Full Width CSS

मूळव्याध आहार, लक्षणे आणि घरगुती उपाय – Mulvyadh ahar ani Gharguti Upay

 

मूळव्याध आहार, लक्षणे आणि घरगुती उपाय – Mulvyadh ahar ani Gharguti Upay

मूळव्याध आहार आणि आयुर्वेदिक घरगुती उपाय – मुळव्याधा वर आयुर्वेदिक उपचार शोधताय ? म्हणजे तुम्ही नक्कीच भयानक त्रासातून जात असणार. उठता बसता होणार हा त्रास जगणे अगदी अवघड करून टाकतो. एका शब्दात सांगायचं झाला तर मूळव्याध झाला असेल किंवा नसेल झाला तरी तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे बंद करा ज्यापासून हा त्रास होणार नाही किंवा झाला असेल तर कमी होईल. Mulvyadh Meaning in english is Piles (haemorrhoids).

कधीकधी मूळव्याधावर उपचार करण्यासाठी औषधे आणि शस्त्रक्रिया केल्यावर त्रास पूर्णपणे बरा होतो. हल्ली सर्व जण शस्त्रक्रिया करतात ज्यापासून आजार पूर्णपणे संपण्याचे चान्सेस खूप असतात. लेजर शस्त्रक्रिये साठी वेळ सुद्धा खूप कमी लागतो.

मूळव्याध होण्याची काही कारणे म्हणजे तेलकट आणि जास्त मसालेदार तिकट पदार्थ, जास्त वेळ बसून राहणे, दारू सिगारेट किंवा गुटख्याच्या सेवनाने होतो.

मूळव्याध लक्षणे – Mulvyadh Lakshane (Symptoms) Marathi

  • गर्भवती (प्रेग्नन्ट) स्त्रियांना मूळव्याधाची शक्यता जास्त असते.
  • व्यक्तीचे वय वाढत असताना मूळव्याध होण्याची शक्यता वाढते.

मूळव्याधाची लक्षणे हि असलेल्या प्रकारावर अवलंबून असतात. आपल्याकडे बाह्य मूळव्याध असल्यास खालील लक्षणे असू शकतात.

  • गुदद्वारा जवळ खाज सुटणे आणि सूज येणे.
  • आपल्या गुद्द्वार जवळ एक किंवा अधिक कठोर गाठ असल्याचे भासणे.
  • गुदद्वारा जवळ सतत वेदना होणे, विशेषत: उठताना आणि बसताना.

आपण जर गुद्द्वार भोवती खूप ताणले, घासणे किंवा साफ केले तर आपली लक्षणे आणखीनच वाढू शकतात. बर्‍याच लोकांमध्ये बाह्य मूळव्याधाची लक्षणे काही दिवसातच दूर होतात.अंतर्गत मूळव्याध असल्यास, खालील लक्षणे असू शकतात.

  • मलमार्गावर, टॉयलेट पेपरवर किंवा आतड्यांसंबंधी हालचाली झाल्यानंतर शौचालयाच्या भांड्यात लाल रक्तस्राव दिसणे.
  • आपल्या गुदद्वाराच्या ओपनिंगद्वारे पडलेला एक मूळव्याधा, ज्याला प्रॉलेप्स म्हणतात.

अंतर्गत मूळव्याध मध्ये बहुतेक वेळा कमी वेदनादायक असतो. परंतु अस्वस्थता येऊ शकते.

Mulvyadh ahar ani Gharguti Upay
मूळव्याध असताना सूर्यनमस्कार आणि योगासने करण्याचा प्रयत्न करावा

मूळव्याध आहार आणि घरगुती उपाय (Mulvyadh sathi Ayurvedic Gharguti Upay Marathi)

जास्त फायबर युक्त पदार्थ, कमी चरबी असलेले खाल्ल्याने मूळव्याधाची लक्षणे बर्‍याचदा होऊ शकतात. तसेच जास्त पाणी प्या ज्यामुळे मल बाहेर पडण्यास त्रास कमी होतो. गव्हाचा कोंडा, सफरचंद, नाशपाती, बार्ली, मसूर, ब्रोकोली हे पदार्थ नेहमी जेवताना वापरा.

1. मूळव्याधीवर मोडाला खाज असल्यास दोन चमचे दुधात एक चमचा मोहरी वाटून त्याचा लेप त्या जागी दिल्यास बरे वाटते. असे पंधरा दिवस केल्यास मूळव्याधीचा मोड नाहीसा होतो. दोन चमचे दूध + एक चमचा मोहरी मिश्रण वाटून तयार करणे = मूळव्याधीचा मोड नाहीसा होतो.2. मूळव्याधीच्या माणसांनी अर्धी वाटी ताक घेऊन त्यात अर्धा चमचा मिरपूड घालून रोज सकाळी अनेशापोटी घ्यावे. असे पंधरा दिवस करावे.

3. शौचाचा ज्यांना त्रास होत असेल किंवा मलखड्याने रक्तही पडत असेल, तर त्यांनी रात्री जेवल्यानंतर आठ ते दहा भाजलेले शेंगदाणे खावेत. त्यावर थोडेसे पाणी प्यावे. (जेवणानंतरची मुखशुद्धी समजावी.)

4. बद्धकोष्ठता ज्यांना आहे, शौचाच्या तक्रारी असलेल्यांनी एक ग्लास थंड पाणी घेऊन त्यात एक लिंबू पिळावे. चिमटीभर साखर, चिमटीभर मीठ टाकून सकाळी उठल्यावर अनेशापोटी हे सरबत प्यावे.

5. मूळव्याधीचा त्रास जास्त प्रमाणात होत असल्यास एक कांदा रात्री किसून दडपून ठेवावा. सकाळी त्यात दही घालून ही कोशिंबीर खावी. चवीला मीठ टाकले तरी चालेल. हीच कोशिंबीर जर झोप येत नसेल तर रात्री झोपताना खावी. असे चार दिवस करावे.

मूळव्याध आहार, लक्षणे आणि घरगुती उपाय – Mulvyadh ahar ani Gharguti Upay मूळव्याध आहार, लक्षणे आणि घरगुती उपाय – Mulvyadh ahar ani Gharguti Upay Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.