गुढीपाडवा (Gudi Padwa) आपल्या संस्कृतीतील महत्वाचा आणि मराठी वर्षातील पहिला सण म्हणून साजरा केला जातो.हा फक्त सुरवातीचा सणच नाही तर, या दिवशी वर्षाची सुरुवात वसंत ऋतूचे आगमन आणि त्याच बरोबर या दिवशी सूर्याचा प्रभाव हा मेष राशीत असतो. आणि तसेच चित्रा नक्षत्रात चंद्र स्थिर असतो, आणि म्हणूनच,मराठी वर्षाच्या पहिल्या महिन्याच नाव हे “चैत्र” हे आहे.तसेच चैत्र शुद्ध प्रतिपदा होय.
Gudi Padwa In Marathi गुढीपाडवा माहिती मराठी
नुकतीच थंडी संपून ,उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते.होळीच्या सणाला सर्व अमंगल, अशुभ ,पापी गोष्टींचे दहन करून ,तसेच या वर्षी तर कोरोनासारख्या भिषण रोगाचे देखील होळीच्या अग्नीत दहन केलं. आणि निर्मळ पाण्यात धुहून ,रंगपंचमी तिच्या अनेक रंगांनी अवघ्या सृष्टीला रंगा उन ,असे जणू सगळ्यांना सांगत असते.रंगात रंगून घ्या आनंदात भिजून पण घ्या,कारण आता आपले नविन वर्ष येत आहे. जनु नवीन वर्षाच्या स्वागताला, सृष्टीच साक्ष देते आणि सप्त रंग उधळत रंगपंचमी, आपल्या गुढीपाडव्याच्या आगमनाचा निरोप घेऊन आलेली असते……. आणि सांगते ” जय्यत तयारी करा,मराठी अस्मितेचा नवा सूर्य उगवतीच्या दिशेनं वाटचाल करतो आहे ,त्याच्या पाऊल खुणा उठवण्यासाठी त्यानेच सुवर्ण किरणच्या पायघड्या अंथरल्या आहेत”. निसर्ग बोलत असतो,आता “जुने टाकून ,नवे हिरवे शालू नेसून घ्या” पिवळी पाने गळत असतात,हिरवळ फुटत असते.अंबा मोहरत असतो.आणि म्हणूनच की काय वृक्ष वेली,”नागराज ने डोयी जड झालेली कातन टाकून ,पुन्हा स्वतःला जसे पुनर्जनमच भेटतो तसे पुनर्जीवित होतात,”
संपूर्ण निसर्ग स्वताला आपला भाग्योदय होयची वेळ झाली आहे. नवीन वर्ष येत आहे.याचे सर्व बदल स्वताच्या कृतीत सांगतो…… खरच इतिहास साक्षी आहे.की “निसर्गासारखा गुरू असावा, माती सारखी आई,सृष्टी सारखं सौंदर्य,आणि हवेसारखे बालपण” मग काय आयुष्यात कशाला कोणत्या महूर्थ मापाची गरज….अशी एकुणात मी येतोय तुमच्या अतूर्तेचा सुटकरा,आनंदाचे उधाण ,आणि नव्या सुखाची,नव्या अपेक्षांची सुरवात म्हणजेच…..,गुढीपाडवा…..
No comments: