Peek Vima Yojana 2023 राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पहिल्या टप्प्यात ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात देखील ०९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे.या सर्व जिल्ह्याची नावे आणि शेतकऱ्यांची यादी देण्यात आली आहे.
मित्रांनो महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा खूपच कमी झाल्याने अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करून पाऊस न पडल्याने बियाणांचे तेच खतांचे व इतर मेहनतीचे पैसे देखील वाया गेले आहेत आणि यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री पिक विमा योजना |
विभाग | महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग |
लाभार्थी | पिक विमा भरलेले शेतकरी |
वर्ष | २०२३ |
लाभ रक्कम | २५% अग्रीम पीकविमा रक्कम |
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यातील 47 लाख ६३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पिकविम्याची तब्बल ९६५ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच पीकविमा रक्कम दिली जाणार असल्याचा शब्द कृषीमंत्र्यांनी दिला होता यानुसार ज्या १२ जिल्ह्यातील पीकविमा देण्यासाठी विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला न्हवता अशा जिल्ह्यतील शेतकऱ्यांना दिवाळी आधीच २५% अग्रीम पीकविमा दिला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यात ०९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा दिला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यात यावर्षी ३४ जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरला आहे.यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त १ रु.भरून पीकविमा योजनेची घोषणा केली होती त्यानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगामातील पीकविमा भरला होता त्यानुसार ज्या जिल्ह्यातील पीकविमा साठी विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला न्हवता अशा १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा दिला आहे.
दुसऱ्या टप्प्यासाठी आता संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून ०९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात पीकविमा दिला जाणार आहे या जिल्ह्यांची यादी देखील आता प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- बीड
- बुलढाणा
- वाशीम
- नंदुरबार
- धुळे
- नाशिक
- पुणे
- अमरावती
- अहमदनगर
वरील सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आता पीकविमा दिला जाणार आहे
पिक विमा योजना म्हणजेच नुकसान भरपाई मिळणाऱ्या पिकांमध्ये खरीप हंगामातील पिकांचा समावेश करण्यात आला आहे आणि आता या सर्व पिकांना हेक्टरी सरसकट मदत देण्यात येणार आहे.कापूस,मका,ज्वारी,बाजरी,भुईमुग,मुग,कांदा,सोयाबीन अशा पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये
बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 17000 रुपये
बहुवार्षिक पिकासाठी प्रति हेक्टर 22,500 रुपये.Peek Vima Yojana 2023.
No comments: