Full Width CSS

कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय.....

 


कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय.....


*नखे पांढरट होणे. किंवा त्यावर तसे ठिपके दिसणे.


*हाताला मुंग्या येणे.


*हाडातील ठिसूळपणा.


*सांधेदुखी हातांची हाडे, पाय, मांडी दुखणे.


*थकवा येणे, कमी झोप.


*स्मृतिभ्रंश.


*कोरडी त्वचा, खाज येणे.


*दात दुरखी, दात किडणे, त्यांची मुळे सैल होणे.


*मासिक पाळीवेळी ओटीपोटात दुखणे,


*निराशा.


*अनामिक भीती.


*हाडांची झीज होणे, गुड़ते दुखणे


कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी घरगुती उपाय...


दूध...

दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते.


दही...

दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दहीमध्ये ४०० मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ उदा. पनीर, चीज सेवन करून कॅल्शियम मिळते.


मसाले-तुळस...

ओव्याची फुले, दालचिनी, पुदिना, लसुण तसेच तुळस यासारखे मसाले न केवळ पदार्थांना विशेष प्रकारचा फ्लेवर आणि टेस्ट देतात, यातून कॅल्शिअम मिळते.


पालेभाज्या...

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, मशरूम सलाड


शेंगभाज्या...

शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम मिळते


संत्री-लिंबू...

संत्री, लिंबू  यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.


सोयाबीन...

सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे.

कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय..... कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय..... Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.