Full Width CSS

ताप आल्यास घरगुती उपाय – Taap Gharguti Upay

 

ताप आल्यास घरगुती उपाय – Taap Gharguti Upay

ताप आल्यावर काय करावे, घरगुती उपाय – दिवसभर आपल्या शरीराचे तापमान नेहमी बदलत असते. ताप का येतो ? ताप म्हणजे एखाद्या आजाराशी झुंज देण्यासाठी शरीर ताप वाढवते. ताप हा जास्त करून विषाणू किंवा जिवाणू संसर्गामुळे होतो. लहान मुलांमध्ये ताप येत असल्यास उशीर ना करता डॉक्टर्स चा सल्ला घ्या. ताप आल्यावर भरपूर पाणी प्या जेणेकरून शरीराला प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.  इबुप्रोफेन (अ‍ॅडविल) आणि एसीटामिनोफेन (टायलेनॉल) या सारखी ताप कमी करणारी औषधे देखील तापाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. Taap Meaning in English is Fever.

ताप असताना काय खाऊ नये 

  • ताप आल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ जसे कि चहा, कॉफी किंवा कोणतेही थंड पेय पिऊ नका.
  • ताप असताना कोणतेही मसालेदार पदार्थ खाऊ नका त्यामुळे तुमचे तुमची पचन संस्था अजून खराब होते.
  • ताप आल्या नंतर फायबर असलेले पदार्थ म्हणजे गव्हा पासून बनलेले पदार्थ किव्हा ब्रेड खाणे टाळा.

ताप किती असावा (Taap kiti Asawa)

Taap Gharguti Upay Marathi

ताप किती असावा हा खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. माणसाचे नॉर्मल शरीराचे तापमान हे 37 डिग्री (37 degrees Celsius) असावे. तुमचे जर शरीराचे तापमान 38 किंवा  39 च्या वॉर जात असेल तर तुम्हाला ताप झालेला आहे. डॉक्टर्स चा सल्ला घेऊन आपली काळजी घ्या. बाजारा मध्ये किमान रुपये 500 च्या आसपास चांगला इलेक्ट्रिक थर्मामिटर मिळतो तो नेहमी आपल्या घरात ठेवा. शरीराचे तापमान नेहमी 36.5 ते 37.5 डिग्री मध्ये असावे.

ताप आल्यास घरगुती उपाय (Taap alyas gharguti Upay Marathi)

1. बारीक ताप येत असल्यास कडूनिंबारिष्ट घ्यावे. पाव किलो कडूनिंबाची साल रात्री भिजत घालावी. सकाळी भिजलेल्या सालीत चार तांबे पाणी घालून ते पाणी उकळवावे. त्यात पाव किलो गूळ, एक चमचा जिरे, एक चमचा काळी मिरी टाकून ते मिश्रण चांगले उकळवून आटवावे. आटवून एक तांब्या करावे. (सावरीची फुले मिळाल्यास चार फुले उकळताना टाकावीत.) हे थंड पाणी बाटलीत भरून ठेवावे. एक महिन्यांनी हे बाटलीतील कडूनिंबारिष्ट दिवसातून दोन वेळा एक चमचा हे कडूनिंबारिष्ट + एक चमचा पाणी एकत्र करून घ्यावे.

2. केव्हा केव्हा ताप येऊन गेल्यावर खूपच अशक्तपणा वाटतो. भूकसुद्धा नीट लागत नाही. अशा वेळी रात्री एक वाटी पाण्यात तीन चमचे जिरे भिजत घालावेत. सकाळी अनेशापोटी हे पाणी गाळून घ्यावे व चिमूटभर साखर टाकून प्यावे.


ताप आल्यास घरगुती उपाय – Taap Gharguti Upay ताप आल्यास घरगुती उपाय – Taap Gharguti Upay Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on March 04, 2023 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.