Full Width CSS

(PIKVIMA) हवामान आधारित मृग बहार फळपिक विमा भरण्यास सुरवात

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सरकारकडून सन 2024-2025 या कालावधीसाठी फळपीक विमा योजना लागू करण्यात आली असून फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मृगबहार आणि आंबिया बहारासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. राज्यातील एकूण 30 जिल्ह्यांतील फळबागांसाठी ही योजना लागू असून त्यासाठी चार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. समाविष्ट जिल्हे : अकोला, अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर ,जळगाव, जालना, ठाणे, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, बीड, बुलढाणा, यवतमाळ, रत्‍नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली ➡️ कोणत्या फळपिकांसाठी लागू असणार योजना? मृग बहार : संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) आंबिया बहार : संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी व पपई ➡️ फळपीक विमा योजनेची मुख्य उद्दीष्ट ? शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी यांना विमा संरक्षण देणे. फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थेर्य अबाधित राखण्यास मदत करणे. फळपिकांच्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्तीची शेतकऱ्यांना भीती राहणार नाही व फळबागा जपासण्यास आर्थिक मदत होणार आहे. विमा संरक्षणामुळे शेतकऱ्यांना निसंकोचपणे फळबाग शेती करता येणार आहे. ➡️ योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये ? सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी असेल. सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. या योजनेतर्गत केंद्र शासनाने त्यांचे विमा हप्ता अनुदान 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केले आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेंतर्गत 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असुन 35 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी 50:50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे (0.10 हे) आणि उर्वरित विभागाकरीता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे (0.20 हे.) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळुन प्रती शेतकरी4 हे. मर्यादपर्यंत राहील. अधिसुचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. संत्रा, मोसंबी, डाळिंब व द्राक्ष) सदर फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतक-यांनी ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळणेसाठी शेतकऱ्याचे बैंक खाते आधार आधारित पेमेंट साठी लिंक असावे. ➡️ मृग बहार सन 2024 फळपिक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत : फळाचे नाव / प्रकार विमा भरण्याची अंतिम मुदत संत्रा, पेरु, लिंबू, द्राक्ष (क) 25 जून 2024 मोसंबी, चिकू 30 जून 2024 डाळिंब 14 जुलै 2024 सिताफळ 31 जुलै 2024 ➡️ विमा अर्ज भरण्यासाठी पीक कर्ज धारक शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना : फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक (optional) आहे. पीक कर्ज धारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा योजनेत सहभागी न होण्यासाठी पीककर्ज खाते किंवा किसान क्रेडिट कार्ड खाते असलेल्या बॅंकेत एक घोषणापत्र द्यावे लागेल. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसे घोषणापत्र संबंधित फळपिकांचा विमा भरण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेत द्यावे लागेल. संबंधित शेतकऱ्याकडून असे घोषणापत्र जर बँकेला दिले गेले नाही तर फळ उत्पादक कर्जदार शेतकरी विमा योजनेत सहभागी आहेत, असे गृहीत धरले जाईल व त्यांची विमा हप्ता रक्कम कर्ज खात्यातून वजा केली जाईल. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गतच राबविली जाते. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहर मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर पर्यन्त विमा नोंदणी करता येणार आहे. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग किंवा आंबियाबहारा पैकी कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा अर्ज करता येईल. केवळ उत्पादनक्षम बागांनाच विमा संरक्षण लागू असेल. उत्पादनक्षम नसलेल्या म्हणजेच कमी वयाच्या बागांचा विमा काढूनये काढल्याचे आढळल्यास विमाहप्ता जप्त होईल व विमा भरपाईदेखील मिळणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. ➡️ विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : ✔️ आधार कार्ड ✔️ बँक पासबुक ✔️ मोबाईल नंबर ✔️ फळबाग नोंद असलेला ७/१२ व ८ अ ✔️ फळबाग उत्पादन - स्वयंघोषणापत्र ✔️ भाडे तत्वावर केलेल्या शेती साठी रजिस्टर अग्रिमेंट (नोटरी) लागेल नोट : ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्या सेंटरशी संपर्क साधावा
(PIKVIMA) हवामान आधारित मृग बहार फळपिक विमा भरण्यास सुरवात (PIKVIMA) हवामान आधारित मृग बहार फळपिक विमा भरण्यास सुरवात Reviewed by विशाल मल्टी सर्विसेस व नोकरी मदत केंद्र on June 14, 2024 Rating: 5

No comments:

Random Posts

Powered by Blogger.