / फ्रीशिप चा लाभ मिळेल. उदा. – ११ वी, १२ वी, कला – बी.ए., एम.ए., एम.फिल., पी.एच.डी. इत्यादी. जर अर्जदाराने बी.ए. आणि बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एम.ए. साठी प्रवेश घेतला, तर एम.ए. अभ्यासक्रमासाठी त्याला / तिला शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. परंतु बी.एड.नंतर एम.बी.ए. मध्ये प्रवेश घेतल्यानंतर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल कारण तो व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.
- विशेष व्यावसायिक / बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी, त्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती / फ्रीशिप चा लाभ घेतला असल्यास आणि दरम्यान सध्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छित अर्जदारास पुढील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
नूतनीकरण धोरण
- अर्जदाराने मागील वर्षाची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदार एका वेळेस एकच शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या फ्रीशिप साठी अर्ज करू शकतो आणि सदर फ्रीशिप तिला / त्याला विशिष्ट वेळेत शैक्षणिक कोर्स पूर्ण केल्यानंतरच लागू होईल.
- अर्जदाराने निर्दिष्ट केलेल्या विशिष्ट शैक्षणिक वर्षातील प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे [एका विशिष्ट वर्षातील तो / ती अनुत्तीर्ण झाल्यास त्या वर्षी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यांचा लाभ दिला जाणार नाही].
- अर्जदार 2 पेक्षा जास्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती घेऊ शकत नाही.
- इतर कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे अथवा कोणत्याही अपवादात्मक घटनेमुळे अर्जदार वार्षिक परीक्षेत बसू न शकल्यास, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रमाणित असणे आवश्यक आहे कि, संबंधित विद्यार्थ्याने वार्षिक परीक्षा दिली असती तर तो / ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला असता. अर्जदाराने महाविद्यालयाकडे सादर केलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक पुरावे याबाबत संस्थेचे प्रमुख आश्वस्त झाले तरच त्याबाबत मान्यता मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- उत्पन्न प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका किंवा गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- अंतर प्रमाणपत्र – शिक्षणामध्ये खंड असल्यास हे प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
- एकूण लाभार्थी मुलांच्या संख्येबाबत आई-वडिलांचे / पालकांचे घोषणापत्र
- वडिलांचे / पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- CAP वाटप पत्र (फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी)
- जात पडताळणी प्रमाणपत्र (दि. ३१ जुलै २००८ च्या शासन निर्णयानुसार फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी) निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सूट लागू होईल.
- शाळा / महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र
- शिधापत्रिका – कुटुंबातील मुलांची एकूण संख्या ओळखण्यासाठी
विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान
विभागाचे नाव
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
आढावा
- शिक्षणामध्ये रुची निर्माण करणे.
- शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
- उच्च शिक्षणाद्वारे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे.
- पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
- संबंधित विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क जसे की शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर अनुज्ञेय शुल्कांचा लाभ दिला जातो.
फायदे
- दि. १२/०३/२००७ च्या शासन निर्णयानुसार संबंधित अर्जदारास सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क, जसे की शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर लागू शुल्क यांचा लाभ प्रदान करण्यात येईल. सन २००६-०७ पासून शासकीय, शासन मान्यताप्राप्त खाजगी, विना-अनुदानित आणि कायमस्वरूपी विना-अनुदानित महाविद्यालयातून CAP फेरीच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अर्जदारांनी शिक्षण शुल्क समितीद्वारे मंजूर केलेल्या शिक्षण आणि परीक्षा शुल्काचा १००% लाभ प्रदान करण्यात येईल.
- ज्या अर्जदारांनी Deemed विद्यापीठातून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल, त्यांना हि शिष्यवृत्ती / freeship लागू होणार नाही.
- अर्जदाराने महाविद्यालयात / संस्थेत प्रवेश घेतलेल्या तारखेनुसार अर्जाची प्रारंभ तारीख निश्चित केली जाईल आणि परीक्षेची शेवटची तारीख हि अर्जाची अंतिम तारीख म्हणून निश्चित केली जाईल. (१० महिन्यांसाठी – प्रवेशाच्या ताराखेमध्ये शैक्षणिक वर्षागणिक बदल होईल)
पात्रता
- अर्जदाराने मॅट्रिकोत्तर शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
- पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- अर्जदार विमाप्र प्रवर्गातील असावा.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
- शासनाद्वारे मंजूर केलेल्या मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
- अर्जदाराने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ शासकीय अनुदानित / खाजगी विना अनुदानित / कायमस्वरूपी खाजगी विनाअनुदानित संस्थेत / महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.
- आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम (वैद्यकीय, दंतवैद्यकीय, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, व्यावसायिकोपचार, नर्सिंग):
- खाजगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये प्रवेश परीक्षा व्यवस्थापन असोसिएशन आणि सरकारी प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश घेतलेले विद्यार्थी फ्रीशिप साठी पात्र असतील.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
विना अनुदानित महाविद्यालये / तांत्रिक शिक्षण / तंत्रनिकेतन साठीची शासकीय अनुदानित महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या शासकीय विना अनुदानित महाविद्यालयांसाठी फ्रीशिप लागू होईल.
- पदविका – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी
- पदवी – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, एचएमसीटी
- पदव्युत्तर – एमबीए / एमएमएस, एमसीए
शेती, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शिष्यवृत्ती शुल्क हे खाजगी अनिवासी / कायम स्वरूपी अनुदानित संस्थेमध्ये शासकीय कोटातून प्रवेश मिळालेल्या अर्जदारांना लागू असेल.
- कृषी महाविद्यालये (पदविका)
- दुग्धव्यवसाय विभाग (पदविका)
- कृषी आणि संबंधित विषयांसाठी महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर)
- कृषी आणि जैव-तंत्रज्ञान महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर)
- कृषी आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये (पदवी आणि पदव्युत्तर)
- बी.एड. आणि डी.एड अभ्यासक्रमासाठी: डी.एड., बी.एड अभ्यासक्रमांसाठी १००% लाभ (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क) लागू आहे. डी.एड., बी.एड. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या अनुदानित, विना अनुदानित महाविद्यालयातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुल्क संरचना हि शासकीय दराप्रमाणे लागू राहील.
- केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्जदार CAP राऊंड च्या माध्यमातून येणे आवश्यक आहे.
- जर अर्जदार विशिष्ट वर्षामध्ये अयशस्वी झाला तर त्याला त्या शैक्षणिक वर्षातील शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यांचा लाभ मिळेल, परंतु पुढील उच्च श्रेणीत बढती मिळेपर्यंत त्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदाराने (त्याने / तिने) व्यावसायिक ते बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही परंतु बिगर व्यावसायिक ते व्यावसायिक अभ्यासक्रम बदलल्यास अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल.
- जर एखाद्या अर्जदाराला २०१५-१६ च्या पासून पुढे प्रवेश दिलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विशिष्ट शैक्षणिक अभ्यासक्रमात दोन किंवा अधिक वेळा परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास तो / ती फ्रीशिप साठी पात्र ठरणार नाही.
- कोणताही एक अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत अर्जदारास शिष्यवृत्ती / फ्रीशिप चा लाभ मिळेल. उदा. – ११ वी, १२ वी, कला – बी.ए., एम.ए., एम.फिल., पी.एच.डी. इत्यादी. जर अर्जदाराने बी.ए. आणि बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एम.ए. साठी प्रवेश घेतला, तर एम.ए. अभ्यासक्रमासाठी त्याला / तिला शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. परंतु बी.एड.नंतर एम.बी.ए. मध्ये प्रवेश घेतल्यानंतर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल कारण तो व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे.
नूतनीकरण धोरण
- अर्जदाराने मागील वर्षाची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदार एका वेळेस एकच शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या फ्रीशिप साठी अर्ज करू शकतो आणि सदर फ्रीशिप तिला / त्याला विशिष्ट वेळेत शैक्षणिक कोर्स पूर्ण केल्यानंतरच लागू होईल.
- अर्जदाराने निर्दिष्ट केलेल्या विशिष्ट शैक्षणिक वर्षातील प्रत्येक वर्षी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे [एका विशिष्ट वर्षातील तो / ती अनुत्तीर्ण झाल्यास त्या वर्षी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क यांचा लाभ दिला जाणार नाही]. कोणत्याही शैक्षणिक अभ्यासक्रमात जास्तीत जास्त 2 अपयश अनुमती आहे.
- अर्जदार २ पेक्षा जास्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती घेऊ शकत नाही.
- इतर कोणत्याही वैद्यकीय स्थितीमुळे अथवा कोणत्याही अपवादात्मक घटनेमुळे अर्जदार वार्षिक परीक्षेत बसू न शकल्यास, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रमाणित असणे आवश्यक आहे कि, संबंधित विद्यार्थ्याने वार्षिक परीक्षा दिली असती तर तो / ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला असता. अर्जदाराने महाविद्यालयाकडे सादर केलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक पुरावे याबाबत संस्थेचे प्रमुख आश्वस्त झाले तरच त्याबाबत मान्यता मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- उत्पन्न प्रमाणपत्र – सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले असावे.
- १० वी किंवा १२ वी परीक्षेची गुणपत्रिका किंवा गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- अंतर प्रमाणपत्र – शिक्षणामध्ये खंड असल्यास हे प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
- एकूण लाभार्थी मुलांच्या संख्येबाबत आई-वडिलांचे / पालकांचे घोषणापत्र
- वडिलांचे / पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- CAP वाटप पत्र (फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी)
- जात पडताळणी प्रमाणपत्र (दि. ३१ जुलै २००८ च्या शासन निर्णयानुसार फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी) निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सूट लागू होईल.
- शाळा / महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र
- शिधापत्रिका – कुटुंबातील मुलांची एकूण संख्या ओळखण्यासाठी
विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना
विभागाचे नाव
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
आढावा
शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थामधून शिल्प् कारगिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेल्या विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांकरिता व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना .सदर योजनेचा निकष पुर्ण करीत असलेल्या विदयार्थ्यांनाच या शिष्यवृत्ती चा लाभ घेता येईल.
फायदे
एस.एस.सी.उत्तीर्ण / एस.एस.सी.अनउत्तीर्ण आणि कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापर्यंत असेल तर प्रशिक्षण शुल्क् च्या ८० % ( खाजगी संस्था कोर्स फी – शासकीय संस्था कोर्स फी).
पात्रता
- कौशल्य विकास संस्था किंवा खाजगी ITI संस्थेत पीपीपी योजनेद्वारे आणि केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा
- मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी शिष्यवृत्ती नाही.
- विदयार्थी विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- विदयार्थ्यांच्या कुटुंबाचे मागिल वर्षातील एकत्रित वार्षिक उत्पन्न् रु.8.00 लाखाच्या मर्यादेत असावे. नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- अनाथ उमेदवारास शिफारस पत्र आवश्यक आहे
- उमेदवाराने यापुर्वी शासकीय किंवा खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्थेकडुन कोणताही लाभ घेतलेला नसावा.
- राज्य /केंद्र शासनाच्या विभागाने अथवा त्यांच्या अधिपत्याखालील स्थानिक प्राधिकरण,कंपन्या अथवा महामंडळे यांनी पुरस्कृत केलेल्या कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमाचा यापुर्वी लाभ घेतलेला नसावा.
- महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
- DGT नवी दिल्ली अथवा MSCVT यांनी मान्यता दिलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकडयांच्या प्रवेशित जागांवर प्रवेश घेणे बंधनकारक राहील.
- लाभ फक्त २ मुलांना लागू आहेत.
- उपस्थितीचे निकष अनिवार्य आहेत.
- अर्जदार विदयार्थ्यांस प्रत्येक सत्र परिक्षा अथवा वर्षाची परिक्षा देणे आवश्यक राहील.केवळ विशिष्ट परिस्थितीत विशेषत: आजारपणाच्या कारणास्त्व परिक्षा देणे शक्य झाले नसल्यास तसे विदयार्थी व संबधित संस्थेने शिफारस केल्यानंतर प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी प्रमाणीत करणे आवश्यक राहील.
- संबधित विदयार्थी स्व्त:च्या चुकीच्या वर्तनामुळे समाधानकारक शैक्षणिक प्रगती करत नसल्याबाबत किंवा संबंधित प्राधिका-याच्या पुर्वपरवानगी शिवाय अनियमित असणे अथवा गैरहजर रहाणे इत्यादी स्वरुपाचे गैरवर्तन करत असल्याबाबत शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने निदर्शनास आणले तर अशा विदयार्थ्याकरिता संस्थेला शुल्क् प्रतिपुर्ती अनुज्ञेय राहणार नाही.
नूतनीकरण धोरण
- विदयार्थ्यी पुढील वर्षी हजेरीपटावर असावा.
- डीजीटी, नवी दिल्ली यांच्या निकषानुसार हजेरी आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मार्कशीट दहावी / बारावी
- नूतनीकरणासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिकरणाद्वारे मिळकत प्रमाणपत्र
- नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
विभागाचे नाव
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
आढावा
- ही योजना एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बी.एस.सी नर्सिंग, बीओटीएच,बीयुएमएस,बीपी आणि ओ, बीएएसएलपी या सरकारी अनुदानित / महामंडळ / खाजगी विना-अनुदानित महाविद्यालयांमध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम फी परतफेड प्रदान करते.
- लाभार्थी गट – EBC
- पात्र अभ्यासक्रम:. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बी.एस.सी नर्सिंग, बीमएस, बीपी आणि ओ, बीएएसएलपी या सरकारी अनुदानित / महामंडळ / खाजगी विना-अनुदानित महाविद्यालय
फायदे
५०% शुल्क परतावा (शिकवणी फी + विकास शुल्क) प्रदान करण्यात येईल.
पात्रता
एमबीबीएस / बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांसाठी अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न रु. 8,००,००० पेक्षा कमी.
सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे अशा उमेदवार पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- अधिवास प्रमाणपत्र
- नवीन अर्जदारांना बारावीची आणि दहावीची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे.
- पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
- विद्यार्थी पॅन कार्ड (पर्यायी)
- वडिलांचे पॅन कार्ड
- आईचे पॅन कार्ड (पर्यायी)
- वडिलांचे आधार कार्ड
- आईचे आधार कार्ड (पर्यायी)
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
विभागाचे नाव
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
आढावा
ही योजना ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु ८००००० पेक्षा कमी आहे आणि ज्या पालकांचे पालक मार्जिनल लँड होल्डर आणि नोंदणीकृत कामगार आहेत.
फायदे
- रु ८००००० पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह देखभाल भत्ता: मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसाठी दर वर्षी रु.३००० रुपये आणि इतर ठिकाणांसाठी दरवर्षी रु .२००० (शैक्षणिक वर्षातील दहा महिन्यांसाठी)
- ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूदारक शेतकरी / नोंदणीकृत कामगार आहेत त्यांच्या वसतिगृहाची देखभाल भत्ताः मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसाठी दर वर्षी रू. ३०,००० आणि इतर ठिकाणांसाठी रू. २०,००० (शैक्षणिक वर्षातील दहा महिन्यांसाठी)
पात्रता
- ज्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटी, बीएससी नर्सिंग, बीएएमएस, बीपी आणि ओ, बीएएसपी मध्ये शासकीय अनुदानित / कॉर्पोरेशन / खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला असेल.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न . रु. ८,००,००० च्या तुलनेत कमी असावे.
- ज्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी / नोंदणीकृत शेतकरी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी.
- १,००,००० पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह देखभाल भत्ता: मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसाठी दर वर्षी रु.३००० रुपये आणि इतर ठिकाणांसाठी दरवर्षी रु .२००० (शैक्षणिक वर्षातील दहा महिन्यांसाठी)
- ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूदारक शेतकरी / नोंदणीकृत कामगार आहेत त्यांच्या वसतिगृहाची देखभाल भत्ताः मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसाठी दर वर्षी रू. ३०,००० आणि इतर ठिकाणांसाठी रू. २०,००० (शैक्षणिक वर्षातील दहा महिन्यांसाठी)
- व्यवस्थापन कोटा / संस्था पातळीद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू नाही.
- ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेश घेतला आहे त्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर किंवा महाराष्ट्रातील इतर ठिकाणी प्रवेश घेतला आहे.
- उमेदवार सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतलेल्यांसाठी पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- नवीन अर्जदारांना बारावीची आणि दहावीची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे. (नूतनीकरणासाठी लागू नाही)
- पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र / अर्ज क्रमांक 16
- उत्पन्न प्रमाणपत्र / शपथपत्रात स्पष्टपणे नमूद केलेले असावे की उमेदवार अल्पसंख्यांक समुदायाशी संबंधित आहे
- अधिवास प्रमाणपत्र
- विद्यार्थी पॅन कार्ड (पर्यायी)
- वडिलांचे पॅन कार्ड
- आईचे पॅन कार्ड (पर्यायी)
- वडिलांचे आधार कार्ड
- आईचे आधार कार्ड (पर्यायी)
जर उमेदवार महाराष्ट्राबाहेर शिकत असेल तर
- संबंधित संस्था / प्राधिकरण मान्यताप्राप्त असल्याचे पत्र
- एफआर प्रत
- चालू शैक्षणिक वर्षासाठी बोनफाइड प्रमाणपत्र
वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील एसईबीसी आणि ईडब्ल्युएस आरक्षणामुळे बाधित खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती
विभागाचे नाव
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
आढावा
- सदर योजनेद्वारे खाजगी विना अनुदानित महाविद्यालयात प्रवेशीत वैद्यकीय/दंत पदवी/पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात येणार आहे.
- लाभार्थी गट – खुला प्रवर्ग
- पात्र अभ्यासक्रम: खाजगी विना अनुदानित महाविद्यालयातील MBBS, BDS, Post Graduate Medical (MD/MS) सदर योजनेद्वारे खाजगी विना अनुदानित महाविद्यालयात प्रवेशीत वैद्यकीय/दंत पदवी/पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात येणार आहे.
- लाभार्थी गट – खुला प्रवर्ग
- पात्र अभ्यासक्रम: खाजगी विना अनुदानित महाविद्यालयातील MBBS, BDS, Post Graduate Medical (MD/MS)
फायदे
लाभाची रक्कम = खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचे मंजूर शैक्षणिक शुल्क (FRA Approved Fee) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मंजूर शैक्षणिक शुल्क.
पात्रता
- उमेदवार खुल्या प्रवर्गातील असावा (एकुण 112 विद्यार्थी सदर योजनेतून आर्थीक लाभ घेऊ शकतील)
- उमेदवाराचा प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून (CAP) होणे आवश्यक आहे.
- व्यवस्थापन कोटा / संस्था पातळीद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क् प्रतिपुर्ती लागू नाही.
- सदर योजनेकरीता उत्पनाची मर्यादा असणार नाही.
- उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- खाजगी अभिमत विद्यापीठामध्ये प्रवेशित विद्यार्थांना सदर योजना लागू असणार नाही.
- उमेदवाराच्या शैक्षणिक कालावधीमध्ये दोन वर्ष किंवा दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी खंड नसावा.
- शैक्षणिक वर्षातील अनुत्तीर्ण, गैरवर्तन, उपस्थिती निकष पुर्ण केलेले नसल्यास सदर योजनेकरीता सदर उमेदवार पात्र असणार नाही.
नूतनीकरण धोरण
- विद्यार्थ्याला मागील वर्षाची परीक्षा पास करावी लागेल. एटीकेटीला परवानगी दिली जाईल.
- नूतनीकरणासाठी 50% उपस्थिती अनिवार्य आहे.
आवश्यक कागदपत्रे
- अधिवास प्रमाणपत्र
- नवीन अर्जदारांना बारावीची आणि दहावीची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे.
- मागील वर्षाची गुणपत्रिका
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- विद्यार्थी पॅन कार्ड (पर्यायी)
- वडिलांचे पॅन कार्ड
- आईचे पॅन कार्ड (पर्यायी)
अल्पसंख्याक विकास विभाग
राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती (भाग – २)
विभागाचे नाव
अल्पसंख्याक विकास विभाग
फायदे
एकूण वार्षिक अभ्यासक्रम शुल्क किंवा 5000 रुपये यापैकी कमी असेलली रक्कम शिष्यवृत्ती रक्कम असेल.
पात्रता
- पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात (कला / वाणिज्य / विज्ञान / कायदा / शिक्षण)
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- वार्षिक उत्पन्न रु.8 लाख पर्यंत असावे
- फक्त 2000 अर्जदारांना कोटा प्रदान करण्यात येईल.(नवीन विद्यार्थी)
- महाराष्ट्र बाहेर शिकत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.
आवश्यक कागदपत्रे
- मागील वर्षाची गुणपत्रिका
- अधिवास प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- इयत्ता १२चे मार्कशीट.
- चालू वर्ष शुल्क (फी) पावती.
- अल्पसंख्याक प्रमाणपत्र
- कॉलेजमधून प्राप्त झालेले प्रामाणिक (बोनाफाईड) प्रमाणपत्र
उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना
विभागाचे नाव
अल्पसंख्याक विकास विभाग
आढावा
या योजनेचे उद्दीष्ट अल्पसंख्यांक समुदायातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू समुदाय) गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रममध्ये शिक्षण घेण्यसाठी आर्थिक सहाय.
पात्रता
- अर्जदाराने भारताचे राष्ट्रीयत्व असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने महाराष्ट्र राज्याचा अधिवास असणे आवश्यक आहे.
- उमेदवार महाराष्ट्र राज्य शाळेतून एसएससी पास असावा.
- अर्जदार हा “संस्थानचा बोनफैड विद्यार्थी” असावा आणि व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमासाठी (डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर पदवी पदवी) प्रवेश दिला पाहिजे.
- उमेदवारांना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया / संस्था स्तराद्वारे प्रवेश दिला जावा.
- अर्जदाराने कोणत्याही इतर शिष्यवृत्तीचा / वारसा लाभ घेऊ नये.
- कौटुंबिक / पालकांच्या एकूण वार्षिक उत्पन्नाची किंमत आठ लाखांपेक्षा जास्त नसावी.
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती
विभागाचे नाव
अल्पसंख्याक विकास विभाग
आढावा
ही योजना मुस्लिम, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी, ज्यू या धर्मीयांसाठी आहे
फायदे
एकूण वार्षिक अभ्यासक्रम शुल्क किंवा रु. २५,००० यांपैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम शिष्यवृत्ती म्हणून प्रदान करण्यात येईल
पात्रता
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याशी संलग्न अभ्यासक्रम आणि एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच,बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी आणि ओ, बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग, बीपीएमटी,ऑप्थाल्मिक सहाय्यक, ऑप्टोमेटरी, पीबी बीएससी नर्सिंग या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी
- कौटुंबिक उत्पन्न रु. 8,००,००० किंवा त्यापेक्षा कमी
- अभ्यासक्रम प्रवेश CET / स्पर्धात्मक परीक्षा / बारावी मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे.
- ३०% शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव आहे. ७०% विद्यार्थ्यांची एकत्रित (सयुंक्त) यादी तयार केल्यानंतर ३०% मुली शिष्यवृत्तीसाठी निवडल्या जातात ७०% यादीत समावेश नसतो
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणे आवश्यक आहे
- विशिष्ट अल्पसंख्यक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी राखीव शिष्यवृत्ती रक्कम वितरणाचे लक्ष्य साध्य झाले नाही तर अन्य अल्पसंख्यक समुदायातील विद्यार्थ्यांना त्या शिष्यवृत्तीत समाविष्ट करण्यात येईल.
- ही शिष्यवृत्ती महाराष्ट्राबाहेर जाऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू असेल, परंतु तो / ती १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणे आवश्यक आहे.
जर उमेदवार महाराष्ट्राबाहेर शिकत असेल तर खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे
- १. संबंधित संस्था / प्राधिकरण मान्यताप्राप्त असल्याचे पत्र
- २. एफआर प्रत
- ३. चालू शैक्षणिक वर्षासाठी बोनफाइड प्रमाणपत्र
आवश्यक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- नवीन अर्जदारांना बारावीची आणि दहावीची गुणपत्रिका सादर करणे आवश्यक आहे. (नूतनीकरणासाठी लागू नाही)
- पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र / अर्ज क्रमांक 16
- उत्पन्न प्रमाणपत्र / शपथपत्रात स्पष्टपणे नमूद केलेले असावे की उमेदवार अल्पसंख्यांक समुदायाशी संबंधित आहे.
- अधिवास प्रमाणपत्र
- विद्यार्थी पॅन कार्ड (पर्यायी)
- वडिलांचे पॅन कार्ड
- आईचे पॅन कार्ड (पर्यायी)
- वडिलांचे आधार कार्ड
- आईचे आधार कार्ड (पर्यायी)
जर उमेदवार महाराष्ट्राबाहेर शिकत असेल तर
- संबंधित संस्था / प्राधिकरण मान्यताप्राप्त असल्याचे पत्र
- एफआरए प्रत
- चालू शैक्षणिक वर्षासाठी बोनफाइड प्रमाणपत्र
Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना(ईबीसी)
विभागाचे नाव
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
आढावा
या योजनेचा उद्दिष्ठ सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस (CAP) च्या माध्यमातून डिप्लोमा / पदवी / पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या आर्थिक मागासवर्गीयांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.
फायदे
शिक्षण शुल्क ५०% व परीक्षा शुल्क ५०%
पात्रता
- अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
- शासन निर्णयामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदार हा व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमासाठी (डिप्लोमा / ग्रॅज्युएशन / पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री) प्रवेश घेतलेला संस्थेचा (प्रमाणित) बोनफाइड विद्यार्थी असावा.
- अमान्यताप्राप्त विद्यापीठ आणि खाजगी विद्यापीठ प्रवेशपात्र नाहीत.
- अर्जदार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया माध्यमातून दाखल होणे गरजेचे आहे.
- अर्जदाराने कोणत्याही इतर शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ नये.
- चालू शैक्षणिक वर्षासाठी, कुटुंबाच्या फक्त २ मुलांना या योजनेच्या लाभासाठी परवानगी आहे.
- कौटुंबिक / पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे.
- मागील सत्रामध्ये किमान ५०% उपस्थिती आवश्यक आहे. (कॉलेजमध्ये नव्याने भरती झाल्यास अपवाद)
- अभ्यासक्रम कालावधी दरम्यान, अर्जदारचे दोन वर्षांपेक्षा जास्त अंतर नसावा.
- सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे अशा उमेदवार पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- १० वी (एस.एस.सी.) आणि त्यानंतरच्या शैक्षणिक गुणपत्रिका
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- चालू वर्षात , एका कुटुंबांतील 2 पेक्षा जास्त लाभार्थी नसल्याचे हमीपत्र
- CAP संबंधित दस्तऐवज
- बायोमेट्रिक उपस्थितीचा पुरावा ( यूआयडीएआय च्या माध्यमातून )
डॉ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना
विभागाचे नाव
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
आढावा
सरकारद्वारे निर्धारित व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश करणार्या सरकारी, सरकारी अनुदानीत आणि असंलग्न महाविद्यालय / पॉलिटेक्निक चे विद्यार्थी ज्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर असून जे सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केले आहेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हि एक योजना आहे.
फायदे
नोंदणीकृत कामगार / अल्पभूधारक (मूळ जमीन धारक) यांच्या मुलासाठी
- १० महिन्यांसाठी एमएमआरडीए / पीएमआरडीए / औरंगाबाद शहर / नागपूर शहरातील संस्थांसाठी रु .३०,०००/-
- १० महिन्यांसाठी इतर क्षेत्रातील संस्थांसाठी रु. २०,०००/-
आठ लाखांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्नासाठी
- १० महिन्यासाठी एमएमआरडीए / पीएमआरडीए / औरंगाबाद शहर / नागपूर शहरातील संस्थांसाठी-रू .१०,०००/-
- १० महिन्यांसाठी इतर क्षेत्रातील संस्थांसाठी रू .८००० /-
पात्रता
- अर्जदाराने भारताचे राष्ट्रीयत्व असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने महाराष्ट्र राज्याचा अधिवास असणे आवश्यक आहे.
- शासन निर्णयामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदार हा व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमासाठी (डिप्लोमा / ग्रॅज्युएशन / पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री) प्रवेश घेतलेला “”संस्थेचा (प्रमाणित) बोनफाइड विद्यार्थी”” असावा.
- अमान्यताप्राप्त विद्यापीठ आणि खाजगी विद्यापीठ प्रवेशपात्र नाहीत.
- अर्जदाराने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया माध्यमातून दाखल होणे गरजेचे आहे.
- अर्जदाराने कोणत्याही इतर शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ नये.
- चालू शैक्षणिक वर्षासाठी, कुटुंबाच्या फक्त २ मुलांना या योजनेच्या लाभासाठी परवानगी आहे.
- कौटुंबिक / पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे.
- मागील सत्रामध्ये किमान ५०% उपस्थिती आवश्यक आहे. (कॉलेजमध्ये नव्याने भरती झाल्यास अपवाद)
- अभ्यासक्रम कालावधी दरम्यान, अर्जदारचे दोन वर्षांपेक्षा जास्त अंतर नसावा.
- सामान्य श्रेणी आणि एसईबीसी श्रेणी अंतर्गत प्रवेश घेतला आहे अशा उमेदवार पात्र आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- १० वी (एस.एस.सी.) आणि त्यानंतरच्या शैक्षणिक गुणपत्रिका
- नोंदणीकृत कामगार प्रमाणपत्र/ अल्पभूधारक (मार्जिनल जमीन धारक) प्रमाणपत्र (अल्पभूधारक किंवा नोंदणीकृत कामगार यांचे मूल नसल्यास कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र)
- चालू वर्षात , एका कुटुंबांतील 2 पेक्षा जास्त लाभार्थी नसल्याचे हमीपत्र
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
- CAP संबंधित दस्तऐवज.
- वसतिगृह दस्तऐवज (खाजगी वसतिगृह किंवा पेयिंग गेस्ट बाबतीत, मालकाशी करार करणे आवश्यक असेल.
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग
सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना
विभागाचे नाव
कौशल्य विकास रोजगार विभाग
आढावा
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि खुल्या प्रवर्गातील (आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग) विद्यार्थ्यांसाठी आणि केंद्रीयकृत प्रवेश प्रक्रियेद्वारे सरकारी आयटीआय आणि खासगी आयटीआय मधील पीपीपी योजनेंतर्गत जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक प्रशिक्षण फी प्रतिपूर्ती योजना. सदर योजनेचा निकष पूर्ण करीत असलेल्या विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्ती चा लाभ घेता येईल.
फायदे
- कौटुंबिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा जास्त आणि ०८ लाख किंवा ०८ लाखांपेक्षा कमी असल्यास – ८० % ( खाजगी संस्था कोर्स फी – शासकीय संस्था कोर्स फी).
- कौटुंबिक उत्पन्न २,५०,००० किंवा त्याहून कमी असल्यास – १००% (खाजगी संस्था कोर्स फी – शासकीय संस्था कोर्स फी)
पात्रता
- कौशल्य विकास संस्था किंवा खाजगी ITI संस्थेत पीपीपी योजनेद्वारे आणि केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा
- मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी शिष्यवृत्ती नाही.
- विद्यार्थी मुक्त (ओपन) श्रेणी आणि आर्थिक दुर्बल विभाग (ईडब्ल्यूएस) चा असावा.
- एकूण कौटुंबिक उत्पन्नाचा विचार केला जाईल (वडील + माता एकूण उत्पन्न)
- अनाथ उमेदवारास शिफारस पत्र आवश्यक आहे.
- उमेदवाराने यापूर्वी शासकीय किंवा खासगी आयटीआय कडून कोणताही लाभ घेतलेला नसावा.
- राज्य / केंद्र सरकार / विभाग / स्थानिक संस्था / कंपनी किंवा कॉर्पोरेशन प्रायोजित प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवारांनी कोणताही लाभ घेतलेला नसावा.
- महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक.
- डीजीटी, नवी दिल्ली किंवा एमएससीव्हीटी मंजूर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश
- लाभ फक्त २ मुलांना लागू आहेत.
- उपस्थितीचे निकष अनिवार्य आहेत.
- उमेदवाराला प्रत्येक सहामाई / वार्षिक परीक्षेस हजेरी लावणे आवश्यक आहे. कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन असल्यास संस्थेच्या संस्थेच्या प्रादेशिक सहसंचालकांनी केलेली प्रमाणित शिफारस आवश्यक.
- गैरप्रकारांमुळे समाधानकारक शैक्षणिक प्रगती- शैक्षणिक वर्षातील अपयश, उपस्थितीचे निकष न पाळल्यास आढळल्यास उमेदवार शिष्यवृत्तीस पात्र ठरणार नाही.
आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मार्कशीट दहावी / बारावी
- नूतनीकरणासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका
- महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिकरणाद्वारे मिळकत प्रमाणपत्र
महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची पद्धत
Mahadbt Portal Online Registration Process
पहिला टप्पा
- अर्जदार विद्यार्थ्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकुत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (अर्जदाराचे नाव,युजर नेम,पासवर्ड,पुष्टी करा पासवर्ड,ईमेल आयडी,भ्रमणध्वनी क्रमांक) भरून Register बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसरा टप्पा
- तुमची रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला अर्जदार लॉगिन बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचं Username आणि Password टाकून लॉगिन करायचं आहे.
तिसरा टप्पा
- आता तुमच्या समोर सर्व शिष्यवृत्तींची यादी दिसेल तुमच्या योग्य शिष्यवृत्तीच्या समोर Apply वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक शिष्यवृत्तीचा अर्ज उघडेल त्यात विचारलेली सर्व माहिती भरावयाची आहे आणि योग्य ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- अशा प्रकारे तुमची शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
No comments: