मूत्रसंस्थेचे आजार.....
लघवी अडकणे, लघवी बंद होणे, वारंवार लघवी होणे, उन्हाळी, लघवीतून पू येणे, लघवीत रक्तयेणे, पोटात दुखणे, चेहरा सुजणे ही मूत्रसंस्थेच्या आजाराची वेगवेगळी लक्षणे आहेत.
लघवी अडकणे आणि बंद होणे या दोन लक्षणांमध्ये महत्त्वाचा फरक आहे.
लघवी बंद होणे (किंवा कमी होणे) म्हणजे मूत्रपिंडाचे काम बंद पडणे किंवा कमी होणे, यामुळे लघवी कमी तयार होते किंवा बंद होते.
लघवी अडकणे...
'लघवी अडकणे' म्हणजे लघवी नेहमीप्रमाणे तयार होते पण मूत्रनलिकेच्या अडथळयांमुळे ती मूत्राशयात अडकून पडते. लघवी अडकली असेल तर बेंबीखालच्या ओटीपोटात तडस लागते. लघवी अडकली आहे असे वाटते. यामुळे ओटीपोटाच्या भागात फुगार वाटतो. लघवी अडकण्यामागचे आजार अनेक प्रकारचे असतात.
लघवी अडकणे...
लघवी अडकणे ही गंभीर तक्रार आहे. बहुतेक वेळा त्यावर उपचारासाठी डॉक्टरकडेच जावे लागते. लघवी अडकण्याच्या कारणाचे निदानही आवश्यक असते. रोगनिदानासाठी काही बाबतीत क्ष-किरण चित्राची किंवा सोनोग्राफीची गरज पडते.
आयुर्वेद लघवी अडकली असेल तर ती मोकळी करण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून बेंबीखालच्या भागावर (म्हणजे फुगलेल्या मूत्राशयावर) गरम पाण्याने किंवा कपडयाने शेक द्यावा. शेक देण्यासाठी पळसाची फुले गरम करून वापरली जातात. याचाही उपयोग होतो. पळसफुलांचा रस (500मि.ली.) + हिरडापावडर (5 ग्रॅ) + गूळ (300 ग्रॅ) + धायटीची फुले (35 ग्रॅ.) यांचे एकत्रित आसव करून ठेवावे. हे आसव पोटातून दिल्यास लघवी मोकळी होण्यास मदत होते. हे आसव दीड ते दोन चमचे द्यावे व ओल्या फडक्याने मूत्राशयावर शेक द्यावा. लघवी बाहेर पडत नसल्यास वेळीच तज्ज्ञाकडे पाठवावे.
लघवी बंद होणे...
तरुण-प्रौढ वयात दररोज सुमारे एक ते दीड लिटर लघवी तयार होते. हवामानाप्रमाणे व पाणी पिण्याच्या प्रमाणानुसार लघवीचे प्रमाणही बदलते. हिवाळयात लघवीचे प्रमाण जास्तअसते कारण घामाचे प्रमाण कमी असते. याउलट उन्हाळयात लघवी कमी होते.र् साधारणपणे तरुण- प्रौढ व्यक्तींमध्ये रोज एक लिटर हे लघवीचे किमान प्रमाण धरले जाते. टाकाऊ पदार्थ, युरिया, इत्यादी योग्य प्रमाणात शरीराबाहेर पडण्यासाठी एवढी लघवी तयार व्हावीच लागते. मूत्रपिंडाच्या निरनिराळया आजारांत हे प्रमाण कमी होत जाते व बंदही पडू शकते. हे अचानक घडू शकते किंवा हळूहळू (काही दिवस, महिने) होऊ शकते. हळूहळू आपली लघवी बंद होत आहे, हे बऱ्याच रुग्णांच्या लवकर लक्षात येत नाही.
दररोज 24 तासांत मिळून अर्धा लिटरपेक्षा कमी लघवी तयार होत असेल तर 'लघवी बंद' होत आहे असे धरावे. याची कारणेही अनेक आहेत. लवकर इलाज झाला तर पुढचे नुकसान टळू शकते. सोबतच्या तक्त्याप्रमाणे कारणांचे तीन मुख्य गट पडतात. कारण काही असले तरी लघवी बंद किंवा कमी होणे ही अत्यंत गंभीर बाब असते. त्यासाठी ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. पहिल्या गटातील शुष्कतेचे कारण असल्यास जीवनजल त्वरित चालू करावे. लगेच सलाईन देण्याची सोय असल्यास आणखी चांगले.
आयुर्वेद...
लघवी बंद होणे (म्हणजे मूत्रपिंडाचे काम बंद पडणे) ही अगदी गंभीर गोष्ट आहे.
याबरोबरच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काही उपाय करण्यासारखे आहेत. यासाठी आधी पचनसंस्थेचे कार्य सुधारणे आवश्यक समजले जाते. सुंठ, मिरी, पिंपळी, आले यांपैकी एखादा पदार्थ वापरून पचन सुधारता येते. दीड ग्रॅम त्रिकटू चूर्ण (सुंठ, मिरे, पिंपळी) एक चमचा मधाबरोबर दिवसातून तीन -चार वेळा द्यावे. लहान मुलांमध्ये त्रिकटू चूर्ण अर्धा ग्रॅम इतकेच द्यावे. दही, मिठाई, मांसाहार व उडीद पूर्ण वर्ज्य करावेत.
मूत्रपिंडाचे कामकाज सुधारण्यासाठी पुनर्नवा उपयुक्तआहे. पुनर्नव्याच्या मुळयांचा काढा (30-50 ग्रॅम मुळया 1 लिटर पाण्यात भिजवून 200 मि.ली. होईपर्यंत आटवावे.) 30-50 मि.ली. काढा दिवसातून तीन वेळा द्यावा. याऐवजी पुनर्नवासव औषधाच्या दुकानात तयार मिळते, ते 20 मि.ली. मात्रेत दिवसातून तीन वेळा द्यावे.
लघवी बंद होणे-कमी होणे, जास्त लघवी होणे...
'जास्त लघवी होणे याचा अर्थ नेहमीपेक्षा जास्त होणे. उदा. मोसमाप्रमाणे नेहमी 24 तासांत मिळून दीड ते दोन लिटर लघवी होते. मात्र आता ती 2 ते 3 लिटर किंवा जास्त होत असेल तर ती 'जास्त' आहे असे म्हणता येईल. हिवाळा, जास्त पाणी किंवा द्रवपदार्थ पिणे ही जास्त लघवी होण्याची सामान्य कारणे आहेत.
ही सामान्य कारणे सोडून 'मधुमेह' हे जास्त लघवी होण्याचे प्रमुख कारण आहे.
एकूण लघवी जास्त होत असेल तर नेहमीपेक्षा 'जास्त वेळा' म्हणजे परत परत लघवी होण्याची प्रवृत्ती होते.
वारंवार लघवी होणे...
'वारंवार' थोडी थोडी लघवी होत राहणे आणि 'जास्त' लघवी होणे यात फरक आहे. सर्वसाधारणपणे मूत्राशय, मूत्रनलिका यांत जंतुदोष असेल तर वारंवार लघवी लागते. मूत्राशय किंवा मूत्रनलिकेतील आवरणाचा चरचरीत लघवीमुळे दाह होत असेल तर लघवीस वारंवार लागते. मात्र यात एका वेळी लघवी 10-20 मिली. होते; जास्त होत नाही.
गरोदरपणात गर्भाशयाच्या वाढीमुळे मूत्राशयावर दाब येतो. पहिल्या तिमाहीत यामुळे वारंवार लघवी होते.
लघवी वारंवार होत असेल तर तज्ज्ञाकडून तपासणी होणे आवश्यक असते. मधुमेह किंवा इतर गंभीर कारण नसल्यास यावर साधा उपाय असा...
गूळ आणि एक-दोन चमचे हळदपूड एकत्र करून पाण्याबरोबर पोटात घ्यायला सांगावे. बऱ्याच जणांना याचा उपयोग होतो.
उन्हाळी...
वारंवार लघवी होत असेल तर त्याबरोबर बहुधा उन्हाळी (लघवीस जळजळ) होते. अशा वेळी लघवी गढूळ दिसते. कधीकधी रक्तामुळे लघवी थोडी लाल- तपकिरी दिसते.
उन्हाळी म्हणजे गरमपणा. उन्हाळीची मुख्य कारणे म्हणजे एकतर लघवी तीव्र अथवा चरचरीत असणे. मूत्रनलिकेतील आवरणाचा (अस्तराचा) दाह होत असल्यास साध्या लघवीमुळेही जळजळ होते. मात्र पाणी पिण्याचे प्रमाण गरजेच्या मानाने कमी असल्यास लघवी कडक किंवा जळजळीत होते. त्यामुळे आवरणाचा दाह होतो. अशी लघवी गडद पिवळी किंवा कधी लालसर दिसते.
ताप असेल तर मूळ जंतुदोषावर जंतुविरोधी औषध द्यावे लागते. एरवी उन्हाळीचा उपचार म्हणजे भरपूर पाणी पिऊन लघवी सौम्य-पातळ करणे.
जास्त पाणी पिऊन लघवी सौम्य केल्यास हा त्रास लगेच थांबतो. याबरोबरच खाण्याचा सोडा लिंबू-पाण्यात मिसळून द्यावा किंवा सोडामिंटच्या गोळया द्याव्यात. असल्यास फेनॅडिनच्या गोळया- (पूर्ण नाव फेनॅझोपायरिडिन) घ्याव्यात. या औषधाने लघवीची आग हमखास कमी होते.
आयुर्वेद...
उन्हाळीसाठी 100 मि.ली. पाण्यामध्ये 25 ग्रॅम धने भिजत ठेवून हे पाणी 12-12 तासांनी गाळून प्यायला द्यावे. याबरोबर चंद्रकलावटी आणि चंद्रप्रभावटी (250 मि.ग्रॅ) 2 गोळया 2 वेळा याप्रमाणे एक-दोन आठवडे द्यावे.
लघवीतून 'पू' येणे...
लघवीतून धातू म्हणजे वीर्य जाणे हा शब्दप्रयोग लोकांमध्ये प्रचलित आहे. लघवीतून 'धातू जाणे' हा शब्दप्रयोग 'पू जाणे' यासाठीच वापरला जातो. 'वीर्य' व 'पू' दिसायला सारखेच असल्याने हा गैरसमज तयार झाला असावा. लघवीतून वीर्य जाऊ शकत नाही. कारण वीर्य फक्त लैंगिक क्रियेनंतर जाते. इतर वेळी नाही. झोपेत वीर्यस्खलन (स्वप्नदोष) होणे ही एक स्वतंत्र बाब आहे आणि याचा लघवीशी संबंध नाही. हा शब्दप्रयोग अर्थातच पुरुषांबाबतच वापरला जातो.
लघवीवाटे 'पू'येण्याची कारणे म्हणजे (अ) मूत्राशयाचा जंतुदोष होऊन 'पू' तयार होणे व तो लघवीवाटे बाहेर पडणे. हे कारण असेल तेव्हा सर्वच लघवी गढूळ दिसते. (ब) दुसरे कारण म्हणजे मूत्रनलिकेचा जंतुदोष होणे. स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये मूत्रनलिकादाहाची काही कारणे समान तर काही वेगवेगळी असतात. लिंगसांसर्गिक जंतुदोष, संभोगानंतर काही वेळा येणारा जंतुदोष, इत्यादी कारणे समान आहेत. स्त्रियांमध्ये मासिक पाळीत स्वच्छता न पाळणे, योनिदाहातून येणारा जंतुदोष, इत्यादी वेगवेगळी कारणे असतात. (क) पुरुषांमध्ये वीर्यकोशाचा किंवा प्रॉस्टेट ग्रंथीचा जंतुदोष असेल तर पू येत राहतो.
लघवीतून रक्त येणे...
मूत्रसंस्थेत मूत्रपिंडापासून मूत्रनलिकेपर्यंत कोठेही जखमेने रक्तस्राव झाला तर लघवीत रक्त उतरते. दुसरे म्हणजे रक्तातच रक्तस्रावाची प्रवृत्ती तयार झाली (उदा. सर्पदंश, चुकीचे रक्तशरीरात दिले जाणे, इ.) तर लघवीत रक्तदिसते.
लघवीत उतरणाऱ्या रक्ताचे प्रमाण आणि रक्तस्राव झाल्यानंतर गेलेला वेळ यावर लघवीचा रंग अवलंबून असतो.
रक्ताचे प्रमाण अगदी थोडे असेल तर लघवीचा रंग बदलत नाही. पण सूक्ष्मदर्शी यंत्राने तपासणी केल्यास तांबडया पेशी आढळून येतात. रक्तस्राव ताजा असेल तर लघवीचा रंग कमीअधिक लालसर असतो. मात्र ठेवल्यावर थोडया वेळाने त्याचा रंग तपकिरी होतो.
लघवीतून रक्त येण्याची कारणे अनेक आहेत. मूत्रपिंडास मार लागून रक्तस्राव होणे मूत्रपिंडाचा जंतुदोष, मुतखडे, मूत्रसंस्थेचा कर्करोग, मूत्राशयाला अपघातात मार लागणे, इत्यादी वेगवेगळी कारणे असतात. याचेl निदान रुग्णालयातच होणे आवश्यक आहे.
मुतखडयामुळे लघवीतून रक्तस्राव होत असल्यास, तात्पुरता उपाय (रक्तस्राव कमी करण्यासाठी) म्हणून अडुळसा पानांचा रस (20 ते 30 मि.ली.) दर 2-3तासांनी द्यावा. अडुळसा रसाबरोबर खडीसाखरही द्यावी.
मूत्रसंस्थेच्या आजारामुळे पोटात दुखणे...
मूत्रसंस्थेच्या अनेक आजारांमध्ये पोटात दुखते. प्रत्येक आजाराप्रमाणे पोटात दुखण्याची जागा व स्वरूप वेगवेगळे असते.
मूत्रपिंडात आजार असेल तर 'पोटात दुखते. पचनसंस्थेचे आजारात बेंबीच्या बाजूला दोन-तीन इंचावर दुखणे असते. पाठीकडून तपासल्यास शेवटची बरगडी संपते तेथे हे दुखणे आढळते. आजाराच्या तीव्रतेप्रमाणे हे दुखणे मंद किंवा तीव्र असू शकते. मूत्रवाहिन्यांमध्ये खडा असल्यास त्याच्या जागेप्रमाणे दुखणे असते. मूत्रवाहिनीत खडा असेल तर कळ पोटातून जांघेकडे किंवा लघवीच्या जागेकडे जाते. याबरोबर उलटी, घाम, अस्वस्थता, लघवीत रक्त उतरणे यांपैकी तक्रारी आढळतात.
मूत्राशयाचा आजार असेल तर बेंबीच्या खालच्या भागात दुखते. जंतुदोष असेल तर जळजळ किंवा कळ असते. लघवीस अडथळा असेल तर कळ येते. ही कळ मूत्रनलिकेत आल्यासारखे वाटते. मूत्रनलिकेतील जळजळ किंवा कळ प्रत्यक्ष मूत्रनलिकेतच जाणवते. पोटात दुखण्याची जागा, स्वरूप व इतर तक्रारी यांवरून आजाराचे निदान होऊ शकते. यासाठी पचनसंस्थेच्या प्रकरणात 'पोटात दुखणे' हा तक्ता पाहा.
शीघ्रगती/तीव्र मूत्रपिंड दोष तीव्र मूत्रपिंड दोष म्हणजे काय...
मूत्रपिंडातील पेशींचा तीव्र विनाश किंवा झीज जी पुन्हा पुन्हा होऊ शकते, त्याला तीव्र मूत्रपिंड दोष असे म्हणतात.
याची कारणे कोणती...?
कमी रक्तदाबामुळे मूत्रपिंडाला कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. उलटी, अतिसार, जास्त रक्तस्त्राव (शस्त्रक्रिया केल्यानंतर), भाजणे या वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये मूत्रपिंडाला कमी रक्तपुरवठा होतो.
रोगप्रतिबंधक औषधे किंवा रंग किंवा प्रमाणापेक्षा जास्त प्रथिन यामुळे मूत्रपिंडाला इजा झाल्यास. जेन्टामायसिन सारखी प्रतिबंधक औषधे मूत्रपिंडाला सरळ इजा करू शकतात तर औषधांची ऍलर्जी ज्याला Interstitial मूत्रपिंड दाह म्हणतात, मूत्रपिंडाला इजा करतात (उदा. सल्फा औषधे) कर्करोग, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथींची वाढ यामुळे मूत्रप्रवाहात अडथळा निर्माण होतो.
तीव्र मूत्रपिंडदोष प्राणघातक आहे काय...?
होय. ही गंभीर परिस्थिती आहे. रूग्णालयात असलेल्या या रोगाच्या रूग्णांचं मृत्यूचं प्रमाण ५०% पेक्षा जास्त आहे.
हा रोग झाला आहे हे कसे समजते...?
जेव्हा मूत्रोत्सर्जानाचे प्रमाण अचानक खूप कमी होते आणि क्रिटेनीन वाढते तेव्हा मूत्रपिंडदोष आहे हे लक्षात येते. अति उलट्या होत असतील तर रूग्णात Volume Depletion ची चिन्ह आणि लक्षणे आढळतात.
यावर काही उपचार आहे काय...?
Volume Depleted रूग्णांमध्ये फ्लुइडस् रक्त देऊन रक्तदाब वाढविला पाहिजे. विरूध्द परिणाम करणारे औषध शोधून काढून त्याचा वापर थांबविला पाहिजे. काही रूग्णांमध्ये डायलेसिस (सच्छिद्र पडदा वापरून द्रवामधील स्फटिक पदार्थ आणि द्रवभाग निरनिराळे करणे) करावे लागते, जे बहुतेक वेळा तात्पुरते असत.
जुनाट मूत्रपिंड दोष म्हणजे काय...?
मूत्रपिंडाचे कार्य हळुहळू मंदावण्यांच्या क्रियेमुळे या दोषाचे निदान होते. याची कारणे पुढीलप्रमाणे:
मूत्रपिंडातील महत्वाच्या कार्यगटाचा दाह...
हा मूत्रपिंडाचा संसर्गजन्य रोग नाही. कमी प्रमाणात लघवी, लाल रंगाची लघवी, लघवीत प्रथिन, अंगाला सूज येणे ही याची लक्षणे होत. उच्च रक्तदाबात बर्याच वर्षापर्यत कोणतेही लक्षण दिसत नाही.
उच्च रक्तदाब...
बरीच वर्ष अनियंत्रित असलेला उच्च रक्तदाब मूत्रपिंडातील रक्तपेशींना हानिकारक ठरतो आणि मूत्रपिंड दोष निमाण होतो.
मधुमेहामुळे मूत्रपिंडाची रक्त गाळण्याची आणि निरूपाची आणि निरूपयोगी पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते. साखरेचे जास्त प्रमाण मूत्रपिंडाद्वारे जास्त रक्त गाळते. काही काळ ही परिस्थिती राहिल्यामुळे आणि मूत्रपिंंडाला अधिक कार्य करावे लागल्यामुळे गाळण्याची प्रक्रिया दोषपूर्ण होते.
जुनाट मूत्रपिंड संसर्ग... बराच काळ संसर्ग राहिल्याने मूत्रपिंडाच्या रचनेला हानी पोहचते. यामुळे मूत्रपिंडाची रक्त गाळण्याची क्षमता कमी होते.
मुतखड्यासारखा अडथळा...
मूत्रप्रवाहामध्ये मुतखड्यासारखे अडथळा निर्माण होऊन तो Nephrons ना हानिकारक ठरतो. त्यामुळे हळुहळू पण शेवटी त्याचा परिणाम जुनाट मूत्रपिंडदोष निर्माण होण्यात होतो.
बरीच औषधे मूत्रपिंडाला हानी पोहचवितात. Aspirin, lbuprofen ही औषधे आणि Sulpha drugs आणि जेन्टामायसिन ही रोगप्रतिबंधक औषधे सगळ्यात घातक आहेत.
जर माझ्या मूत्रपिंडात जुनाट दोषाचे निदान झाले तर मी डॉक्टरांकडे केव्हा-केव्हा जायला पाहिजे...?
मूत्रपिंडाचा जुनाट दोष असणार्यांनी मूत्रपिंड तज्ञांकडून तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. या रूग्णांना कमीत कमी तीन महिन्यातून एकदा तपासले पाहिजे. माझ्या डॉक्टरांनी मला २४ तासातील लघवी द्यायला सांगितले.
ही कोणत्या तपासणीसाठी वापरली जाते...?
लघवीत किती प्रमाणात प्रथिनं जात आहेत याचे अचूक निदान करण्यासाठी.२४ तासात किती क्रिटेनीन बाहेर टाकले गेले हे पाहण्यासाठी,
क्रिटेनीन खालील सूत्राचा उपयोग करून मोजले जाते...
*Cr Clearance = (U x V )/p U: Con of creatinine in urine,
*V: Volume of urine,
*P: Plasma creatinine.
यावरून मूत्रपिंडाच्या कार्याची कल्पना येते.
क्रिटेनीनची अशी एखादी पातळी आहे का, की तेव्हा डायलेसीस सुरू करावे लागेल...?
नाही. रक्तजल क्रिटिनीनची पातळी ही स्नायू सम्मुचयाची (Mass) परावर्तन आहे. ही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असू शकते. कुपोषीत व्यक्तींमध्ये ही पातळी कमी असू शकते.
या रूग्णांना (CRF) कोणत्या प्रकारचा आहार द्यावा...?
६ ग्रॅम प्रथिनं/kg शरीराच्या वजनाच्या प्रमाणात एका दिवसाला घेतली पाहिजेत. माफक प्रमाणात प्रथिनांवर घातलेले बंधन (CRF) मध्ये होणार्या वाढीचा वेग मंदावते, असे दिसून आले आहे.
मूत्रपिंड दोष असणार्या रूग्णांना जीवनसत्व देण्याची गरज आहे काय...? होय. त्यांच्या आहारात जीवनसत्व ब, क आणि फोलिक ऍसिड असले पाहिजे. ज्यांना Renal Osteodystrophy वर उपचार चालू आहेत. अशांसाठी जीवनसत्व ड राखून ठेवावे. रक्तातील कॅल्शियम कमी झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे PTH नामक संप्रेरकाच्या स्त्रावाला उत्तेजित करते, हे संप्रेरक हाडांवर परिणाम करते. अशाप्रकारच्या रोग्यांमध्ये कॅल्शियम कमी प्रमाणात आणि फॉस्फरस जास्त प्रमाणात असते. त्यांचा उपचार कॅल्शियमचा पुरवठा करून केला पाहिजे.
पोटॅशियम घेण्यावर काही बंधने आहेत का...?
रूग्णाने पोटॅशियम घेण्याबाबत जागरूक असले पाहिजे. केळी, टमाटे, संत्री, फळांचे रस इ. ज्यात पोटॅशियम जास्त असते, ते पदार्थ खाण्याचे टाळावे.
माझ्या मूत्रपिंडात जर दोष असेल, तर मला किती पाणी किती पाणी प्यायचे परवानगी आहे...?
डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वेगवेगळी असते. मूत्रपिंड दोष असणार्या रूग्णांमध्ये Volume expansion आणी Contraction दिसून येते. म्हणून त्यांनी नेहमी डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. साधारणपणे दिवसाला १-१.५ लिटर एवढ्या माफक प्रमाणात पाण्यावर बंधन घातले जाते.
रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे कितपत महत्वाचे आहे...?
रक्तदाब नियंत्रित ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. रक्तदाब नियंत्रित असल्यास रोगाची वाढ मंदावते असे अभ्यासावरून दिसून आले आहे.
(CRF) मध्ये रक्तातील लालपेशी कमी होण्याचे कारण काय...?
Erythropoeitin चा कमी उत्पादनाशी हे संबंधित आहे. Erythropoeitin अस्थिमज्जांना लाल रक्तपेशी उत्पादित करण्यास उत्तेजित करते.
ऍनिमियासाठी काही उपचार आहे काय...?
लाल रक्तपेशी वाढविण्यासाठी Erythropoeitin चे इंजेक्शन घ्यावे. हे इंजेक्शन घ्यायला सुरूवात करण्याआधी लोहाचे प्रमाण पाहणे महत्वाचे आह्ते.
या रोगाच्या (Chronic Renal Failure) शेवटच्या स्थितीत कोणते उपचार उपलब्ध आहेत...?
खालील उपचार पध्दती उपलब्ध आहेत.
*१) हेमोडायलेसीस,
*२) पेरीटोनियल डायलेसीस,
*३) मूत्रपिंडारोपण.
मूत्रपिंड दोष असणार्या रोग्यांमध्ये डायलेसीस केव्हा सुरू करावे...?
जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य नेहमीपेक्षा २५% कमी होईल हे क्रिटेनीन Clearance चे मापन करून निश्चित झाल्यानंतर लगेचच डायलेसीस सुरू करावे असा आताच्या तज्ञांचा सल्ला आहे. शिसारी येणे, उलट्या होणे किंवा फुफ्फुसामध्ये द्रवपदार्थ साठून राहणे, अशा लक्षणांची वाट पाहून नये जे मूत्रपिंडदोषाच्या अंतिम स्थितीत दिसतात.
मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सचा दाह म्हणजे काय...?
खालील वैशिष्ट्यांवरून हा रोग ओळखू येतो.
*१) कमी प्रमाणात मूत्रोत्सर्जन - oliguria
*२) लघवीत रक्ताचे प्रमाण ज्यामुळे लघवीचा रंग धुरकट होतो
*३) लघवीत लाल रक्तपेशी
*४) मूत्रोत्सर्जन व्यवस्थित न झाल्याने हाता - पायांवर सूज.
या रोगाची कारणे कोणती...?
खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे मूत्रपिंडातील गोमेरूल्सचा दाह होऊ शकतो.
*१) संसर्ग: सूक्ष्म जीवाणूंची एक जात (Streptococi), Hep C,
*२) त्वचाक्षय आणि रक्तवाहिनीचा दाह,
*३) LgA Nephropathy.
या रोगावर उपचार कोणते...?
*१) मीठ आणि पाण्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे
*२) मूत्रोत्सर्जनास उत्तेजन देणार्या औषधांचा वापर, त्यामुळे तरल पदार्थ साचून राहणार नाही.
*३) रक्तदाब कमी करणारे घटक, जशी गरज असेल त्याप्रमाणे साधारणपणे Steroids किंवा इतर घटक वापरत नाहीत.
मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सच्या दाहाचे पुनर्वसन कशात होत किंवा रोगभविष्य कोणते...?
ज्या कारणांमुळे हा दाह होतो. त्यावर अवलंबून असते. सूक्ष्म जीवाणूंच्या संसर्गात जर याचे स्थान दुय्यम किंवा गौण असेल तर रोगभविष्य चांगले आहे.
IGA Nephropathy म्हणजे काय...?
ग्लोमेरूल्समध्ये इम्युनोग्लोबिन (IGA) कमी झाल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. १९६८ मध्ये Berger आणि Hinglais यांनी प्रथम याच वर्णन केले होते. म्हणून हा रोग Bergers Disease म्हणून ओळखला जातो आणि मूत्रपिंडातील ग्लोमेरूल्सचा दाह हा रोग जगार सगळीकडे दिसून येतो. पुरूषांमध्ये सामान्यपणे दिसून येतो.
मूत्रपिंडदाह होण्याची कारणे कोणती...?
अजूनही या रोगाचे निश्चित कारण सांगणे म्हणजे जुगार खेळण्यासारखे आहे. काही जीवाणूच्या संसर्गात हा दुय्यम असेल जो एखाद्या संसर्गाला दाद न देणार्या पध्दतील जास्त रोगप्रतिबंधक पदार्थ निर्माण करण्यास उत्तेजन देतो आणि शेवटी हे पदार्थ मूत्रपिंडात जमा होतात, असे एक कारण असू शकते.
रोगनिदानासाठी मूत्रपिंडाची बायप्सी करणे गरजेचे आहे काय...?
होय. निदान निश्चित करण्यासाठी बायप्सी केली जाते.
या रोगात रूग्ण कसा दिसतो...?
बर्याचशा रूग्णांमध्ये लहान किंवा मोठ्या प्रमाणात लघवीत रक्त दिसून येते आणि ते प्रथिन स्फटिकाशी (Protein Urea) संबंधित असते. काही रूग्णांमध्ये रक्तदाब वाढलेला असतो.
IGA Nephropathy वर उपचार करता येतात का...? बर्याच प्रकारच्या उपचारपध्दती वापरल्या गेल्या आहेत. उदा. Steroids, Face Oil इ. यातील प्रत्येकाने स्वतंत्र असे फायदेशीर परिणाम दिसून आले की ज्यामुळे हा रोग नियंत्रित करता येतो. ज्या पुरूष रूग्णांना उच्च रक्तदाब आहे आणि ज्यांच्यात मूत्रपिंडाचा रोग बळावतो आहे त्यांच्यावर हे उपचार करून पहावेत.
त्वचाक्षय (Lupus) मूत्रपिंड दाह म्हणजे काय...?
या रोगार त्वचा, सांधे, मज्जासंस्था, मूत्रपिंड आणि रक्त यावर परिणाम होतो. यात स्थानिक रक्तसंचयामुले लाली येते याला Systemic Lupus Erythmatosus (SCE) म्हणतात. जेव्हा मूत्रपिंडावर याचा परिणाम होतो तेव्हा त्याला त्वचाक्षय मूत्रपिंड दाह असे म्हणतात.
सर्व प्रकारच्या मुत्रविकारात गोपियुष प्रभावीपणे ऊपयुक्त आहे.
त्वचाक्षय मूत्रपिंडदाहासाठी काही उपचार आहेत काय...?
होय. मूत्रपिंडाची बायप्सी आणि पेशीसमूहाचे वर्गीकरण करून या रोगावरील उपचारांसाठी मार्गदर्शन केले जाते. जेव्हा रोगोपचार करावयाचा असतो तेव्हा बहुतांशी Steroids चा वापर केला जातो आणि बर्याच वेळा मूत्रपिंडरोगतज्ञ Cyclophosphamide ही वापरातात. या रूग्णांना हे घटक/औषधे साधारणपणे ६ ते १२ महिन्यापर्यंत घ्यावे लागते.
‘मला त्वचाक्षय मूत्रपिंडादाह असल्याचे निदान झाले आहे’. मला डायलेसीस करावे लागेल काय...?
रोगामध्ये ज्यांच्या पेशीसमूहाच्या रचनेत जास्त बदल झालेला नाही ते बायप्सी केल्यानंतर उपचाराला चांगला प्रतिसाद देतात. ज्यांच्या पेशीसमुहाच्या रचनेत बदल झाला आहे त्यांच्या बाबतीत तेव्हा प्रतिसाद मिळत नाही. फक्त काही रूग्णच डायलेसीस किंवा रोपणासाठी जातात.
त्वचाक्षय मूत्रपिंडदाह असणारा, डायलेसीसवर असणार्या रूग्णाला मूत्रपिंड रोपण करता येते काय...?
होय. या प्रकारच्या रूग्णावर मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया करता येते, आणि एकदा रोपण केल्यानंतर हा रोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता फार कमी असते.
No comments: